शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

स्त्री-पुरुष समानतेची बूज राखणारी तत्त्वप्रणाली नव्या पिढीला कशी रूजेल, याचा विचार व्हावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 7:06 AM

सामाजिक दबाव निर्माण करूनच माणसाच्या समाज पातळीवरील व्यवहारात बदल घडवून आणावे लागतील.

सामाजिक आणि राजकीय हिंसाचाराची जाहीरपणे चर्चा हाेत असते. कारण त्यात समूह किंवा समाज तसेच शासन नावाची यंत्रणा सहभागी असते. अशा हिंसाचारात बलात्कार किंवा विनयभंगाचे प्रकार हाेतात. मात्र, हिंसेचा हा प्रकार नित्याने घडणारा नसताे. जातीय किंवा धार्मिक वादातून सामाजिक पातळीवर हिंसाचाराचा उद्रेक हाेताे. त्याप्रसंगी महिलांवर अत्याचार करण्यासाठी लैंगिक हिंसेचा आधार घेतला जाताे. मात्र दरराेजची वृत्तपत्रे तसेच इतर माध्यमे पाहिली, वाचली की, वैयक्तिक पातळीवरदेखील लैंगिक हिंसाचाराच्या असंख्य घटना दरराेज घडताना जाणवतात. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करीत राहणे आणि एकेदिवशी लग्नास नकार देऊन पसार हाेण्याचे प्रकार सर्वत्र आहेत.

अल्पवयीन मुले-मुली एकत्र येतात, लग्नाच्या आणाभाका देतात. त्यांना माहीत नसते की, जातीची मुळे किती खाेलवर रुजलेली आहेत. जातीचा वाद नसेल तरी पालकांना विश्वासात न घेता प्रेमविवाह करणेदेखील मान्य हाेत नाही. त्यातून हिंसाचाराच्या घटना दरराेज घडत असतात. मुला-मुलींच्या पालकांनी नाकारताच ही अल्पवयीन मुले-मुली आत्महत्या करतात. विधवा, घटस्फाेटित किंवा परित्यक्ता महिलांची अवस्था तर समाजात सर्वाधिक उपेक्षित आणि शाेषणासाठी असलेल्या व्यक्तिरेखाच वाटतात. अनेक अशा महिलांना आर्थिकस्तरावर आधार हवा असताे. नातेवाइकांच्या त्रासापासून संरक्षण हवे असते. आर्थिक मदतीसाठी नाेकरी किंवा कामधंदा हवा असताे. अशा नडलेल्या उपेक्षित महिलांचा गैरफायदा घेणारे असंख्य काेल्हे आजूबाजूला असतात. ते लचके ताेडतात.

समाज पातळीवर किंवा शासनस्तरावर अशा निराधार महिलांना आधार देणारी स्थानके फारच कमी आहेत. वास्तविक अशा महिलांना आधार देण्याची जबाबदारी समाजसेवी संस्थांबराेबर शासनाच्या समाज कल्याण तसेच महिला- बालविकास विभागाने घेतली पाहिजे. त्यांचा आणि कायदा-सुव्यवस्था पाहणाऱ्या पाेलीस खात्याचा समन्वय हवा. महिलांना आधार देण्याचे धाेरण शासनाचेच असेल तर त्यांना सर्व खात्यांनी मदत करायला हवी. आपण राजकीय आरक्षण दिले, नाेकऱ्यांमध्ये आरक्षण दिले, मालमत्तेत समान वाटा देण्याचेही मान्य केले. मात्र, या साऱ्याची अंमलबजावणी हाेत नाही. जी महिला घरातील पुरुषापासूनच दुरावते तेव्हा संपूर्ण समाज तिच्याकडे संशयाने पाहताे. तिला कामाच्या ठिकाणी त्रास हाेताे. मालमत्तेतील हक्क नाकारला जाताे. लैंगिकतेचे माणसाला खूप आकर्षण असते. तसेच ती खासगी बाब मानली जाते. परिणामी त्यातून घडणाऱ्या हिंसेकडे सामाजिक प्रश्न म्हणून पाहिले जात नाही; पण ती एक सार्वजनिक वर्तनाची तसेच मानसिकतेची बाब आहे. ताे प्रश्न सामाजिक स्तरावरच साेडविला पाहिजे.

सामाजिक दबाव निर्माण करूनच माणसाच्या समाज पातळीवरील व्यवहारात बदल घडवून आणावे लागतील. शिक्षकांकडून विद्यार्थिनींवर हाेणारे अत्याचार, भाऊबंदकीत हाेणारे अत्याचार किंवा असहायतेचा फायदा घेऊन केलेले अत्याचार आदींमध्ये दाेन व्यक्तीतील हिंसा असली तरी या समाज मानसिकतेचा ताे परिणाम असताे. शेवटी या हिंसेची  नाेंद समाजाने तयार केलेल्या व्यवस्थेच्या यंत्रणांकडूनच साेक्षमाेक्ष लावावा लागताे. त्या यंत्रणेत काम करणाऱ्या व्यक्तींचाही संबंध येताे. ती यंत्रणा जर भ्रष्ट, संकुचित विचारांची असेल किंवा पक्षपाती असेल तर अत्याचारग्रस्त महिलेला न्याय मिळणे दुरापास्त हाेते. भारताच्या काेणत्याही प्रदेशात गेलात तर हीच कमी-अधिक परिस्थिती आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरसचे प्रकरण महाभयंकर हाेते. ती मुलगी पददलित समाजातील आणि अत्याचार करणारे सवर्ण असल्याने त्याचे पडसादही कमी उमटले. आपल्या देशात जातीयव्यवस्था इतकी भयावह आहे की, अशा घटनेतही जातीचा विचार करून समाज प्रतिक्रिया देत असताे. निर्भया प्रकरणात सारा देश पेटला आहे असे वातावरण हाेते. त्याहून भयानक-अमानुष पद्धतीने चार नराधमांनी हाथरसच्या पददलित कुटुंबातील मुलीवर अत्याचार केले. या क्रूरतेच्या विराेधात देश पेटून उठला पाहिजे, मात्र तसे झाले नाही. यासाठी नव्या पिढीला लैंगिक शिक्षणापासून सार्वजनिक जीवनातील व्यवहारापर्यंतचे नागरिकशास्त्र शिकविले पाहिजे. त्याचा आग्रह धरला पाहिजे. यासाठी एक सम्यक चळवळ सुरू झाली पाहिजे. शालेय शिक्षणापासून लैंगिक शिक्षण देण्यास विराेध करणाऱ्यांना बाजूला ठेवून या पातळीवरही स्त्री-पुरुष समानतेची बूज राखणारी तत्त्वप्रणाली नव्या पिढीला कशी रूजेल, याचा विचार व्हावा!

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळ