शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

ये दोस्ती हम नही छोडेंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:29 AM

एका रविवारी विनोद मनाचा हिय्या करून सचिनच्या घरी गेला. तेव्हा सचिन गरमागरम कांदेपोहे चापत होता.

- संदीप प्रधानएका रविवारी विनोद मनाचा हिय्या करून सचिनच्या घरी गेला. तेव्हा सचिन गरमागरम कांदेपोहे चापत होता. त्याच्या बायकोने दरवाजा उघडला आणि जोरात ओरडली... सचिन, पेपरवाला आलाय. मागच्या महिन्यात तीन दिवस पेपर टाकला नव्हता याने. त्याचे पैसे कापून बिल दे. तेवढ्यात सचिन बाहेर आला. पाहतो तर दारात विनोद. ये विनोद आत ये. आज कस काय येणं केलंस, सचिनने प्रश्न केला. सचिन, अरे मित्रा. लग्न करायचं, नवीन घर घ्यायचं म्हणतोय. स्टेशनजवळ टॉवर होतोय तिथे. अरे वा, उत्तम. घेऊन टाक मग, सचिन हसत बोलला. पण पैशाची तंगी आहे. तसे मी ३० लाख जमा केले आहेत इकडून-तिकडून. पण आणखी १० लाखांची गरज आहे. सचिनचा चेहरा सर्रकन बदलला. विनोद, तू पोहे खातोस का, सचिनने विषयाला बगल देण्यासाठी प्रश्न केला. लागलीच स्वयंपाकघरातून आवाज आला. पोहे संपले बरं का... सचिननं दोन वेलची केळी विनोदपुढं धरली. विनोद, अरे मी तुला केली असती मदत पण मी कालच मर्सिडीज बुक केलीय. तिचा इएमआय तुला माहीत आहेच. विनोदनी मान हलवली आणि तो वेलची केळी टेबलवर ठेवून निघून गेला. काही दिवसांत सचिनची कोरी मर्सिडीज आली. विनोदच्याच टॉवरमध्ये सचिनने आलिशान फ्लॅट बुक केला. थर्टी फर्स्टच्या रात्री सोसायटीत विनोद आणि पंटर पार्टीला जमले. पार्टी रंगात असताना कुणीतरी विनोद-सचिनच्या मैत्रीचा विषय काढला आणि अचानक विनोद भसाड्या आवाजात दोस्त दोस्त ना रहा... गाऊ लागला. रडू लागला. त्याला आवरताना इतरांची पुरेवाट झाली. दसºयाला सचिन टॉवरमध्ये राहायला गेला. विनोदनी रिडेव्हलपमेंटला जाणाºया इमारतीत फ्लॅट घेतला. दिवाळीला जुन्या सोसायटीत सचिन-विनोद फराळाला जमले. जो तो सचिनशी बोलू पाहत होता. तेवढ्यात कोपºयात बसलेल्या विनोदकडे सचिनचे लक्ष गेलं. दोघांची गळाभेट झाली. सोसायटीतील सदस्यांनी टाळ्या वाजवल्या. दोघांनी ये दोस्ती हम नही छोडेंगे हे गीत गायलं. गातांना दोघांचे डोळे डबडबले. कार्यक्रम संपल्यावर दोघे निघाले. सचिन सहकुटुंब मर्सिडीजमध्ये बसला आणि भुर्रकन दिसेनासा झाला. विनोद रिक्षा... रिक्षा करीत नकार ऐकून शेवटी बसस्टॉपवर बसच्या प्रतीक्षेत राहिला...