शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Weather: दिवसभर उष्णता गिळून रात्री तापणाऱ्या शहरांचे काय चुकते?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 9:48 AM

Weather: यावर्षीच्या उन्हाळ्यातला रखरखाट विसरणे परवडणार नाही. सिमेंट काँक्रीटचे उत्तुंग जंगल उभारण्याच्या श्रीमंत वेडाला आवर घालण्याची वेळ आली आहे!

- सुलक्षणा महाजन(शहर नियोजन विशेषज्ञ )दिल्लीमध्ये उन्हाळ्यात पारा ५२ सेल्सियसच्या वर! राजस्थान, गुजराथ, मध्यप्रदेश उत्तर प्रदेश राज्यातील अनेक शहरांत तापमान ४५ ते ५० डिग्री सेल्सियस पार. उष्णतेच्या लाटांचा तडाखा, पाण्याचे दुर्भिक्ष, सावल्यांचा अभाव, बेघरांची वणवण…. चातकासारखी पावसाची वाट.  अ-वेळी, न-वेळी येणारा  पाऊस, पूर, वादळे, भूस्खलन, चिखलाचे पूर आणि त्यात हरवणाऱ्या वस्त्या आणि ठप्प होणारी शहरे ! गेली काही वर्षे भारतातील गावा-शहरांचे हे वर्तमान! माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपाबद्दल चार-पाच दशके तरी जगभरातील पर्यावरण तज्ज्ञ, वैज्ञानिक इशारे देत आहेत; पण  बहिऱ्या, आंधळ्या नेत्यांना त्यातले काही ऐकू येत नाही.  भारतामध्ये अजूनही बहुसंख्य सुशिक्षित, सधन शहरी नागरिक आणि लोकप्रतिनिधी सातत्याने या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. उष्णतारोधक नागरी धोरणांच्या विरोधात उष्णता वाढवणाऱ्या काँक्रीटचे जंगल उभारण्यासाठी एकवटले आहेत. विकासकांचे गुलाम बनून सुरक्षित बांधकाम नियमांची मनमानी मोडतोड करून दाटीवाटीने उत्तुंग इमारती उभारत आहेत. जोडीला मोटारींना वेगवान मुक्तमार्ग आणि पार्किंगसाठी बहुमजली व्यवस्था  उपलब्ध करीत आहेत. ८-१० मार्गिकांचे महामार्ग, शेकडो उड्डाणपूल, उन्नत मेट्रो यावर अतोनात सार्वजनिक पैसे उधळत आहेत. शहरांमधील सार्वजनिक मोकळ्या जागा, बगीचे, उद्याने यांचा विसरच पडला आहे. जमिनीचा प्रत्येक तुकडा इमारतींनी भरून काढत सिमेंटसाठी चुनखडीचे डोंगर, दगड आणि खडीसाठी काळे कातळ तोडत आहेत. डोंगर खणून शहरांची उष्णता बेटे करीत आहेत.

एकेकाळी शेतीसाठी भारतामधील जंगले जाळून नष्ट केली जात असत. तोही निसर्गाचा आणि परिसराचा विनाश होता, संथगतीने होणारा. तेव्हा जखमा भरून काढायला निसर्गाला थोडा-फार अवसर मिळत होता. तेव्हाही अनेक लोकसमूह देवराया आणि जंगलांचे प्राणपणाने जतन करीत होते. अलीकडच्या काळात मात्र शेती आणि खनिजांसाठी जंगले भराभर उद्ध्वस्थ करणे सुरू आहे. उजाड डोंगर, जमिनी आणि उत्तुंग इमारती सूर्याची उष्णता दिवसभर गिळून संध्याकाळी बाहेर टाकत रात्रीचेही तापमान वाढवत आहेत. वरून  हवा थंड करण्याची यंत्रे घरात-कार्यालयात बसवून आसमंत अधिकच तापवला  जात आहे. 

अशा उष्णतेने समुद्र, नद्यांचे तलावांचे पाणी तापते, पाण्याचे बाष्पीभवन वाढते, पाण्याचे दुर्भिक्ष वाढते आणि पाठोपाठ येणाऱ्या पावसाळ्यात पावसाचे, पुराचे, ढगफुटीचे, वादळवाऱ्यांचे तांडव सुरु होते. शहरे, घरे, नागरिक आणि संपत्ती पुरात वाहून जाते. जागतिक तापमान वाढीच्या समस्येला तोंड देण्यासाठी  वैयक्तिक पातळीवर ऊर्जेची आणि पाण्याची काटकसर हे उपाय आहेत; स्थानिक वस्त्या आणि शहरांच्या पातळीवर सुयोग्य वास्तुरचना आणि नागरी उष्णता कमी करण्यासाठी हरित जागांची रचना आवश्यक आहे. या शिवाय रस्त्यांवर सावली देणाऱ्या झाडांचे आच्छादन आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांची रुंदी, त्यावर वेगाने धावणाऱ्या वाहनांवर तातडीने मर्यादा घालणे, उजाड डोंगर, नापीक शेतजमिनींवर गवताची, झुडुपांची लागवड करून तप्त धरित्रीला थंड करण्यासाठीचे  प्रयत्न आवश्यक आहेत. 

सर्वात आधी शहरी धनिक आणि मध्यमवर्गीयांचे उपभोग आणि त्यांच्या आहारी गेलेल्याराजकीय नेत्यांचे उपद्रव शहरी सजग नागरिकांनाच पुढाकार घेऊन मर्यादित करावे लागतील. भले प्रचंड  महामार्ग, सिमेंटचे रस्ते, वेगवान मोटारी, उत्तुंग इमारतींच्या वेडाला आवर घालावा  लागेल. हे सर्व भारतामध्ये कसे करायचे ह्याचे धडे उष्ण कटिबंधातील सिंगापूर, शीत कटिबंधातील स्वीडन, नॉर्वे आणि युरोपमधील अनेक देशांकडून शिकावे लागतील.

एक मात्र नक्की, पृथ्वीला थंडावा देण्यासाठी जनमत घडविण्याची सर्वात मोठी जबाबदारी सजग नागरिक, नगरपालिका, नगर नियोजनकार आणि वास्तुरचनाकारांची आहे. निसर्गनिर्मित आणि मानव निर्मित व्यवस्थांचा व व्यवहारांचा एकत्रित विचार करणारे नगरविज्ञान हे त्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन असणार आहे. नगरविज्ञानाची कास धरली तर धरित्रीचा ताप आणि शाप दूर करणे अजूनही शक्य होईल.    sulakshana.mahajan@gmail.com

टॅग्स :weatherहवामानenvironmentपर्यावरण