शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

मतदानवाढीचा फायदा-तोटा कुणास?

By किरण अग्रवाल | Published: May 02, 2019 6:30 AM

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे चारही टप्पे संपल्याने आता उमेदवारांच्याच गोटात नव्हे तर चौका-चौकात व गावांच्या पारा-पारावर सारे आकडेमोडीत दंग आहेत

 

किरण अग्रवाल

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे चारही टप्पे संपल्याने आता उमेदवारांच्याच गोटात नव्हे तर चौका-चौकात व गावांच्या पारा-पारावर सारे आकडेमोडीत दंग आहेत. विशेषत: शेवटच्या चरणात बहुतेक ठिकाणी मतदानाचा टक्का वाढल्याने ही वाढ सत्तांतराला किंवा परिवर्तनाला कौल देणारी असल्याचे आडाखे बांधले जात आहेत. परंतु मतदानात वाढ झाली म्हणजे ती सरसकटपणे प्रस्थापितांच्या विरोधासाठीच झाली असे समजणेही भाबडेपणाचेच म्हणता यावे. मतदारांना आता गृहीत धरता येत नाही, त्याप्रमाणे पारंपरिक समजांवर आधारित गृहीतकेही यशापयशाची खात्री देणारी ठरू नयेत.राज्यात पार पडलेल्या मतदानाच्या शेवटच्या चरणातील नाशिक, दिंडोरी, भिवंडी, कल्याण, पालघरसह मुंबईतील सर्व जागा तसेच नंदुरबार याठिकाणी यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. काही ठिकाणी दीड ते दोन टक्क्यांनी, तर उत्तर मुंबईमध्ये सर्वाधिक ७ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते. मतदानातील अशी वाढ ही परिवर्तनास पूरक मानली जाते. ‘टक्का’ वाढला याचा अर्थ मतदार प्रस्थापितांना उलथवून टाकण्यासाठी घराबाहेर पडले, असा संकेत घेतला जातो. अनेकदा अनेक ठिकाणी तसे निकाल लागलेलेही दिसून येतात. अर्थात त्याच त्या उमेदवाराबद्दलची नकारात्मकता, राजकीय लाट किंवा अन्य समीकरणांमुळेही मतदान वाढून बदल घडून आले आहेत. गेल्या २०१४च्या निवडणुकीतच असे मोठ्या प्रमाणात घडले होते. मोदी फॅक्टरमुळे अनेकांचे नशीब उजळले होते. पण म्हणून प्रत्येकवेळी तसेच होणे अपेक्षित धरता येऊ नये. कारण, मोदींमुळे मतदानाचा टक्का वाढून ‘युती’चे काही उमेदवार निवडून येताना काही ठिकाणी टक्का वाढूनही प्रस्थापितांचे पाय घट्ट रोवलेलेच राहिल्याचे दिसून आले होते. यंदा तर मोदी लाट नसतानाही टक्का वाढला, ही वाढ मतदानाप्रतिच्या जागरूकतेतून झाली. त्यामुळे ती परिवर्तनच घडवेल, असे समजता येऊ नये.आज जागोजागी जी आकडेमोड चाललेली दिसून येते आहे, ती मतदानवाढीचा लाभ विरोधकांना होतो या पारंपरिक समजावर आधारित आहे. वस्तुत: जो काही टक्का वाढला आहे तो काही फार मोठ्या अंतराचा अगर फरकाचा आहे, असेही नाही. कालमानानुसारची नैसर्गिक वाढ म्हणून त्याकडे बघता यावे. त्यामुळे त्यातून नकारात्मकतेचा संकेत घेता येऊ नये. सत्ताधाऱ्यांची चुकीची वा फसलेली धोरणे, जनतेचा भ्रमनिरास आदी कारणांतून जो परिणाम व्हायचा तो मतदानाचा टक्का जिथे वाढला नाही तिथेही झाला असेलच. परंतु सरसकटपणे तशा गृहीतकावर आकडेमोड करता येऊ नये. येथे आणखी एक बाब लक्षात घेता येणारी आहे ती म्हणजे, रिंगणात दोन बलाढ्य उमेदवारांसोबत अन्य अतिशय कमकुवत उमेदवार असतात तेव्हा थेट नफा-नुकसानीचे गणित मांडणे तुलनेने सोपे असते. यंदा मते खाण्याची क्षमता असणारे अनेक ठिकाणी रिंगणात होते. काही तर हेतुत: तेवढ्याकरिताच उमेदवारी दिली गेलेले होते. त्यामुळे मतदानवाढीने कुणाची गणिते घडण्याचा अंदाज बांधताना, विभाजित होणाऱ्या मतांमुळे जी समीकरणे बिघडणार आहेत ती अधिक महत्त्वाची ठरावीत. तात्पर्य इतकेच की, मतदानाचा टक्का वाढलेल्या सर्वच ठिकाणी परिवर्तनाच्या अपेक्षा करता येऊ नयेत.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान