शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

‘व्हॉत दु यू थिंक मिस्तर त्रम्प कॅन दू?’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 7:21 AM

तऱ्हेतऱ्हेच्या अस्वस्थतेत हिंदकळणाऱ्या अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचे रान पेटले आहे. या देशाच्या प्रवासात भेटलेल्या माणसांची व प्रश्नांची काही चित्रे..

-अपर्णा वेलणकर, कार्यकारी संपादक, लोकमत

‘व्हॉत  दु यू थिंक मिस्तर त्रम्प कॅन दू? ही बिल्ड्स द वॉल अँद वी स्तील जंप इत!’ - सिलिकॉन व्हॅलीतल्या सांता क्लारा नावाच्या उपनगरातून  फ्रीमॉण्टच्या दिशेने मला घेऊन निघालेला इलियास सांगत होता. हा ‘बॉर्डर’च्या ‘फेन्स’वरून उडी मारून दोन्ही बाजूच्या एजंट लोकांना भक्कम पैसे मोजून अनधिकृतरीत्या अमेरिकेत घुसलेला मेक्सिकन. १० वर्षांपूर्वी ‘आत’ आला, आता सगळे  पेपरवर्क पूर्ण करून अमेरिकेचा सिटीझन आहे. एका श्रीमंत वसाहतीत हॅन्डी मॅन म्हणून काम करतो. ड्राईव्ह  करताकरता आजूबाजूच्या रस्त्यांच्या नावाच्या पाट्या दाखवून मला सांगत होता, ‘हे पाहा ही सगळी नावे स्पॅनिश आहेत. हे आमचे रस्ते, अख्खा  कॅलिफोर्निया हा मेक्सिकोचा  भाग होता... १८४८ च्या युद्धात अमेरिकेने आमचा निम्मा देश खाल्ला. सो, दीस इज माय कंट्री. हू द हेल इज  मिस्तर त्रम्प?’ हे  मिस्तर त्रम्प पुन्हा प्रेसिडेंट झाले; आणि ते ओरडून सांगतात तशी भिंत खरेच बांधली गेली, तरी त्यावरून उडी मारून मेक्सिकन लोक अमेरिकेत येणारच येणार याबद्दल इलियासला तिळमात्र शंका नव्हती. ‘पॉलिटिक्स पैशावर चालते; पण, उपाशी लोकांचा राग राजकारण्यांना कधीच समजत नाही, माईंद  दीस’- हे त्याला सापडलेले ‘सत्य’! .. ‘तरीपण समजा मिस्टर ट्रम्प पुन्हा प्रेसिडेंट झालेच, तर..?’ - या प्रश्नावर  इलियासचे उत्तर होते, ‘व्हॉत इज देअर तू फिअर, यू तेल मी...’ 

ही बेडर हिंमत त्याला अनुभवाने शिकवलेली होती. व्हॅली एरियात शरीर कष्टाची कामे करायला ताशी अठ्ठावीस - तीस डॉलरच्या आत माणसे मिळत नाहीत; पण, कसलीच  कागदपत्रे नसलेले बेकायदा मेक्सिकन स्थलांतरित अगदी पंधरा-वीस डॉलर हातावर टेकवले गेले तरी दोन-चार तास राबायला तयार असतात. माउंटन व्ह्यूमधले गुगल असो, कूपरटीनोतले ॲपल असो की आसपासचे श्रीमंत आयटीवाल्यांचे  शाही बंगले; लॉन कापायला  आणि  टॉयलेट्स धुवायला (स्वस्तात मिळणारे) मेक्सिकन लोक लागतात, तोवर ट्रम्पची भिंत कुणालाही अडवून घालू शकणार नाही हे अमेरिकन सत्य इलियास दहा वर्षे जगला होता! 

‘भारतातल्या लोकांनी तर डोनाल्ड ट्रम्पना नावे ठेवण्याचे काही कारणच नाही. सो कॉल्ड सेक्युलर लोकांची पर्वा न करता खणखणीत राष्ट्रवादाचे इंजेक्शन देशाच्या प्रगतीसाठी किती गरजेचे असते, हे भारताने गेली १० वर्षे अनुभवले आहेच... काय?’ - न्यू यॉर्कमध्ये भेटलेले एक (अस्सल मराठी) काका पन्नास वर्षांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यानंतर अजूनही जिभेवर नेमके  टोक असलेल्या  पुणेरी मराठीत मला खडसावून विचारत होते. १९६०-७० च्या दशकात अमेरिकेत नशीब काढायला गेलेल्या आणि तेव्हापासून ‘सेक्युलर’ भारतातल्या हिंदुत्वाच्या गळचेपीचे शल्य सतत मनी बाळगून असलेल्या स्थलांतरित भारतीयांना मायदेशात नरेंद्र मोदी यांच्या उदयाने आधी धीर आला आणि गेल्या १० वर्षांत  त्वेष चढला! हे न्यू यॉर्क काका त्या पिढीचे! ‘बदलत्या जगात देश चालवायचा तर हाही माझा - तोही माझा म्हणणारे बुळबुळीत नेतृत्व उपयोगाचे नाही, त्यासाठी हाती राष्ट्रवादाचा आसूड असलेला खमक्या माणूसच हवा’ यावर ठाम विश्वास असलेल्या या ‘जुन्या’ स्थलांतरित भारतीयांच्या मोदी-प्रेमाने कधी त्यांना  ट्रम्प यांच्या गोटात खेचून घेऊन गेले, त्यांनाही कळले नसावे. 

पूर्वीचे वैभव हरवून बसलेल्या अमेरिकेच्या बोडक्यावर (आणखी) स्थलांतरितांचे ओझे नको, असे म्हणणाऱ्या ट्रम्प यांची भाषा भारतात रुजवलेल्या ‘आपण आणि ते’ या नव्या कथ्याशी जुळणारी... शिवाय स्त्रियांना स्वेच्छा गर्भपाताचा हक्क नाकारण्यातून साधायचे ‘अमेरिकन’ धर्मरक्षणही ‘आतली’ खुटखुट शांतवणारे! डॉट कॉम काळाच्या पूर्वी अमेरिकेत जाऊन स्थिरावलेल्या या पिढीतले (आता) जुने(झालेले) जाणते लोक रिपब्लिकनांकडे वळले; खरेतर, डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोटात सरकले त्याचे पहिले कारण म्हणजे ‘नंतर’ आलेल्या स्थलांतरित भारतीयांनी बख्खळ पैसा कमावून खुद्द गोऱ्या अमेरिकनांच्या पुढेही मारलेली मजल बघण्याने झालेला मत्सराचा दंश आणि नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने मायदेशात बांधलेली स्वधर्मप्रेमाची तोरणे! अमेरिकेतल्या स्थलांतरित भारतीयांच्या पहिल्या पिढीतल्या अनेकांना एच-वन बी व्हिसावर घोळक्यांनी आलेले ‘नवे देसी’ लोक उद्धट वाटतात. आपल्या वाट्याला अमेरिकेने कष्ट दिले आणि या नव्यांच्या पदरात लाखो डॉलर्सची पॅकेजे ओतली याचा एक छुपा त्रासही अनेकांना होतोच. 

आता ग्रीन कार्डाच्या घोळात अडकलेल्यांनी ‘इथे’ अमेरिकेच्या नाकदुऱ्या काढत न बसता लगोलग ‘तिथे’ मोदींच्या सक्षम, समर्थ भारतात जाऊन आपले नवे भविष्य उभारावे, असे त्यातल्या अनेकांचे मत! ‘तिकडल्या’ मोदींवरच्या प्रेमातून ‘इकडल्या’ राष्ट्रवादाच्या लाटेवर स्वार झालेले अमेरिकेतले स्थलांतरित भारतीय दोन गटातले. एका गटात काकांसारखे जुने जाणते लोक आणि दुसऱ्या गटात अमेरिकेत चांगलाच जम  बसवून  आर्थिक ऐश्वर्य संपादल्यानंतर राजकीय वर्चस्व मिळवण्याची तहान लागलेले! हे दोन्ही गट स्थलांतरितांचेच; पण, हिस्पॅनिक्स आणि ब्लॅक्स आदी इतर स्थलांतरितांना ते ‘आपल्यातले’ मानत नाहीत! ‘इंडियन अमेरिकन्स’चा स्वतःचा असा एक सवतासुभा तयार झाला आहे आणि या वर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीत हा गट कोणते राजकीय पर्याय निवडतो, यावर बरेच काही अवलंबून असेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी कितीही आकांडतांडव केले, तरी ते (मेक्सिकन) स्थलांतरितांचे काही बिघडवू शकणार नाहीत, असा विश्वास वाटणारा इलियास एकीकडे आहे आणि दुसरीकडे न्यू यॉर्क काका... आता मध्येच आलेल्या कमला हॅरिस यांच्याबद्दल अमेरिकेतल्या स्थलांतरित समुदायात काय भावना आहेत?- त्याबद्दल पुढल्या शनिवारी!     aparna.velankar@lokmat.com

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प