जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे आणि तो मूल्यवर्धित विक्री (वॅल्यू अॅडेड टॅक्स) आणि सर्व्हिस टॅक्सच्या जागी येणार आहे. वसेक हा उत्पादन, विक्री आणि वापर यावरील राष्ट्रीय पातळीवरील सर्व समावेशक कर असणार आहे. काही अपवाद वगळता सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या व्यवहारांवर हा कर आकारला जाणार आहे. पण याने घाबरून जाण्याचे कारण नाही. जेव्हा ही करप्रणाली लागू होईल, ज्याची अपेक्षित तारीख १ एप्रिल २0१६ आहे, तेव्हा अनेक अप्रत्यक्ष कर रद्द होणार आहेत. याची यादी करायची म्हटली तर ती अशी होईल. ही यादी पूर्ण नाही.केंद्र सरकारचे कर१. सेंंट्रल एक्साईज ड्युटी२. अॅडिशनल एक्साईज ड्युटी३. मेडिसिनल अँड टॉयलेट्रीज प्रिपरेशन अॅक्टनुसार आकारली जाणारी एक्साईज ड्युटी४. सर्विस टॅक्स५. कौंंटरव्हेलिंग ड्युटी६. स्पेशिअल अॅडिशनल ड्युटी (एसएडी)७ सरचार्ज८. सेसराज्य सरकारचे कर१. व्हॅट वा विक्रीकर२. मनोरंजन कर३. लक्झुरी टॅक्स४. लॉटरी, बेटिंग व जुगारावरील कर५. सरचार्ज६. सेस७ आॅक्ट्राय वा एल.बी.टी.८. एंट्री टॅक्सया करप्रणालीत आधी भरलेल्या कराची वजावट (सेट आॅफ) घेण्याची सोय असल्याने करावर कर लागणार नाही. मुंबईतील एका उद्योजकाच्या एका व्यवहाराचे उदाहरण आपण घेऊन ही कर आकारणी कशी होईल ते पाहूअ) उद्योजकाने महाराष्ट्रातील व्यापाऱ्याकडून घेतलेल्या कच्च्या मालाची किंमत ५00ब) त्यावर आकारला गेलेला राज्य वसे कर ८ टक्के ४0क) उद्योजकाने महाराष्ट्राबाहेरील व्यापाऱ्याकडून घेतलेल्या सेवेचे मोल १00ड) त्यावर आकारला गेला केंद्र वसे कर ७ टक्के ७इ) हा माल त्याने महाराष्ट्रातील व्यापाऱ्याला विकला त्याची किंमत ७५0फ) त्यावर आकारला गेला राज्य वसे कर ८ टक्के ६0ह) त्यावर आकारला गेला केंद्र वसे कर ७ टक्के ५२.५0 उद्योजकाने महाराष्ट्र वसे कर भरावयाची रक्कम (फ वजा ब) २0उद्योजकाने केंद्र वसे कर भरावयाची रक्कम (ह वजा ड) ४५.५0
गुड्स आणि सर्व्हिसेस कर कायदा म्हणजे काय?
By admin | Published: December 27, 2014 11:17 PM