शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

खाणी सुरू होण्यातील मुख्य अडचण काय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 4:51 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या खाण प्रश्नात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर खाण व्यवसायाशी संबंधित मंडळी पुन्हा पणजीत धरणे धरून बसली आहेत.

- राजू नायकपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या खाण प्रश्नात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर खाण व्यवसायाशी संबंधित मंडळी पुन्हा पणजीत धरणे धरून बसली आहेत. खाणी पूर्ववत सुरू व्हाव्यात अशी त्यांची मागणी असली तरी त्याच चुकार, भ्रष्ट व न्यायालयाने ठपका ठेवलेल्या कंपन्यांना कायद्याला बगल देऊन खाणी चालवायला द्याव्यात अशी विवेकशून्य, तर्कशून्य मागणी ते करतात. मोदी व केंद्राने त्यांना हात हलवत परत पाठविण्याचे तेच खरे कारण आहे.केवळ हेच तथाकथित खाण अवलंबित्व त्याच खाण कंपन्यांना खाणी सुपूर्द कराव्यात असे म्हणत नाहीत. तर त्यांच्याबरोबर दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळात भाजपाचेही नेते होते. काँग्रेस व इतर राजकीय नेत्यांनीही तीच री ओढली आहे. परंतु त्यातील किती लोकांना खाण कामगार व अवलंबितांचा पुळका आला आहे, माहीत नाही; परंतु प्रत्येकाला खाणचालकांच्या मर्जीत राहायचे आहे हे लपून राहात नाही. कारण सरकार पाडण्याची क्षमता ते बाळगतात व आता तर खाणपट्टय़ातील लोकांना चिथावून लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपशकुन करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. खाण कामगारांचे नेते पुती गावकर तर खाण कंपन्यांच्या तालावर नाचतात व खाणी सुरू करण्यासाठी जे इतर पर्याय आहेत, त्यांचा विचारही करण्याचे त्यांनी नाकारले आहे.गोव्यातील खाणी गेले वर्षभर बंद आहेत. त्यापूर्वीही दोन वर्षे त्या बंद होत्या. त्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी तेव्हा बंद केल्या. आता त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बंद पडल्या. २००७ पासून राज्यात बेकायदेशीररीत्या खाणी चालू असल्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर राज्याला या बेकायदा काळातील उत्खननाचे ६५ हजार कोटी रुपये वसूल करायचे आहेत. त्याबाबत राज्य सरकार अवाक्षर बोलत नाही. त्यामुळे या खाणींविरुद्ध न्यायालयात झुंज देणारे गोवा फाउंडेशनचे क्लॉड आल्वारिस पुन्हा न्यायालयात गेले आहेत. परंतु यापूर्वीचे बेकायदा उत्खननाचे ३५ हजार कोटी रुपये वसूल न करणारे राज्य सरकार नवीन गफल्याबद्दल शहामृगी पवित्र घेऊन बसले आहे.लोह खनिजाच्या खाणी पोर्तुगीज काळापासून - १९४५ पासून चालू आहेत. पोर्तुगीजांनी उद्योगाला चालना देण्यासाठी लिजांचे फुकटात वितरण केले होते. परंतु खरी बरकत या व्यवसायाला आली गोवा मुक्तीनंतर व १९९० च्या दशकात. चिनी बाजारपेठ खुली झाल्यानंतर तर या व्यावसायिकांनी प्रचंड ओरबड केली, पर्यावरणाचा विध्वंस केला, क्षेत्र मर्यादेबाहेर उत्खनन केले व नियमबाह्य पद्धतीनेही निर्यात केली. बेकायदा खाणींच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने शहा आयोगाची स्थापना केली तेव्हा गोव्यातील खाणचालकांचा खरा चेहरा उघड झाला. वर्षाकाठी २५ हजार कोटींचा नफा ते कमावत. राज्याच्या नैसर्गिक संसाधनांची लूट करून व त्या बदल्यात राज्याला अत्यंत तुटपुंजा महसूल देत. परंतु राज्य सरकारे दबली त्यांच्यातील थैल्यांच्या प्रभावाने. कारण, या कंपन्यांचा महसूल राज्याच्या अर्थसंकल्पापेक्षा तीन पटींनी अधिक आहे.२००७ पासून बंद पडलेल्या खाणी सुरू करण्यासाठी राज्य सरकारने एक तर महामंडळ स्थापन करावे किंवा खाणींचा लिलाव पुकारावा असे दोन पर्याय खुले आहेत. परंतु, राज्यातील खाणचालकांना त्या फुकटात पदरात पाडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी त्यांना जुना पोर्तुगीज कायदा ज्याला कन्सेशन्स म्हणत, पूर्वलक्षी प्रभावाने १९८७ पासून लागू झालेला पाहिजे. त्यानुसार लिलावाची व देशातील प्रमुख कंपन्यांशी स्पर्धा करण्याची आवश्यकता त्यांना राहाणार नाही. परंतु तसे केले तर नवीन एमएमडीआर कायद्याला बगल दिली असे होऊन सर्वोच्च न्यायालय बडगा हाणोल अशी केंद्राला भीती आहे.(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत. )

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळा