शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

विराट कोहलीकडून काय शिकावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 7:40 AM

एकदिवसीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक ४९ शतकांची बरोबरी करून विराट कोहली आता शतकांच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक ४९ शतकांची बरोबरी करून विराट कोहली आता शतकांच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. एक शतक झाल्यास तो सचिनच्या या विक्रमाला मागे सोडेल. या खेळाडूत असे काय आहे... कोणत्या टेक्निक विराट वापरतो... एवढी ऊर्जा येते कुठून... विराटकडून खेळाडू तर शिकतीलच.. पण आपल्यालाही आपल्या क्षेत्रात असेच ‘विराट’ व्हायचे असेल तर काय करावे लागेल? विराटकडून काय शिकता येईल?

इच्छाशक्तीदीड दशकातील विराट कोहलीचा खेळ पाहिला असेल, तर तो प्रचंड इच्छाशक्ती असलेला खेळाडू असल्याचे जाणवेल. याच कारणामुळे तो फलंदाजीत अनेक विक्रम मोडत आहे. क्रिकेटमध्ये एवढा काळ टिकून राहणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही स्वत:ला सिद्ध करणे, हे प्रबळ इच्छाशक्तीचे उदाहरण आहे. फिटनेस, खेळावरील नियंत्रण आणि धावांचा वर्षाव हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे गुण त्याने दाखवून दिले आहेत. वडिलांच्या निधनावेळी विराट कोहली पहिल्यांदा रणजी ट्रॉफी सामना खेळायला गेला, तेव्हा तो देशभरात चर्चेत आला होता. त्यावेळी त्याने शतक झळकावले आणि तेथून थेट वडिलांच्या अंत्यसंस्काराला गेला.

फिटनेसविराट कोहली हा कमालीचा फिटनेसफ्रीक. कधीकाळी त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी पाहिल्या तर कुणी यावर विश्वास ठेवणार नाही. त्याचे सहकारी क्रिकेटपटूही म्हणायचे की, तो फिटनेसबाबत गंभीर नाही. पण, गॅरी कर्स्टन भारतीय संघाचे प्रशिक्षक झाल्यावर विराट फिटनेसबद्दल इतका गंभीर झाला, की अनेक आवडीच्या पदार्थांना त्याने रामराम ठोकला. केवळ शाकाहारी नव्हे, तर तो विगन (Vegan)  आहे. फिटनेससाठी पूरक असलेले पदार्थच तो खातो. नियमित जिम आणि कठोर सराव, हे त्याच्या फिटनेसचे गमक आहे. कारण फिटनेस असेल तर सर्व आहे.

तंत्रशुद्ध असणेतंत्रशुद्ध पद्धतीने खेळाची शैली विराटमध्ये दिसते. त्याने लगावलेले चौकार, षटकार तसेच खास शैलीत मारलेले आक्रमक फटके याचे अनेकजण चाहते आहेत. शैली आणि तंत्रशुद्ध खेळ ही त्याची खासीयत. आपल्या प्रत्येक कामातील तंत्र आणि त्यात पारंगत असणे किती महत्त्वाचे असते याचे विराट उत्तम उताहरण आहे. 

खेळावरील नियंत्रणविराट जेव्हा फलंदाजीला उतरतो, तेव्हा त्याचे बॅटसह चेंडूवर पूर्ण नियंत्रण असते. प्रतिकूल परिस्थितीतही प्रतिस्पर्धी संघासमोर टिकून राहण्याची कला त्याच्याकडे आहे. लयबद्ध फलंदाजी करत तो खेळ नियंत्रणात आणतो. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता त्या स्थितीवर कसा विजय मिळवायचा हे विराटकडून शिकण्यासारखे.

स्वयंशिस्तशिस्तबद्ध असाल तरच दीर्घकाळ खेळू शकता आणि दीर्घ कारकीर्द घडवू शकता, हा गुण विराटकडून घेण्यासारखा आहे. नेट प्रॅक्टिसमध्ये तो कधीच गैरहजर राहत नाही. झोपण्याची व उठण्याची त्याची वेळ ठरलेली. त्यात कधीच तडजोड नाही. आपल्या खेळाला त्याने कडक शिस्त लावली. याच शिस्तीने त्याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून घडवले आहे. ही शिस्त प्रत्येकात असणे गरजेचे.

 

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघ