शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

मुलांचा जीव घेणाऱ्या ऑनलाइन गेम्सचे काय करायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2024 8:12 AM

मुलांना ऑनलाइन गेमिंग इतके आकर्षक का वाटते? - कारण, गेमिंग करताना मेंदूमध्ये स्त्रवणारे डोपामाइन हे मनाला आनंदाची जाणीव देणारे हार्मोन!

गुंजन कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ

पुण्यातल्या पिंपरी भागात एका १५ वर्षाच्या मुलाने ऑनलाइन गेमिंगच्या नादात १४ व्या मजल्याच्या बाल्कनीतून उडी मारली, त्यात त्याचा मृत्यू झाला. अस्वस्थ करणारी ही भयानक घटना. व्हिडीओ व ऑनलाइन गेमिंग  या व्यवसायाचे भारत हे जगातील सर्वांत मोठे मार्केट आहे. भारतातील सहजपणे इंटरनेट उपलब्ध असणाऱ्यांपैकी ६०% किशोरवयीन  मुले रोज ३ तासांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगमध्ये व्यतीत करतात. 

किशोरवयामध्ये मुलांच्या मेंदूमध्ये अनेक बदल होत असतात. नवीन न्यूरॉन्सची जोडणी होत असते. समस्या सोडवणे, निर्णय घेणे, सारासार विचार करणे अशी क्लिष्ट आणि आयुष्यभर उपयोगी पडणारी कौशल्ये आत्मसात करण्याची प्रक्रिया या वयात मेंदूमध्ये होत असते. काही अंशी ही जीवनकौशल्ये गेमिंगच्या माध्यमातून शिकता येऊ शकतात; पण या उपयुक्ततेला खूप मर्यादा आहेत. गेमिंग कंपन्यांना आपल्या मुलांच्या मेंदूच्या विकासाशी फारसे देणे-घेणे नसते. त्यांच्यासाठी जितक्या लहान वयात जितकी अधिक मुले वेळ, ऊर्जा आणि पैसा गुंतवतील तितका त्यांचा आर्थिक आलेख वाढत असतो. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या कंपन्या लक्ष खेचून घेणारे, जास्तीत जास्त काळ गुंतवून ठेवणारे गेमिंग फिचर्स मार्केटमध्ये आणत राहतात. किशोरवयीन मुले तर त्यांचे खूप महत्त्वाचे ग्राहक आहेत. कारण त्यांचे लक्ष खेचून घेणे सोपे असते.

मुलांना हे गेम्स इतके आकर्षक का वाटतात? - कारण, गेमिंग करताना मेंदूमध्ये स्त्रवणारे डोपामाइन हे मनाला आनंदाची जाणीव देणारे हॉर्मोन. एखाद्या कृतीला ताबडतोब काहीतरी बक्षीस (गेममध्ये पॉइंट्स, स्पेशल पॉवर्स, वेपन्स, सोशल मीडियावर लाइक्स, हार्ट्स, टॅग्ज) मिळत गेले तर ही जाणीव वारंवार होत राहते. ती जाणीव सतत हवीहवीशी वाटत राहते. काही काळाने त्यासाठी अजून मोठ्या उत्तेजनाची (पुढची लेव्हल विकत घेण्याचे फिचर्स) गरज निर्माण होत जाते. या मानवी प्रवृत्तीचा पद्धतशीर विचार करून व्हिडीओ गेम्स डिझाइन केले जातात. गेमिंगमध्ये खूप वेळ घालवणाऱ्या व्यक्तींच्या हे लक्षात येत नाही की, कालांतराने ‘ते गेम खेळत नसतात, तर गेम त्यांना खेळवत असतो.’ 

तासनतास ऑनलाइन गेमिंग खेळणाऱ्या मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, रोजचे आयुष्य अतिशय नीरस वाटू लागते. भावनिकदृष्ट्याही ती कमकुवत होत जातात.  गेम्समधली हिंसा त्यांच्या वागण्यात आक्रमकता आणू शकते. मुलांचा आपल्या विचारांवर, वागण्यावर ताबा राहत नाही.ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म्सचा अजून एक मोठा धोका म्हणजे सायबर क्राइम. मुले बऱ्याचदा आपली खासगी माहिती इंटरनेटवर देतात,  फोटो पाठवतात, काही वेळा पालकांपासून लपवून पैशांचे व्यवहार करतात. हे सगळे किती धोकादायक असू शकते, याची त्यांना या वयात जाणीव नसते.

पालक, शिक्षक काय करू शकतात? 

आपले मूल इंटरनेटवर काय करते याबाबत सतर्क राहा. गरज असेल तिथे तंत्रज्ञानाची माहिती असणाऱ्या मित्रमंडळींची मदत घ्या. मुलांशी गेमिंगबद्दल मोकळेपणाने आणि स्पष्ट बोला. मुलांची काही कौशल्ये विकसित करण्यासाठी गेमिंगचा चांगला वापर करून घेता येईल का, याचा विचार करा. स्क्रीन, इंटरनेट, गेमिंगच्या पलीकडच्या प्रत्यक्ष जगाचे एक्स्पोजर मुलांना सातत्याने मिळेल, यासाठी प्रयत्नशील राहा. ट्रेकिंग, कॅम्पिंग, प्रवास, स्पर्धात्मक  खेळ, घरातली कामे, बँकेचे व्यवहार, आर्थिक नियोजन अशा कृतींतून मुलांची जीवनावश्यक कौशल्ये विकसित होऊ शकतात. फक्त ‘गेम खेळू नको, अभ्यास कर’ हे वाक्य वारंवार ऐकवून काही साधणार नाही. वर उल्लेख केलेली काही लक्षणे मुलांमध्ये दिसत असतील; त्याविषयी चिंता वाटत असेल तर मानसिक आरोग्यातील तज्ज्ञांची (सायकॉलॉजिस्ट, सायकिॲट्रिस्ट) मदत घ्या.gunjan.mhc@gmail.com

 

टॅग्स :Puneपुणे