शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

हेवेदावे आणि विद्वेषाने काय साधेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 7:54 AM

पक्षाच्या गाडीतून एक रामराव उतरले, तर दोन शामराव चढतात; राजकीय संस्कृतीचा आणखी किती चुथडा करणार?

यदू जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

एकनाथ खडसे शुक्रवारी वाजतगाजत राष्ट्रवादीत गेले. पाहुण्याच्या काठीने साप मारण्याची संधी राष्ट्रवादीला मिळाली. आता खडसे रोज देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतील. ‘योग्यवेळी बोलेन’ असे म्हणत फडणवीस शांत राहतील. प्रत्येक आरोपाचं उत्तर देत बसणार नाहीत, कारण तो फडणवीसांचा स्वभाव नाही. एखाद दिवशी एक घाव दोन तुकडे करतील. खडसे पक्षात राहून फडणवीसांवर आरोप करायचे; त्याच्या मोठ्या बातम्या व्हायच्या; पण आता राष्ट्रवादीत बसून ते आरोप करतील तेव्हा धार हळूहळू बोथट होत जाईल. ‘तुमचाच माणूस तुमच्या अंगावर घातला’ हा आनंद मात्र राष्ट्रवादीला मिळेल. 

 भाजपकडून राजकीय पुनर्वसनाचा कोणताही शब्द मिळत नसल्याच्या अस्वस्थतेतून खडसे राष्ट्रवादीत गेले. फडणवीस-चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीला विचारणा केली की खडसेंना काय शब्द द्यायचा?- दिल्लीहून निरोप आला की आतापर्यंत त्यांना खूप काही दिले, आता काहीही देण्याची गरज नाही. तिथेच भाजपमधील खडसेंचा विषय संपला. खा.रक्षा खडसे हुशार आहेत. त्या सासरेबुवांबरोबर गेल्या नाहीत. उद्या त्या खडसेंपेक्षा स्वत:ची रेषा मोठी करतील. खडसे सोडून गेल्याने भाजपचा ओबीसी जनाधार तुटला वगैरे विश्लेषणात फार अर्थ नाही. मोठ्या पक्षाच्या गाडीतून एक रामराव उतरले तर दोन शामराव चढतात! 

यानिमित्ताने एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. महाराष्ट्रात एकमेकांना पाण्यात पाहण्याचं राजकारण सुरू झालं आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्येची सीबीआय चौकशी, जलयुक्त शिवारची चौकशी असो की समृद्धी महामार्गालगतच्या जमिनींच्या व्यवहारांची चौकशी हे सगळं वैयक्तिक हेवेदावे आणि विद्वेषातून घडत आहे. कधी उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे तर कधी फडणवीस यांना टार्गेट करून हे चाललं आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती ही पक्षीय भेदांपलीकडे जाऊन मैत्र जपण्याची होती; पण आज ती राहिलेली दिसत नाही. कथित सेक्युलर लोकांनी काय काय म्हणून मोदींचा द्वेष केला! पण त्यातून काय झालं?- मोदी हिरो झाले. २०१९च्या निवडणुकीत, ‘समोर कोणी शत्रूच दिसत नाही’ अशा वल्गना केल्या गेल्या. शरद पवारांच्या अंगावर ईडी सोडली गेली, काय झालं?- पवार हिरो झाले. आता फडणवीसांबाबत तेच होत आहे. फडणवीसांबद्दलचा राग हा ‘किमान समान कार्यक्रम’ झाला आहे. त्यांना दिल्लीत पाठविण्याची घाई उद्धव ठाकरेंना झालेली दिसते. फडणवीस मुंबई, राज्याच्या राजकारणात नसल्याचे फायदे त्यांना माहिती असावेत. उद्या फडणवीस दिल्लीत गेले तर भाजपमधील आयाराम एकेक करून गयाराम होतील. फडणवीस कुठल्याही क्षणी पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात या एका जबरदस्त आशेनं सर्वांना बांधून ठेवलेलं आहे. ते दिल्लीकडे उडाले की राष्ट्रवादी भाजपवर जाळं टाकेल. 

नॉनस्टॉप अजितदादा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा सपाटा सगळ्यांनाच ठाऊक आहे. सकाळी ७ पासून ते लोकांना भेटतात. वेळेचे फार पक्के आहेत. गुरुवारी आधी बातमी पसरली की त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पण नंतर पार्थ पवारांनी खुलासा केला की ते कोरोना पॉझिटिव्ह नाहीत तर त्यांनी स्वत:ला क्वाॅरण्टाइन करून घेतले आहे. 

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी अजितदादा हजर राहू शकले नाहीत. मात्र, त्याचवेळी ते घरी बसून सर्व कार्यालयीन काम करीत होतेच. बरोबर खडसेंच्या प्रवेशावेळीच दादा क्वॉरंटाइन झाले हा योगायोग समजावा, त्यात बातमी शोधू नये. 

अजितदादांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणारं ट्विट केलं. मागे पंडित दीनदयाल उपाध्यायना आदरांजली वाहणारं ट्विट त्यांनी नंतर डिलीट केलं होतं, अमितभाईंच्या अभिनंदनाचं ट्विट मात्र तसंच ठेवलं. दादा सध्या अशी भाजपशी जवळीक का दाखवत असावेत?

थांबा-भेटा-नियुक्ती घ्या! गृह विभागात सध्या थांबा-भेटा-नियुक्ती घ्या अशी काही योजना लागू झाली आहे का? या योजनेंतर्गत विशिष्ट जागेवर विशिष्ट अधिकाऱ्याची बदली केली जाते; पण जो बदलून जातो त्याच्या नवीन बदलीचं ठिकाण न दाखवता त्याच्या नावासमोर ‘बदली आदेशाधिन’ असं दाखविण्यात येतं. निम्म्या अधिकाऱ्यांच्या नावांसमोर कसलाच उल्लेख नसतो. नियुक्तीविना कासावीस झालेले अधिकारी चातकाप्रमाणे बदलीची प्रतीक्षा करतात आणि गाठीभेटी संस्कृती सुरू होते. पोलिसांच्या बदल्यांना पाचवेळा मुदतवाढ मिळूनही हे सुरू आहे. ज्याचं पारडं (पलांडे नाही बरं) भारी त्याला इच्छित जागा मिळते. राजकीय दबाव आणि हस्तक्षेपाला कंटाळलेले पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे दिल्लीत प्रतिनियुक्तीवर जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणeknath khadseएकनाथ खडसेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस