शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

मनात विचार आला रे आला की स्क्रीनवर (आपोआप) उमटलाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 10:12 AM

आता तंत्रज्ञ ‘ब्रेन-टू-टेक्स्ट इंटरफेस’चा विकास करीत असून, त्याद्वारे वापरकर्त्याच्या मनातले विचार (टाइप न करताच) थेट स्क्रीनवर उमटवणे शक्य होणार आहे.

- डॉ. दीपक शिकारपूर(उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक)

मनी वसे ते स्वप्नी दिसे हे जुनं झालं... आता काही वर्षातच आपले विचार आपल्याला थेट पडद्यावर दिसू शकतील. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ  स्टीफन हॉकिंग ह्यांनी शारीरिक दुर्बलतेवर केवळ इच्छाशक्ती व तंत्रज्ञानामुळे मात केली. तेच तंत्रज्ञान याच दशकाच्या अखेरीस आपल्या स्मार्टफोन, टॅबलेट वा संगणकाला मिळू शकेल. लॅपटॉप किंवा पीसीचा मोठा कीबोर्ड असेल तर टायपिंग बऱ्यापैकी सोपे बनते. मात्र, स्मार्टफोनचा (किंवा टॅबचादेखील) कळफलक मर्यादित आकाराचा असतो आणि त्यावरच्या कीज् जवळजवळ असल्याने त्यावरून वेगाने टायपिंग करणे अनेकांना जमत नाही. मनातले विचार (मनाच्याच गतीने) पुढे धावत असतात आणि त्यांना बोटांनी टायपिंग करून मूर्त स्वरूपात आणेस्तोवर त्यातले निम्मे विस्मृतीत जातात, असा अनुभव अनेकांना येतो. 

आता  तंत्रज्ञ ‘ब्रेन-टू-टेक्स्ट इंटरफेस’चा विकास करीत असून त्याद्वारे वापरकर्त्याच्या मनातले विचार (टाइप न करताच) थेट स्क्रीनवर उमटवणे शक्य होणार आहे.  मेंदू संगणक संवाद (ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस)  तंत्रज्ञान मानवी मस्तिष्काच्या विद्युत क्रियाकलापांचे मोजमाप करण्यासाठी मस्तिष्क-सेंसर वापरते. हे सेंसर मस्तिष्काच्या पृष्ठभागावर किंवा खोलवर ठेवले जाऊ शकतात. मस्तिष्काच्या विद्युत क्रियाकलापांचे मोजमाप करून, हे  तंत्रज्ञान संगणकाला मानवी विचार आणि भावना ओळखण्यास आणि नियंत्रित करण्यास अनुमती देते. पंचेंद्रियांमार्फत मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करण्याची मानवी मेंदूची क्षमता अफाट आहे. संगणकीय भाषेतच सांगायचे तर दर सेकंदाला चार एच-डी मूव्हीजचे स्ट्रीमिंग करण्याइतकी; परंतु, माहितीचा इतका मोठा धबधबा हाताळण्याची क्षमता संगणकीय यंत्रणेमध्ये नसल्यामुळे बोलण्यातून व्यक्त होऊ शकणाऱ्या डेटाचा वेग एखाद्या १९८० मधल्या मोडेमइतकाच असतो. ही मर्यादा पार करण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये उत्पन्न होणाऱ्या विद्युत संदेशांची सांगड हार्डवेअरशी घालणे आवश्यक आहे. असे वेअरेबल (शरीरात किंवा शरीरावर बसवून वापरण्याजोगे) उपकरण छोटे, कमी वजनाचे आणि सहजपणे व स्वस्तात उत्पादन करण्यायोग्यही असले पाहिजे. या सर्व घटकांचे संतुलन साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे साध्य झाले की आपण स्मार्टफोनवरील सध्याच्या टायपिंगच्या सर्वसाधारण वेगाच्या पाचपट अधिक वेगाने (मिनिटाला शंभरपेक्षा जास्त शब्द) टायपिंग करू शकू. 

- याखेरीज हे तंत्रज्ञान ऑगमेंटेड रिॲलिटी इंटरफेस म्हणूनही काम करू शकेल. मेंदूतील विविध क्रिया-प्रक्रियांची नोंद घेऊन त्यांचे मोजमाप करणारे व त्यांचे रूपांतर लिखित स्वरूपात सादर करू शकणारे संवेदक (सेन्सर्स) प्रयोगशाळेत तयार केले जात आहेत. अशा परस्पर संवादासाठी वापरकर्त्याच्या त्वचेचाही उपयोग करून घेता येईल काय याची चाचपणी सुरू आहे व यासाठी अंध व्यक्ती वाचण्यासाठी वापरत असलेल्या ब्रेल तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातो आहे. त्वचेखाली चेतापेशींची टोके (नर्व्ह एंडिंग्ज) असतातच, त्यांना उद्दिपित करून त्यामार्फत संवाद चालवण्याची योजना आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून, शारीरिक अपंगत्व असलेल्या लोकांना त्यांच्या मर्यादेवर मात  करण्यास  मदत केली जाऊ शकते.  व्हीलचेअर चालवणे, संगणकावर टाइप करणे आणि फोन वापरणे यासारख्या गोष्टी दिव्यांगांना करणे शक्य आहे.

थिंकएक्स्प्लोअर (ThinkExplore) कंपनीच्या माइंडस्केप होम या संकल्पनेनुसार, व्हर्चुअल रिॲलिटी / ऑगमेंटेड रिॲलिटी या तंत्रप्रणालीचा वापर करून व ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’च्या माध्यमातून, घरातील सर्व साधने आपण निव्वळ विचारांवर चालवू शकता. संबंधित साधनांकडे (उदा. टीव्ही, दिवे, थर्मोस्टॅट इ.) पाहून फक्त मनाने त्याला आज्ञा द्यायची एवढेच करायचे!

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान