शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गर्दीतील विकृतपणा थांबणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 2:46 AM

मुंबईत गर्दी हा सार्वत्रिक विषय आहे. गर्दीचे व्यवस्थापन हे मुंबईतील मोठे आव्हान आहे. या गर्दीत काही विकृत लोक स्पर्शसुखासाठी काहीही करण्यास तयार होतात.

- अमर मोहितेमुंबईत गर्दी हा सार्वत्रिक विषय आहे. गर्दीचे व्यवस्थापन हे मुंबईतील मोठे आव्हान आहे. या गर्दीत काही विकृत लोक स्पर्शसुखासाठी काहीही करण्यास तयार होतात. त्यातून महिलांची होणारी कुंचबणा आता कुठेतरी थांबण्याची गरज आहे. महिला, मुलींना रेल्वे प्रवास, रेल्वे स्थानके व रेल्वे पुलांवरील गर्दीत होणारे वाईट स्पर्श हा विषय काही नवीन नाही़ अनेक वेळा अशा स्पर्शांबाबत बोलले जाते, चर्चाही होते़ घरात नसली, तरी मित्र-मैत्रिणींशी हे विषय हमखास शेअर होतात. हा विकृतपणा थांबण्याची गरज आहे.मुंबईत सर्वच रेल्वे पूल निमुळते आहेत़ या पुलांवर कार्यालयीन वेळेत चालणे म्हणजे महिला, मुलींसाठी दिव्यच असते़ आॅफिस, शाळा, कॉलेजला जाण्याच्या घाईमुळे गर्दीत मार्ग काढत महिला, मुली ये-जा करत असतात़ या मार्गात गैरफायदा घेणारे अनेक जण तग धरून उभे असतात़ बहुतांश वेळा वाईट स्पर्शाचा अनुभव येऊनही महिला, मुलींना प्रतिकार करायलाही वेळ नसतो़ असे स्पर्श होत असताना त्याकडे केवळ बघ्याची भूमिका घेणारे प्रवासीही आहेत. गर्दीत होणारा स्पर्श सांगणे व सिद्ध करणे हेही तसे किचकट काम आहे़एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांवरील घटनेनंतर मुंबईतील गर्दीवर पुन्हा नव्याने विचारमंथन सुरू झाले आहे. गर्दी किती घातक ठरू शकते, याचा भयानक अनुभव मुंबईकरांनी या निमित्ताने घेतला आहे. गर्दीत महिला, मुलींना येणाºया वाईट अनुभवांवर सर्वांचेच तूर्त तरी मौनच आहे़ रेल्वे पुलावर असणा-या गर्दीत महिला, मुलींना सांगता न येणासारखे अनुभव येतात़ गर्दीचा फायदा घेत महिला, मुलींना कोठेही व कसाही स्पर्श करण्याची मजल अनेकांची जाते. काही धाडसी महिला, मुली याला सडेतोड उत्तर देत विरोधही करतात़ हे अनुभव काही नवीन नाहीत़, पण अशी कृत्ये थांबत नाहीत़ अशा अनुभवांना कसे उत्तर द्यावे किंवा त्याचा प्रतिकार कसा करावा, यासाठी ठोस अशी पावले अजूनही प्रभावीपणे उचलली गेलेली नाहीत़ कायद्यामध्ये विनयभंगाच्या व्याख्येत काही कृत्ये शिक्षेस पात्र आहेत़ महिलेकडे एकटक बघणे, तिच्यासमोर आक्षेपार्ह हावभाव करणे, ही कृत्य शिक्षेस पात्र आहेत़़ ही कृत्ये सबळ पुराव्याने सिद्ध करावी लागतात़ मुलीचा तिच्या इच्छेविरुद्ध हात पकडणेही गुन्हाच आहे़ या कायदेशीर बाबीत महिला, मुलीने पुढे येऊन गर्दीत होणाºया वाईट अनुभवांची पोलिसांत तक्रार केली, अशा आरोपीला शिक्षा झाली, असे तूर्त तरी एकही उदाहरण नाही़ रेल्वे स्थानकात गर्दुल्ल्यांची संख्या अधिक असते़ रेल्वे अपघतातील मृतदेह उचलण्यासाठी गर्दुल्ल्यांचा वापर केला जातो़ हेच गर्दुल्ले महिलांवर सर्रास हल्ला करतात़ महिला प्रवाशांवर हल्ला झाल्याच्या घटनाही वारंवार घडतच असतात़ तरीही त्यावर ठोस तोडगा काढला गेला नाही़ काही दिवसांपूर्वी चर्चगेट स्थानकावर एका मुलीचा विनयभंग झाला़ तरुणाने अगदी सहजपणे पीडितेजवळ जाऊन विनयभंग केला़ सीसीटीव्ही कॅमेºयांमुळे ही घटना उघडकीस आली़ अशी गंभीर घटना घडल्यानंतरही प्रवासात महिलांना येणाºया वाईट अनुभवांसाठी ठोस उपाययोजना करायला हवी, असे रेल्वे प्रशासनाला वाटत नाही़ सामाजिक संघटना किंवा अन्य कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला याविषयी प्रबोधन अथवा ठोस कार्यक्रम आखावा, असे सूचले नाही़ एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर गर्दी आणि चेंगराचेंगरीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे़ या निमित्ताने तरी महिला, मुलींना होणारे वाईट स्पर्श रोखण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या ठोस असे काही केले जाईल, अशी अपेक्षा करू या!

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल