शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

सुनीता विलियम्स यांची अंतराळातून सुटका कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 9:21 AM

परतीच्या वाहनात बिघाड झाल्याने अंतराळवीर अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

- डॉ. नंदकुमार कामत(वैज्ञानिक, गोवा)

अंतराळवीर सुनीता विलियम्स या नासाच्या अनुभवी अंतराळवीर असून, त्यांच्या गाठीशी अवकाशातील वास्तव्याचा भरपूर अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये - स्पेस स्टेशन त्या सध्या असून, तिथले काम संपवून पृथ्वीवर त्यांच्या परत येण्यात अनपेक्षितरीत्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. पृथ्वीवर परत येण्याचा त्यांचा कार्यक्रम ठरला होता; परंतु बोइंग स्टारलायनर या यानात काही गंभीर समस्या उत्पन्न झाल्याने त्यांना अंतराळ स्थानकातून निघता आले नाही. परतीच्या वाहनातील बिघाड हे  सुनीताच्या परत न येऊ शकण्यामागील प्राथमिक कारण आहे. या वाहनातून सुनीता आणि तिच्याबरोबरचे अन्य सदस्य पृथ्वीवर परत येणार होते. 

अवकाश केंद्रापासून विलग होण्यापूर्वी अभियंत्यांनी ठरल्याप्रमाणे चाचणी घेतली असता परतीच्या वाहनात त्यांना बिघाड आढळला. या बिघाडामुळे वाहन खाली येऊन त्याने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणे दुष्कर झाले असते. वाहनाच्या ड्रंको थ्रस्टर्समध्ये हा विधाड असून, यानाची दिशा आणि प्रवास यावर या भ्रस्टर्सचे नियंत्रण असते. त्यांच्या कामात अनियमितता आढळली. पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा प्रवेश करताना हे यान योग्य प्रकारे काम करणार नाही असे त्यातून सूचित झाले. या बिघाडामुळे अंतराळवीरांची सुरक्षितता धोक्यात आली असती. परिणामी, नासाने या समस्येचा अभ्यास करून हा प्रश्न सोडवल्याशिवाय अंतराळवीरांच्या परतीची मोहीम हाती न घेण्याचा निर्णय घेतला. सुनीता विलियम्स आणि इतरांना परत आणण्यासाठी नेमके कोणते पर्याय उपलब्ध आहेत? 

भ्रमण चालू असताना दुरुस्ती नासाचे अभियंते यानाची भ्रमंती चालू असताना ड्रंको भ्रस्टर्स दुरुस्त करता येतील का, याची शक्यता अजमावत आहेत. आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी अंतराळ केंद्रात उपलब्ध असलेले सुटे भाग आणि अन्य अवजारांचा वापर करण्यासंबंधीची सूचना सुनीता विलियम्स आणि इतर सहकाऱ्यांना दिली जाईल. या मोहिमेचा पृथ्वीवरील नियंत्रण कक्ष गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून याविषयी मार्गदर्शन करील, परंतु अवकाशात हूँको भ्रस्टर्सची अशी दुरुस्ती करणे शक्य आहे काय, हे लक्षात घेऊन तसेच सुट्या भागांच्या उपलब्धतेवर हे काम अवलंबून आहे. 

मदतीसाठी यान पाठवणे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नासा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दूसरे परतीचे वाहन पाठविण्याची तयारी करत आहे. हे यान पृथ्वीवरून पाठवले जाईल आणि अवकाश केंद्राशी जोडले जाईल, जेणेकरून सर्व अंतराळवीर सुखरूपपणे परत येऊ शकतील. अर्थात या मार्गाने प्रश्न सोडवण्यास कालावधी लागेल. मात्र, परतीच्या वाहनात झालेला बिघाड दुरुस्त करण्यापेक्षा हा पर्याय अधिक सुरक्षित आणि उपयोगाचा आहे. त्यामुळे हा पर्यायही तपासून पाहिला जात आहे. 

रशियन सोयूझ यानाचा वापर रशियाचे सोयूझ यान आणीबाणीच्या काळात पर्याय म्हणून वापरण्यासाठीचे वाहन म्हणून अवकाश केंद्रात जोडलेले असते. या यानाचा वापर करणे हा एक पर्याय ठरू शकतो. सोयूझ एका वेळी तीन अंतराळवीरांना घेऊन येऊ शकते. आवश्यक तर एकापेक्षा अधिक फैन्य करून अंतराळ स्थानकात अडकलेल्या सर्वांना परत आणता येईल. सुनीता विलियम्स मात्र पहिल्या फेरीत परत निघतील, हा पर्याय स्वीकारावयाचा झाल्यास नासा आणि रशियाची अवकाश संस्था रॉसकॉसमॉस यांच्यात समन्वय ठेवावा लागेल. 

सुरक्षित परिस्थिती निर्माण होण्याची प्रतीक्षा दुरुस्ती किंवा अन्य पर्यायांचा विचार चालू असताना सुनीता विलियम्स आणि अन्य सहकारी अवकाश केंद्रात राहू शकतात, अन्न, वैद्यकीय सुविधा यासह जास्त काळ मुक्काम करण्याची व्यवस्था अंतराळ केंद्रात आहे. त्यामुळे या सर्व अंतराळवीरांचा परतीचा प्रवास सुखरूप होणार असेल तरच तो सुरू केला जाईल. परतीच्या वाहनात विधाड झाल्यामुळे सुनीता विलियम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे परतणे लांबले आहे हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. 

ही समस्या अतिशय गंभीर असल्यामुळे नासा आणि अन्य आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांच्या सहयोगाने प्रश्न सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न चालला आहे. भ्रमण कक्षेत दुरुस्ती, परतीचे दुसरे वाहन पाठवणे किंवा रशियन वाहन वापरणे यापैकी एखाद्या पर्यायाचा वापर करून सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्वांना परत आणले जाईल, नासामधील कुशाग्र बुद्धीचे लोक हा प्रश्न सोडविण्यात गुंतलेले आहेत. एकूणात काय, अंतराळ स्थानकात सध्या तरी सगळे काही ठिकठाक असून सुनीता विलियम्स अजिबात वेळ वाया घालवताना दिसत नाहीत.

टॅग्स :NASAनासा