शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

कधी घेणार आम्ही धडे ?

By रवी ताले | Published: February 27, 2018 12:37 AM

एका झोपडीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली अन् मग स्फोटांची मालिकाच सुरू झाली. एका मागोमाग एक ११ सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि बघता-बघता तब्बल ५४ झोपड्या स्वाहा झाल्या.

अकोला शहरातील मातानगर झोपडपट्टीत गत गुरुवारी भीषण अग्नितांडव घडले. एका झोपडीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली अन् मग स्फोटांची मालिकाच सुरू झाली. एका मागोमाग एक ११ सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि बघता-बघता तब्बल ५४ झोपड्या स्वाहा झाल्या. सुदैवाने जीवित हानी झाली नाही; पण मोठ्या संख्येने कुटुंबे उघड्यावर आली, ही वस्तुस्थिती शिल्लक उरतेच!गंभीर बाब म्हणजे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबांमध्ये पाणी भरण्यासाठीचा ‘हायड्रंट’च बंद पडलेला होता. त्यामुळे बंब रिकामे झाल्यावर पुन्हा पाणी भरून आणण्यासाठी खूप धावपळ उडाली आणि अमूल्य वेळ वाया गेला. ही अत्यंत अक्षम्य स्वरूपाची हलगर्जी म्हणावी लागेल; पण हा मजकूर लिहित असताना तरी त्यासाठीची जबाबदारी निश्चित झालेली नव्हती!अलीकडे लहान-मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांना आगी लागण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त व जीवित हानी होत असते. पुढचे काही दिवस त्यावर चर्चा होते, उपाययोजनांसंदर्भात गप्पा झडतात आणि काही दिवसांतच त्या घटनेचा विसर पडतो!गत काही वर्षांपासून जगभर लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये केंद्रीकरण होऊ लागले आहे. रोजगारासाठी लोक शहरांमध्ये येतात आणि नाईलाजास्तव झोपडपट्ट्यांचा आसरा घेतात. तेथील झोपड्या अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या असतात. साहजिकच आग लागल्यास ती फार झपाट्याने पसरते आणि रस्त्यांच्या अभावामुळे अग्निशमन विभागाचे काम कठीण होऊन बसते.अपघात पूर्णत: टाळणे कधीच शक्य नसते; पण किमान त्यांची वारंवारिता कमी करणे आणि अपघात झालाच, तर हानीचे प्रमाण किमान पातळीवर राखण्यासाठी उपाययोजना करणे शक्य असते. त्यासाठी उदाहरणांवरून धडे घेण्याची आणि त्या अनुषंगाने भविष्यासाठी तयारी करण्याची गरज असते. नेमके इथेच आपण कमी पडतो.अकोल्याच्या आगीचेच उदाहरण घ्या! शहरातील एकमेव ‘हायड्रंट’ शहराच्या मध्यभागी वर्दळीच्या ठिकाणी आहे. शहराच्या विविध भागांमध्ये ‘हायड्रंट’ असल्यास अग्निशामक बंब जास्त खेपा करू शकतात. शिवाय एक ‘हायड्रंट’ बंद असला, तरी दुसºया ‘हायड्रंट’चा वापर केला जाऊ शकतो. झोपडपट्ट्यांमध्ये आग लागण्याचे प्रमाण मोठे आहे, हे लक्षात घेऊन झोपडपट्ट्यांनजीक ‘हायड्रंट’ची निर्मिती झाल्यास, आग लवकर आटोक्यात आणण्यास मदत होऊ शकते.याशिवाय झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांमध्ये आगीची संभाव्य कारणे, त्यापासून बचाव, स्वयंपाकाच्या सुरक्षित पद्धती इत्यादी मुद्यांच्या अनुषंगाने जनजागृतीपर मोहीम राबविण्याचाही लाभ होऊ शकतो. त्यासाठी राजकीय व प्रशासकीय स्तरावर पुढाकार घेण्याची गरज आहे. झोपडपट्ट्यांमधील आगीच्या घटनांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्वंकष धोरण आखण्याची आत्यंतिक निकड आहे. राज्य सरकारकडून तशा पुढाकाराची अपेक्षा करावी का?- रवी टाले(ravi.tale@lokmat.com)

टॅग्स :fireआग