शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या झुंडशाहीला बळ येते कोठून ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 8:56 PM

धुळे येथे जमावाच्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी २८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

- विनायक पात्रुडकरधुळे येथे जमावाच्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी २८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून या खटल्यात नियुक्ती करण्यात आली आहे. मुले चोरणारी टोळी आली असल्याचे मेसेज व्हॉटस् अ‍ॅपवर फिरले आणि ही घटना घडली, असा दावा पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे. जमाव किती भयानक असतो याची परिणती या घटनेतून महाराष्ट्राला आली. गेल्या काही वर्षांत अशा घटना देशभर घडत आहेत. कुठे गोमांस बाळगले म्हणून जमावाने बळी घेतला तर कुठे बाळ चोरणारी टोळी म्हणून जमावाकडून हत्या. या घटनांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानेही गेल्या महिन्यात सर्व राज्यांना आदेश देऊन जमावाला निर्बंध घालण्यासाठी नियम करायला सांगितले. या आदेशाची महाराष्ट्र सरकारने तातडीने अंमलबजावणी केली. आदेशानुसार पोलीस खोट्या व्हॉटस्अ‍ॅप मेसेजवर लक्ष ठेवणार आहेत. जमाव एकत्र येणार नाही याची काळजी घेणार आहे. मात्र जमाव म्हणजे कोण, तर चार लोक एकत्र आले की जमाव तयार होतो. जमावाला जात, धर्म नसतो, हा जमाव कोणाचेही ऐकत नाही. केवळ हिंसा करण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहित करतो. जमावाला थांबवणे व पांगवणे हे पोलिसांनाही शक्य होत नाही. त्यामुळेच दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली की १५१ कलमाअंतर्गत जमाव बंदी लागू केली जाते. मात्र झुंडशाहीला बळ येते कोठून, किंवा जमाव संतप्त झाल्यानंतर त्या गर्दीत त्यांना थांबवण्यासाठी कोणीच नसतो का, असे अनेक प्रश्न आहे. याचे एकमेव उत्तर म्हणजे मानसिकता. मुळात समाजाच्या मानसिकतेत बदल झाला, तर अनेक मुद्दे चर्चेनेही सुटू शकतील. पण तसे होत नाही. गर्दीला चेहरा नसतो. ही गर्दी सरास कायदा हातात घेते. कारण गर्दीतील प्रत्येकाला माहिती असते की घटनेचे खापर सहजासहजी कोणा एकावर फुटणार नाही. हीच मानिसकता माणूस मारायला कमी करत नाही. ही मानसिकता बदलण्यासाठी कठोर कायदा करायलाचा हवा. त्याचबरोबर व्यापक जनजागृतीचही यासाठी आवश्यकता आहे. आपण लोकशाही प्रधान देशात राहतो. या देशात कायदा आहे. तो सर्वांसाठी समान आहे. आरोपी पकडण्यासाठी पोलीस आहेत. आरोपीला शिक्षा देण्यासाठी न्यायपालिका आहे. प्रत्येक गुन्ह्यासाठी शिक्षा ठरलेली आहे. असे असताना आपण कायदा हातात घेणे योग्य नाही, याची शिकवण शालेय शिक्षणातूनच द्यायला हवी. लहान वयातच याचे बाळकडू मिळाले तर जमावाकडून होणारी मारहाण व त्यात जाणारे बळी, अशा घटना निश्चितच थांबू शकतील. कायदा सक्षम आहे. कायदा हाकणारे सक्षम नाहीत, अशी ओरड नेहमीच होत असते आणि त्यात तथ्य आहे. परिणामी न्यायदान प्रक्रियेलाही विलंब होतो. मात्र न्याय होतच नाही, असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. कायदा आहे म्हणून गुन्हेगारीला जरब आहे. अन्यथा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच गेले असते. तेव्हा जमावाला थांबवणे ही जशी पोलिसांची जबाबदारी आहे, तसेच भान विसरून जमावात सामील न होणे ही देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलीस त्यांचे काम करतीलच, पण प्रत्येकाने स्वत:पासूनच सजग नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा, तरच भविष्यात जमावाकडून कोणाची हत्या होणार नाही. तसेच मारहाणीत मृत्यू होणे महाराष्ट्राला निश्चितच शोभनीय नाही. त्यामुळे जमाव बळी घेत असलेल्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने तयार केलेल्या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी. धुळे प्रकरणात आरोपपत्र जसे वेळेत दाखल झाले, तसेच या खटल्याचा निकालही वेळेत लागवा, एवढीच अपेक्षा.