शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
4
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
5
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
6
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
7
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
8
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
9
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
10
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
11
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
12
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
13
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
14
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
15
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
16
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
17
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
18
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
19
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
20
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा

झाड लावताय? - कुठे, कोणतं आणि कधी लावाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 8:58 AM

पावसाळा जवळ आला की, वृक्षारोपणाचा उत्साह सुरू होतो. झाड लावणे हे जबाबदारीने स्वीकारण्याचे व्रत आहे, असे सांगणारा हा लेख आजच्या वृक्षदिनानिमित्त..

- शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण संस्था, नाशिक -

पावसाळा जवळ आला की, बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपणाची लगबग सुरू होते. कोणतेही झाड लावताना ते कुठे लावणार, कोणते लावणार आणि त्याची काळजी कशी घेणार, याच नीट विचार करायला हवा. त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे :१. रेन-ट्री, गुलमोहर, पेल्ट्राफॉर्म, अकेशिया, स्पॅतोडिया, गिरीपुष्प, निलगिरी, सुबाभुळे यांसारखी पटकन वाढणारी विदेशी प्रजातींची झाडे लावण्यावर प्रारंभी भर होता. त्यामुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होते हे लक्षात आल्यावर हल्ली जो तो नर्सरीमध्ये जाऊन वड, पिंपळ, उंबर, कडूनिंब या प्रजातींची मागणी करताना दिसतो. हे सरसकटीकरण टाळा.२. जागेच्या उपलब्धतेनुसार  प्रदेशनिष्ठ झाडांची निवड अपेक्षित आहे. रस्त्यालगत, इमारतीच्या आवारात, उद्यानासाठी सोडलेल्या जागेत, डोंगरावर,  गावाजवळच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करताना योग्य ठिकाणी योग्य वृक्ष प्रजातीची निवड करा.३. पूर्वी आपल्या अवतीभवती जी पर्यावरणपूरक देशी झाडे होती, त्यातील काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा वृक्षांची रोपे मिळवून किंवा तयार करून आपल्या परिसरात लावण्याचा प्रयत्न करणे हेच वृक्षारोपणाचे अभ्यासपूर्ण, शाश्वत कार्य होय.४. वृक्षरोपण म्हणजे डोळ्याला हिरवळ दिसण्यासाठी करायची कृती नव्हे, तर ती एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. झाड केवळ लावणेच नव्हे, तर त्याच्या वाढीसाठी काम करण्याचे, संयमाने स्वीकारण्याचे हे व्रत आहे. ५. वृक्षारोपण करताना आपण ज्या भागात वृक्षारोपण करत आहोत, तेथील नैसर्गिक परिसंस्था आणि पर्यावरण यांचे भान असणे महत्त्वाचे. महाराष्ट्रात विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण आहे. काही ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो. नाशिक, पुणे इत्यादि ठिकाणी समतोल प्रमाणात पाऊस पडतो. काही ठिकाणी पावसाचे प्रमाण अल्प असते. अशा वेळेस त्या त्या ठिकाणी वृक्षारोपण करताना तिथल्या वातावरणाच्या अनुसरून आपण वृक्षांची लागवड केली, तर ती नक्कीच फलदायी ठरेल.६. काही देशी प्रजातींची झाडे सगळ्या वातावरणात वाढतात, तर काही ठरावीक प्रदेशांत वाढतात. प्रदेशनिष्ठ वृक्षांची रोपे नको त्या ठिकाणी लावण्याचा अट्टाहास करून आपण वेळ व श्रम वाया घालवतो. त्याला यश न मिळाल्यास काही प्रमाणात आपल्याला नैराश्य येतं.७.  उदाहरणार्थ : बरेच लोक कडुनिंबाची रोपे कोकण पट्ट्यामध्ये म्हणजेच जास्त पावसाच्या ठिकाणी लावतात, ती थोडे दिवस तग धरतात आणि नंतर सुकून जातात. कडुनिंब उष्ण, कोरड्या हवामानात नैसर्गिकरीत्या जोमाने वाढतो.  डोंगराळ व उष्ण प्रदेशात कदंबाचे झाड तग धरत नाही. कदंबाला चांगली ओलावा टिकवून ठेवणारी माती लागते, जिथे ते चांगल्या प्रकारे वाढतात. ८. जागेच्या उपलब्धतेनुसार झाडांची निवड करावी. आटोपशीर वाढणारे वृक्ष इमारतीच्या व बंगल्याच्या आवारात लागवडीस योग्य  ठरतात. पारिजातक, मधू कामिनी, बहावा, बकुळ, सोनचाफा, फालसा, आपटा, बेल, कढीपत्ता, सीताअशोक, आंबाअशोक, काळा कुडा, पांढरा कुडा इत्यादी झाडे बंगले व इमारतींच्या पुढे-मागे असलेल्या मोकळ्या जागेत लावल्यास ते उपयुक्त ठरू शकतात. याशिवाय अशोक, सुपारी, भेरलीमाड, शिंदी ही सरळ वाढणारी झाडेही येथे लावता येऊ शकतात.९. काॅलनी रोडला लागून असलेल्या जागेत ताम्हण, बकुळ, बहावा, मुचकुंद, पुत्रंजीवा, दांडोस, कांचन,, सेमलाकांचन, कुसुम, तिवस, शिसम, पाडळ, असाणा.. इत्यादी झाडे योग्य ठरू शकतात.१०. पारंपरिक झाडे लावताना त्यात शोभिवंत, सुंदर फुलोरा देणारे, पक्ष्यांना उपयोगी.. असा उपलब्ध जागेचा विचार करून लागवड केल्यास आपल्या परिसराची शोभा तर वाढेलच, पण त्यातून उपयुक्तताही साधली जाईल.  थोडक्यात काय, तर वृक्षारोपण करताना त्या त्या प्रदेशातली जैवविविधता आपण राखू शकलो तरच त्या वृक्षारोपणाला खरा अर्थ आहे. 

 

टॅग्स :Plantsइनडोअर प्लाण्ट्स