- नंदकिशोर पाटील(कविवर्य केशवसुतांची क्षमा मागून)आम्ही कोण म्हणुनि काय पुसतां?आम्ही असू लाडके-कानामागे काढुनि जाळ, फोडितो कपाळजरी असू आम्ही धाकटे।आमुच्या नादी लागू न कोणीफुटपाथावरती पसरून पथारीइथून खसका, दाविन हिसकाकुठे बंगाल अन् कोण बिहारी।नको खाकरा, नको ढोकळावडापाव तो पोटभरीकशास हवी बुलेट ट्रेन ती?आमुचि लोकल नि बेस्ट बरी।कानडीचा तो सिद्धरामय्याममतांनाही बंगाली प्यारीगुजरातीचा जगी डंकामराठी तुम्हा टोचती का रे? ।आम्ही कोण म्हणुनि काय पुसतां?टीव्हीवरी परवा न तुम्ही का पाहिले?ठाण्यात गर्जलो असे की-न कुणास लागू देऊ सुगावा परीडोळ्यांदेखत घालू दरोडा आता बँकांवरी ।काय बोलतो, म्हणुनि पुसता का आम्हां?हिरे चमकती, मोती टपकतीतिकडे समृद्धीच्या खुणादेवेंद्राची रिती तिजोरीका व्हावे कर्जबाजारी पुन्हा? ।कमळाच्या फुलती बागाआम्ही मग्न तळ्याकाठीइशारे कसले देता?वाघांचे झाले ससे।भाऊबंद न कोणाचे आम्हीन चाड कोणाची आम्हालाखळ्ळखट्याक् काय ते?कळेल थांबा तुम्हाला।असे न कोणी मागेपुढतीपेटविन पुन्हा सारे रानआभाळातील तोडुनि तारेकानाखाली काढीन जाळ।आम्हाला वगळा-रेल्वेला येईल भरती फुटपाथावरती दिसेल बिहारीआम्हाला वगळा-घसरेल टीआरपी, उठतील सवाल, गतप्रभ क्षणी होतील माध्यमे सारी ।।
आम्ही कोण म्हणुनि काय पुसता ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:08 AM