शहरं
Join us  
Trending Stories
1
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
3
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
4
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
5
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
6
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
7
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
8
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
9
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
10
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
11
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
12
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
13
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
14
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
15
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक
16
लोकसभेत महायुतीने भिवंडीत ‘सिंह’ गमावला आता गड राखण्याचे आव्हान
17
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
18
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
19
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
20
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा

सत्ताधारी आहे तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:15 PM

मिलिंद कुलकर्णी मका खरेदी करावा, म्हणून राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतात. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते ...

मिलिंद कुलकर्णीमका खरेदी करावा, म्हणून राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतात. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते धरणे आंदोलन करतात. भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते कापूस खरेदीच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढतात. जळगावातील व्यापारी संकुले सुरु करावी, म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते समाज माध्यमांवर आघाडी उघडतात. हे सगळे चित्र पाहून सामान्य माणूस पुरता गोंधळला आहे. चार ही प्रमुख राजकीय पक्ष वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका घेतात, हे चांगलेच आहे. पण आंदोलन करण्यापेक्षा ते सोडविण्यासाठी ही मंडळी आपल्या मंत्र्यांना, सरकारला का सांगत नाही, असा प्रश्न पडतो.भाजपचे केंद्रात सरकार आहे. खान्देशात त्यांचे चारही खासदार आहे. जळगाव, धुळे या जिल्हा परिषदा आणि महापालिका त्यांच्या ताब्यात आहेत. अनेक पालिका, पंचायत समितींवर पक्षाचे नेते सत्तारुढ आहेत. जळगाव जिल्हा बँक, दूध संघावर भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या आणि पत्नी पदाधिकारी आहेत. शिवसेनेचे चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, राष्टÑवादीचे गुलाबराव देवकर, संजय पवार अशी मंडळी या सहकारी संस्थांमध्ये संचालक आहेत. धुळे-नंदुरबार ही जिल्हा बँक काँग्रेस-राष्टÑवादीच्या ताब्यात असली तरी अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे हे आता भाजपमध्ये आहेत.शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न हे सहकारी संस्था, राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याशी निगडीत असताना सर्वपक्षीय नेते ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न का करीत नाही. सत्तेसाठी हे सगळे एकत्र येऊ शकतात. पण प्रश्नांसाठी एकत्र कधी येतील. कापूस व मका खरेदी हे ताजे उदाहरण आहे. राज्य सरकारकडून उद्दिष्टय पूर्ण झाल्याने खरेदी थांबविण्यात आली. परंतु, खान्देशात कोरोना, बारदान, गोदाम अशा अनेक अडचणींमुळे खरेदी उशिरा, खंड पडत झाली. नोंदणी केलेल्या बहुसंख्य शेतकºयांची खरेदी झाली नाही. आता सगळे पक्ष खरेदीची मागणी करीत आहे. पण राज्य व केंद्र सरकारशी निगडीत हा विषय असल्याने लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करायला हवा. पण होतंय काय, निवेदन, आंदोलन करुन प्रसिध्दी मिळत आहे. शेतकºयांसाठी आपण काही तरी करीत आहोत, हे दाखवायची संधी कोण सोडणार आहे? वर्तमानपत्र, समाजमाध्यमांमध्ये झळकण्याचा हा प्रयत्न शेतकºयांप्रती पुतनामावशीचे प्रेम दाखविणारा आहे.शेतकरी असो की, सामान्य माणूस असो, त्याला सरकार कोणाचे आहे यापेक्षा आमच्या प्रश्नांविषयी, समस्यांविषयी संवेदनशील कोण आहे, हे महत्त्वाचे वाटते. राजकीय पक्षांनी यात राजकारण आणू नये.गुलाबराव पाटील हे पाणीपुरवठा मंत्री आहेत. त्यांनी जळगाव आणि धुळे शहरातील अमृत पाणी योजनेच्या कामात लक्ष घालायला हवे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण ही शासकीय संस्था या योजनेच्या कामावर देखरेख करीत आहे. या देखरेखीचा मोबदला ते महापालिकेकडून घेत आहेत. जळगावात जे पाईप पुरविले, ते निकृष्ट असल्याची तक्रार शिवसेनेच्याच नगरसेवकाने केली होती. पण त्याचे पुढे काय झाले, हे कळले नाही. दोन्ही पालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे, म्हणून दुजाभाव होत असेल तर दोन्ही शहरांमधील जनतेच्या भावनांशी हा खेळ असेल, हे लक्षात घ्यायला हवे.असाच प्रश्न कृषी विद्यापीठाचा आहे. एकनाथराव खडसे हे कृषी मंत्री असताना हे विद्यापीठ धुळ्यात व्हावे की, जळगावात व्हावे या विषयावर केवळ चर्चा झाली. सुदैवाने दादा भुसे हे धुळ्याचे माजी पालकमंत्री सध्या कृषी मंत्री आहेत, त्यांनी राहुरी विद्यापीठाचे विभाजन करुन धुळ्यात हे विद्यापीठ करण्यासाठी जोर लावायला हवा. शिवसेनेचेच माजी आमदार प्रा.शरद पाटील गेल्या काही वर्षांपासून त्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मागणीला यश येईल आणि खान्देशला एक विद्यापीठ मिळेल. धुळ्यात कृषी महाविद्यालयाकडे पुरेशी जागा आहे, आणखी जागा मिळविता येईल, पण आता हे विद्यापीठ व्हावे, यासाठी पाठपुरावा व्हायला हवा.पक्षभेद, संकुचित राजकारण, श्रेयवादात न अडकता महाविकास आघाडी आणि भाजप या पक्षाच्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी केंद्र व राज्यातील सत्तेचा लाभ जनतेपर्यंत कसा पोहोचेल, याकडे लक्ष केंद्रित करायला हवे. शरद पवार यांनी अलिकडे केलेले विधान सगळ्याच राजकीय मंडळींनी पक्के लक्षात ठेवायला हवे, की कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. मीच सत्तेवर राहील, अशा भ्रमात कोणीही राहू नये. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव