शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

कोकणसाठी आणखी एक घाट कशाला? - जागर -- रविवार विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:18 AM

कोल्हापूर जिल्हा हा सात घाटरस्त्याने तळकोकणाशी उत्तमरीत्या जोडला गेला आहे. असे असताना भुदरगड तालुक्यातील पाटगाव खोऱ्यातून सोनवडे येथून घाटरस्ता करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. यासाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सोनवडे येथून होणारा घाट खर्चिक आहे, शिवाय नैसर्गिक हानी करून जाणारा आहे....

- वसंत भोसले-कोल्हापूर जिल्हा हा सात घाटरस्त्याने तळकोकणाशी उत्तमरीत्या जोडला गेला आहे. असे असताना भुदरगड तालुक्यातील पाटगाव खोऱ्यातून सोनवडे येथून घाटरस्ता करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. यासाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सोनवडे येथून होणारा घाट खर्चिक आहे, शिवाय नैसर्गिक हानी करून जाणारा आहे....सह्याद्री पर्वतरांगांनी महाराष्ट्राचा तळकोकण आणि घाटमाथा यांची विभागणी झाली आहे. तळकोकणात ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे आहेत. त्यामध्ये सुमारे साडेतीन कोटी लोकसंख्या आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर नाशिकपासूनचा खान्देश, विदर्भ आहे. पुण्यापासूनचा पश्चिम, मराठवाडा आहे. कोल्हापूरपासून दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा सीमावर्ती प्रदेश आहे. अशी एकप्रकारे नैसर्गिकच विभागणी आहे. या दोन्हींना जोडणारे सह्याद्री पर्वतरांगांमधून अनेक घाटरस्ते आहेत. रेल्वेचे मात्र दोन मार्ग पुणे आणि नाशिकवरून ठाण्याकडे जाणारे आहेत. तिसरा मार्ग कोल्हापूरहून वैभववाडीजवळ कोकण रेल्वे मार्गाला जोडणारा प्रस्तावित आहे. याउलट नाशिक जिल्ह्यातून सुरतकडे, जव्हारकडे आणि मुंबईकडे जाणारे घाटरस्ते आहेत. नगर जिल्ह्यातून पुढे मेळघाटातून कल्याणकडे जाणारा मोठा मार्ग आहे. लोणावळा-खंडाळा हा मार्ग जगप्रसिद्ध आहे. एक्स्प्रेस हायवेने तो खूपच सुंदर झाला.

पुणे जिल्ह्यातूनच ताम्हणीमार्गे माणगावकडे आणि भोरमार्गे महाडकडे जाणारे रस्ते आहेत. महाबळेश्वरहून प्रतापगडाजवळून जाणारा सर्वांगीण सुंदर घाट आहे, तर कोयना धरणाच्या जलाशयाच्या प्रांगणातून जावा असा कुंभार्ली घाट आहे. पुणे, सातारा, नगर किंवा नाशिक जिल्ह्यांतून दोन-तीन घाटरस्ते आहेत. सांगली जिल्ह्याचे पश्चिम टोकही कोकणला जोडले आहे. मात्र, ते चांदोली अभयारण्याने आणि धरणाच्या जलाशयाने व्यापले आहे. सांगली जिल्ह्यातून कोकणात जायला स्वतंत्र रस्ता नाही. याउलट घाटांचा जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख करायला हरकत नाही. रत्नागिरीला जाणाºया रस्त्यावरील आंबा घाटापासून चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक पारगड किल्ल्याच्या पायथ्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गात जाणारा सातवा घाट आहे.

आंबा घाटाने कोल्हापूर आणि रत्नागिरी जोडले आहे. शेजारी अणुस्कुरा गावातून राजापूरला जाणारा अणुस्कुरा घाट आहे. या मार्गे सध्या एस. टी. गाड्याही धावतात. गगनबावडा येथून दोन घाट खाली कोकणात उतरतात. एक भुईबावडा घाट आपणास खारेपाटणकडे घेऊन जातो आणि दुसरा प्रसिद्ध करूळ घाट आहे. पलीकडे राधानगरी धरणासमोरून दाजीपूर अभयारण्यामार्गे फोंड्यात उतरणारा फोंडा घाट आहे.

आजरा तालुक्यातून आंबोलीमार्गे सावंतवाडीत जाता येते आणि चंदगड तालुक्यातून तिलारी धरणाजवळून पारगडपासून दोडामार्गात जाता येते. त्याला दोन मार्ग आहेत. एक तुम्हाला गोव्यात घेऊन जातो आणि दुसरा बांदा येथे मुंबई-गोवा महामार्गाला जोडतो. कोल्हापूर ही जुनी शाहूकालीन बाजारपेठ आहे. ती नेहमीच विकसित होत गेली आहे. कोल्हापूर संस्थानचा आणि तळकोकणाचा सातत्याने संपर्क राहिला आहे. त्याचा कदाचित परिणाम असावा की, या जिल्ह्यातून तळकोकणात जाण्यासाठी सात घाटरस्ते निर्माण झाले आहेत. यापैकी आंबा घाट, करूळ, फोंडा आणि आंबोली घाट सतत वाहतुकीने गजबजलेले असतात. दिवसरात्र वाहतूक चालू असते. त्या मानाने अणुस्कुरा, भुईबावडा आणि दोडामार्ग घाटावर फारशी वाहतूकच नसते. हे घाट उत्तम स्थितीतही नाहीत. त्याला जोडणारे रस्ते विकसित करण्यात आलेले नाहीत. शिवाय हे घाट मुख्य महामार्गावरही नाहीत.रस्ते किंवा रेल्वे तसेच विमान वाहतूकही आता अत्यावश्यक बाब झाली आहे. त्यांचा सातत्याने विकास करीत राहावा लागणार आहे.

दक्षिण महाराष्ट्रात सातारा आणि कऱ्हाड शहर उत्तम पद्धतीने कोकणाशी जोडलेले आहे. सांगली जिल्ह्याला कुंभार्ली आणि आंबा घाटाच्या आधारेच कोकणशी व्यवहार करावा लागतो. शिवाय फोंडा आणि आंबोली मार्गाचाही वापर होत असतो. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि चंदगड तालुके कोकणाच्या सीमेवर आहेत. यापैकी भुदरगड वगळता सर्व तालुक्यांतून थेट घाटरस्ते कोकणात जातात. भुदरगडच्या मार्गावरूनच आंबोली आणि फोंडा घाटात जाता येते. तसे पाहिले तर कोल्हापूरजिल्हा हा सात घाटरस्त्याने तळकोकणाशी उत्तमरीत्या जोडला गेला आहे. असे असताना भुदरगड तालुक्यातील पाटगाव खोऱ्यातून सोनवडे येथून घाटरस्ता करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. यासाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करण्यातयेणार आहेत. सुमारे पन्नास एकरांवरील घनदाट जंगल तोडले जाणार आहे. शिवाय जैवविविधतेला धोका निर्माण करणार आहेच, हा भाग वेगळा. वास्तविक गारगोटीपासून पश्चिमेस असणाºया वेदगंगा नदीच्या खोºयात दाट लोकवस्तीनाही.

बाजारपेठ नाही. शिवाय कणकवलीला जोडणारा फोंडा घाटरस्ता मुदाळतिट्ट्यावरून निपाणीकडे जातो. तेथून काही किलोमीटरवर गारगोटी शहर आहे. गारगोटी, पिंपळगावमार्गे उत्तूरवरून आंबोलीच्या घाटातून सावंतवाडी तसेच गोव्याला जाणारा उत्तम रस्ता आहे. तो अधिक विकसितही करता येतो.

सोनवडे येथून होणारा घाट खर्चिक आहे, शिवाय नैसर्गिक हानी करून जाणारा आहे. तो खाली कोकणात कोणत्याही मोठ्या शहराला जोडत नाही. कणकवली, कुडाळ एका बाजूला राहते, तर सावंतवाडीही पुढेच राहते. झाराप या मुंबई-गोवा महामार्गावरील गावात हा घाटरस्ता जातो. शेजारीच आंबोलीतून येणारा घाटरस्ता आहे. शिवाय हा सोनवडे घाटरस्ता कोणत्याही दोन मोठ्या शहरांना जोडणारा ठरणार नाही. मुख्य महामार्गावर नाही. राधानगरी ते निपाणी मार्ग शेजारीच आहे, तो फोंडा घाटाने जोडला जातो आहे. शेजारीच संपूर्ण भुदरगड तालुका आहे.अलीकडे कोल्हापूर- मिरज रेल्वेमार्गावरून हातकणंगलेतून आठ किलोमीटरवर असणाऱ्या इचलकरंजीसाठी रेल्वे मार्ग टाकण्याचा प्रयत्न चालू होता. शेतकºयांनी तीव्र विरोध केल्याने तो सध्यातरी बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे. गेल्या दोन -तीन दशकात वाढणाºया इचलकरंजी शहराचा विस्तार पाहिला तर हातकणंगले रेल्वेस्थानक आता दूर राहिलेले नाही. पुणे, कोल्हापूर किंवा मुंबई, ठाण्यात रेल्वे स्थानकापासून शहरांची हद्द दहा-वीस किलोमीटरपर्यंत वाढली आहे.

लोक तेथून ये-जा करत रेल्वेचा वापर करतात. इचलकरंजीपासून केवळ आठ-दहा किलोमीटरवर रेल्वेस्थानक असताना पुन्हा ती आत वळविण्याचा मुर्खपणाच आहे. इचलकरंजी शहर उद्या कबनूर, शहापूर, तारदाळसह महानगर होऊ पाहत आहे. हातकणंगले रस्त्यावरील साजणीपर्यंत विस्तार होण्याची शक्यता आहे. असे असताना शेकडो एकर सुपीक जमीन रेल्वे मार्गाला वापरावी का? याउलट त्यासाठी येणाऱ्या खर्चातून हातकणंगले रेल्वेस्थानक मोठे करता येईल. तेथून थेट चांगल्या रस्त्याने इचलकरंजी परिसर जोडता येईल.

मिरजेहून कोल्हापूरला येणारी रेल्वे अखेर थांबते आणि पुढे जाण्यास मार्ग नाही म्हणून ती कोकणाला जोडावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यातून दोन गोष्टी होतील. कोकण कोल्हापूरशी जोडले जाईल. पंढरपूर, सोलापूर ते हैदराबादपर्यंत एक मार्ग तयार होईल. दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक मिरज रेल्वे जंक्शनवरून कोकणाशी जोडले जाईल. सध्या महाराष्ट्रातून तळकोकणात जाणारे पुणे-मुंबई आणि नाशिक-मुंबई हे दोनच रेल्वे मार्ग आहेत. तिसऱ्या रेल्वे मार्गाची नितांत गरज आहे.

कोल्हापूर-कोकण रेल्वे मार्गामुळे रत्नागिरीजवळ विकसित केलेले जयगड बंदर जोडले जाणार आहे. आपण सर्वांना मुंबईजवळच्या जवाहरलाल नेहरू पोर्टवर अवलंबून राहावे लागते. हा सर्व फायदा लक्षात घेऊन कोकण रेल्वे कोल्हापूरला जोडण्याऐवजी कºहाड ते चिपळूण रेल्वे मार्गाची आखणी करण्यात आली. वास्तविक कºहाड हे जंक्शन नाही. मिरज मार्गेच तेथे जावे लागेल. शिवाय कोकण रेल्वेवरील चिपळूण जोडून काही उपयोग नाही. गोवा, जयगड बंदर आणि रत्नगिरी फार दूरवर राहते. चिपळूण पुन्हा समुद्रकिनाऱ्यावरही नाही.

इचलकरंजीला रेल्वे घेऊन जाणे किंवा कोल्हापूर- कोकण मार्गाशिवाय चिपळूण-कºहाड मार्गाचा आग्रह धरणे चुकीचे आहे. तसेच सोनवडे घाटाचे होणार आहे. आजही फोंडा घाटातून होणारी वाहतूक तुरळक आहे. सायंकाळनंतर एखादे-दुसरे वाहनच या फोंडा घाटातून खाली जाते किंवा वर येते. फोंडा घाटातून वर आल्यानंतर राधानगरी ते निपाणी हा पंचेचाळीस किलोमीटरचा मार्ग विकसित करता येतो. या मार्गाने तीन-चार ठिकाणांहून भुदरगड तालुका जोडता येतो. या मार्गाने फोंडा घाटमार्गे कोकणात जाता येते किंवा दक्षिणेस आंबोली मार्गे जाता येते शिवाय या तालुक्यातून फारच कमी वाहतूक होणार आहे. दोन्ही बाजूला घाटाला जोडणारे रस्ते असताना सोनवडे घाटाचा घाट कशाला घालायचा असे वाटते.त्याऐवजी चिकोत्रा धरणाच्या पाणी साठवणुकीचा विषय पैशाअभावी रखडला आहे.

आजरा तालुक्यातील आंबेओहोळ, सर्फनाला आणि उचंगी ही धरणे निधीअभावी वीस-बावीस वर्षे रखडली आहेत. या धरणांचे सुमारे ७० टक्के काम झाले आहे. त्याला प्राधान्य द्यायला नको का? गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील बत्तीसगावांत यावर्षी कोरडा दुष्काळ होता. दरवर्षी पन्नास टक्के पीक आणेवारी येते. असे असताना ही तिन्ही धरणे पूर्ण करण्याची प्राधान्याने गरज आहे. शिवाय धामणी नदीवरील धरण गेली बावीस वर्षे रखडले आहे. आतापर्यंत दोनशे कोटींहून अधिक निधी खर्च होऊनही काम दिसत नाही. नव्या प्रशासकीय मान्यतेनुसार धामणी धरणाचा खर्च आता सातशे कोटींवर गेला आहे. त्याला अर्थसंकल्पात एका पैशाची तरतूद केलेली नाही, तरी आपण नवा घाट बांधण्याची भाषा करतो आहोत. पंचगंगा नदीला बारमाही पाणी आहे. ते जपता येत नाही. ते विषारी झाले आहे. पंचगंगा नदीत सांडपाणी जाणार नाही याची उपाययोजना करणे तातडीचे आहे. युद्धपातळीवर त्यावर काम होणे गरजेचे असताना नवा आठवा घाट करायचा का? याचा कोल्हापूर जिल्ह्यानेच विचार करायचा आहे, अन्यथा आणखी एक सह्याद्रीला पोखरणारा आणि पर्यावरणाला हानी करणारा मार्ग तयार होईल. हाच विकास असेल तर खुशाल करा, इचलकरंजीला रेल्वे घेऊन जा आणि कऱ्हाड ते कोल्हापूर या सत्तर किलोमीटरला हजारो कोटी रुपये खर्च करून दोन रेल्वे मार्गाने कोकण जोडून टाका! धन्यवाद!

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकMaharashtraमहाराष्ट्र