शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

पहाडी महिलेला हिंस्र लढय़ात का उतरावे लागले?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 9:26 PM

गोव्यातील पर्यावरण चळवळ अजून तरी नैतिक आणि शांततापूर्ण मार्गाने चालली आहे आणि दुस-या बाजूला सरकार आणि खाण कंपन्यांनी आपला दबाव वाढविताना कोणतीही कसर सोडलेली नाही.

- राजू नायक

गोव्यातील पर्यावरण चळवळ अजून तरी नैतिक आणि शांततापूर्ण मार्गाने चालली आहे आणि दुस-या बाजूला सरकार आणि खाण कंपन्यांनी आपला दबाव वाढविताना कोणतीही कसर सोडलेली नाही. सुदैवाने गेल्या १० वर्षात खाण कंपन्यांच्या बेदरकारी आणि जुलूम-जबरदस्ती विरोधात बोलणा-यांच्या संख्येतही विलक्षण वाढ झाली आहे. या प्रश्नावर मी एकदा लिहिलेही आहे की, उद्या नक्षलवादी या प्रश्नावर सक्रिय झाले तर आश्चर्य वाटायला नको, एवढी ग्रामीण भागाची येथे ससेहोलपट झालीय.

हा विषय मनात ताजा बनण्याचे कारण ‘इफ्फी’मध्ये मी पाहिलेला चित्रपट- वुमन अॅट वॉर. आईसलँड हा देश व तेथील पर्यावरण सजगता याबाबत एक मध्यमवर्गीय महिला कसा बाणोदारपणा दाखवते; प्रसंगी हिंसेचा अवलंब करते, काहीसा विनोदी ढंगाने जाणारा; परंतु राजकीय, पर्यावरणीयदृष्टय़ा नैतिक भूमिका घेणारे असे या चित्रपटाचे कथानक आहे. महत्त्वाचे काय तर आईसलँडचीच कानमध्ये ती अधिकृत प्रवेशिका होती. सध्या बुद्धिमान, समाधान देणा-या शिवाय जागतिक विषय गांभीर्याने मांडणा-या चित्रपटांची निर्मिती कमीच होत असताना हा चित्रपट आल्हाददायक वाटला.

‘जैत रे जैत’मध्ये ज्याप्रमाणो निवेदक मध्ये-मध्ये कथेत येतो त्याचप्रमाणे तीन वादक व तीन युक्रेनी गायिका आपल्या परंपरागत पद्धतीने कथेला पुढे नेण्याचे काम करतात.

हॅला ही एका वाद्यवृंदाची संचालिका. हसरा चेहरा. सायकलवरून ती शहरातील रस्त्यावरून रपेटीला जाते तेव्हा प्रत्येकाला तिच्याशी स्मितहास्य करावेसे वाटते; परंतु ग्रामीण भागात मात्र तिचा ‘चेहरा’ वेगळा असतो. तिला तेथे ‘पहाडी महिला’ संबोधतात- कारण ही अज्ञात महिला हातात आधुनिक धनुष्यबाण घेऊन तेथील उच्चदाबाच्या वीजवाहिन्या पद्धतशीरपणे तोडण्याचे काम करते. काम धोकादायक आहे. ती प्रसंगी जीव धोक्यात घालतेही! कारण, आईसलँडला प्रदूषणापासून वाचविण्याचे ते तिच्या मते पवित्र कार्य असते. या देशाच्या पठारावर उभारलेल्या रियो रिंटो अॅल्युमिनियम या अवजड आणि प्रदूषणकारी कारखान्याच्या विरोधात हा लढा असतो. याला वैचारिक अधिष्ठानही आहे; पर्यावरण-अतिरेकामुळे चिनी गुंतवणूकदार मागे फिरतात, तसे सरकार आणि कारखानदार पर्यावरण कार्यकर्त्यांविरोधात वैचारिक- बदनामीची मोहीम छेडतात, तेव्हा पहाडी महिलाही आपली जागतिक तपमान, मनुष्य जातीला निर्माण झालेला धोका व पर्यावरणाची सजगता अधोरेखित करणारी पत्रके फेकते. तिचा आदर्श असतो गांधी आणि मंडेला. गिरहेरोडोटोर यांनी मध्यमवयीन महिलेची केलेली भूमिका मनोज्ञ आणि अविस्मरणीय झाली आहे. अत्यंत सजग आणि तन्मयतेने तिने भूमिका निभावलीय; त्यात तडफ आहे आणि तरलताही आहे. हा चित्रपट काहीशा विनोदी ढंगाने जातो; कारण प्रत्येक वेळी ती वाहिन्या तोडते तेव्हा सायकलवरून देशभ्रमंती करणारा एक पर्यटक नेमका त्या ठिकाणी पकडला जातो व गंमत घडते. दत्तक मुलीला घेऊन परत येताना बस थांबविली जाते; कारण रस्ते पाण्याखाली गेलेले असतात. संपूर्ण शहराला तलावाचे स्वरूप येते. सध्या जगभर तापमानवाढीच्या संकटाने प्रश्न निर्माण केले आहेत, त्याची प्रचीती प्रेक्षकांना अशा प्रकारे या घटनेतूनच पाहायला मिळते. त्यातून लढाऊ महिलेच्या लढय़ाला नैतिक पार्श्वभूमी मिळते.

आईसलँड हे उत्तर अटलांटिकमधले युरोपच्या टोकावरचे भरपूर हिम आणि जिवंत ज्वालामुखी, लाव्हा रसातून बनलेले दगड, हिमपर्वतातून तयार होत समुद्रात जाणा-या नद्या, थंड-शांत वातावरण, आकाशात सूर्याच्या तेजाने बनत असलेले सप्तरंग असे मनोहारी आणि पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील बेट आहे. चाळीस हजार चौ.मी.चे क्षेत्रफळ व अवघी साडेतीन लाखांची लोकसंख्या. २० व्या शतकापर्यंत आईसलँड मच्छीमारी व शेतीवर अवलंबून होता व युरोपात गरीब गणला जाई. त्यानंतर मच्छीमारी क्षेत्रतील आधुनिकीकरण व अमेरिकी पाठबळ- जे दुस-या महायुद्धानंतर अनेक युरोपीय देशांना पुनर्बाधणीसाठी मिळाले- आईसलँडने आर्थिक प्रगती केली व आज हा देश जगातील श्रीमंत आणि धनाढय़ देशांमध्ये गणला जातो. दुर्दैवाने संपूर्णत: पुनर्निर्माणाच्या ऊर्जा साधनांवर निर्भर असलेल्या या देशात अवजड उद्योग व अतिपर्यटनामुळे अनेक पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत. स्वाभाविकच येथील पर्यावरण चळवळी सजग आहेत. आक्रमक आहेत. लोकांनाही आपल्या देशाबरोबरच जग वाचविण्याच्या मोहिमेत योगदान द्यावेसे वाटते. त्यादृष्टीने आईसलँडसारख्या वेगळी प्रकृती असलेल्या देशाने जगाला शिकविण्यासारखे बरेच काही आहे. ‘वुमन अॅट वॉर’ चित्रपटही त्या दृष्टीने बरेच काही शिकवितो.

टॅग्स :goaगोवा