शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मुस्लीम मुली हिजाबसाठी का आग्रही असतात? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 8:35 AM

मुस्लीम मुलींच्या शिक्षणाची स्थिती फार बिकट आहे. ‘हिजाब’ घालून का होईना, त्या शिक्षणाची संधी मिळवत असतील, तर त्यांना मदत करायला हवी.

हिनाकौसर खान, मुक्त पत्रकार

कर्नाटकातल्या हिजाब प्रकरणावरून देशभर चर्चेला उधाण आलं आहे. कुणी काय घालावं अगर घालू नये हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. सामाजिक संकेतांना जोवर धक्का लागत नाही तोवर तरी कुणाच्याही खाण्यापिण्यावर, पेहरावावर आक्षेप घेण्याचं काहीही कारण नसतं, मात्र असा आक्षेप घेऊ नये हा सामाजिक संकेतच जणू विस्मरणात जात आहे.

सुरुवातीला सुल्ली डिल्स, त्यानंतर सहाच महिन्यात बुल्ली बाईसारख्या ॲपच्या माध्यमातून उच्चशिक्षित, सजग मुस्लीम महिलांना टारगेट करण्यात आलं. ऑनलाईन लिलाव करून मुस्लीम महिलांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्नही त्यातून करण्यात आला आणि आता अचानक हिजाबचा (स्कार्फ) मुद्दा करून शिक्षण घेत असलेल्या मुस्लीम मुलींना लक्ष्य करण्यात आलं आहे. शाळेत प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना आणि शिक्षकांनाही गेटवरच हिजाब काढावा लागल्याचा अमानुष प्रकारही घडला. शिक्षणसंस्थांमध्ये येताना हिजाब घालू नये यासाठी जेवढा आटापिटा केला जात आहे, त्याच्या चार-दोन टक्के विचारही मुस्लीम मुलींच्या शिक्षणाबाबत कुणी करताना दिसत नाहीये. आपल्या चर्चांचा रोख हिजाब आणि तो घालण्याची वैयक्तिक निवड हा नसून सुकर मार्गानं मुस्लीम मुलींना शिक्षण कधी मिळणार, त्यासाठीची जागृती कशी केली पाहिजे असा असायला हवा, मात्र खऱ्या बदलाच्या आणि विकासाच्या दिशेनं पावलं टाकण्याऐवजी कट्ट्यावरच्या गप्पा चघळण्यात जास्त रस दाखवला जातो.

आजमितीला किती मुस्लीम मुली शिक्षण घेत आहेत? त्यांचा ड्रॉपआउट होण्याचा वेग काय आहे? त्यामागची कारणं काय आहेत? किती जणींसाठी उच्चशिक्षणाची दारं उघडली आहेत? शिक्षित असलेल्या किती मुली नोकऱ्या करत आहेत? त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती काय आहे? याबाबत कुणीही चर्चा करण्यास उत्सुक नाही. आपल्या आजूबाजूच्या किती मुस्लीम मुली शाळांमध्ये जाताना दिसतात, मुलांच्या वर्गात किती मुस्लीम मुली आहेत याकडे सजगपणे लक्ष देण्याची कुणाची इच्छा नसते. कुठल्याही जातीधर्माच्या मुली असो लॉकडाऊनमध्ये कित्येकींची लग्नं झाली, शाळा ऑनलाईन झाल्यानंतर स्मार्टफोनच्या अभावामुळं मुलींचं शिक्षण बंद झालं, याबाबत कुणालाही ब्र काढायचा नाही. 

मुस्लीम समाजात अजूनही मुलींच्या शिक्षणाबाबत पुरेशी जागृती नाही. बरेचसे पालक घराजवळ, सोयीच्या ठिकाणी, अल्पखर्चात शिक्षण मिळत असेल तरच मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतात. एकूण समाजावरच धर्माचा पगडा अधिक असल्यानं शिक्षण घेण्यास घराबाहेर पडणाऱ्या मुलींच्या तहजिबची तजवीज करणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं, म्हणून हिजाबसारखे मार्ग स्वीकारले जातात. बुरखा किंवा हिजाब घालून का होईना, मुलींना शाळा-महाविद्यालयांत जाण्यास घरांतून परवानगी मिळते. बहुतांशवेळा शालेय वर्गात तर मुली हिजाब वा बुरखा काढून ठेवतात. कुटुंबीय, समाज आणि धार्मिकता या सगळ्यांशी झगडा करत मुलींना शिक्षणाची वाट धरावी लागते. घरकाम, घराची जबाबदारी पार पाडत मुली शाळा-महाविद्यालयांसाठी घराबाहेर पडतात.  

हिजाब/बुरखा घालून आल्या म्हणून मुलींना शाळा-महाविद्यालयांत शिक्षण देण्याबाबत काही वेगळी ट्रीटमेंट मिळते का? - तर नाही. त्यांना असाईनमेंटस किंवा उपक्रमांमध्ये सवलत मिळते का? - नाही. उलट बुरखा/हिजाबमुळे त्यांना भेदाभेदच जास्त सहन करावा लागतो. अशा स्थितीतून वाट काढत मुली शिक्षण घेत आहेत. काही जणींसाठी हिजाब हा शिक्षणाचा पासपोर्ट असतो, कारण घरात-नातेवाईकांत वा मोहल्ल्यातल्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यापेक्षा आपण शिक्षण घेऊन कथितरीत्या ‘बिघडलो’ नाहीये हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांना पूर्ण करायची असते. प्रश्नांना उत्तरं देण्यात नाहक वेळ घालवण्यापेक्षा सरळ आपल्या साध्यावर लक्ष्य केंद्रित करणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटत असतं, मात्र हे अंतर्गत प्रवाह अनेकांना समजून घ्यायचे नसतात. 

दोन दिवसांपूर्वीच कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब वापरावरून सुरू असलेल्या याचिकेत याचिकाकर्त्या विद्यार्थिनींनी गणवेशाच्या रंगाचा हिजाब वापरण्याची परवानगी मागितली आहे. गणवेशाच्या रंगाचा का होईना, हिजाब वापरणारच असं म्हणून आरडाओरडा करणारी माणसं असतील, मात्र शिक्षण घेण्यासाठी मिळेल तो मार्ग शोधण्याचा त्यांचा जज्बा नाकारून चालणार नाही. आज हिजाब घालूनही मुली शिक्षण घेऊन आपापली ध्येय गाठत आहेत. ते आपण डोळे उघडून कधी पाहणार! 

आसपासच्या कुठल्याही जाती-धर्मातल्या मुली शिक्षण घेत आहेत का? त्यातल्या अडचणी काय आहेत आणि त्या कशा दूर केल्या पाहिजेत हे आपले प्रश्न असायला हवेत, मात्र घडतं ते उलटच. आज मुस्लीम समाजातल्या मुलींना आत्मसन्मान आणि आत्मविश्वास मिळणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यापुढं हिजाब घालणं, न घालणं हा मुद्दा फारच गौण आहे. एखादी प्रथा निश्चितच वाईट असू शकते पण ती प्रथा अवलंबवणाऱ्याला ती कशी वाईट आहे हे आधी आपल्याला पटवून द्यावं लागेल, आपलं मत लादून त्याच्यावर जोरजबरदस्ती करता येणार नाही. एकीकडे उच्चशिक्षण घेणाऱ्या मुस्लीम स्त्रियांवर डिजिटल हल्ले करायचे आणि दुसरीकडं हिजाबच्या सोबतीनं ज्ञानार्जनाचा मार्ग स्वीकारणाऱ्यांना भलत्याच प्रश्नांत गुमराह करायचं, ही जळमटलेली विचारसरणी आहे. त्याऐवजी मुस्लीम मुलींच्या शिक्षणाकडे अधिक कळकळीनं आणि जाणिवेनं पाहण्याची गरज आहे.greenheena@gmail.com

टॅग्स :Muslimमुस्लीम