शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

कपड्यांना इस्त्री कशाला करता? सुरकुत्या छान असतात की!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 10:04 AM

आपल्या सर्व , विद्यार्थ्यांनी दर सोमवारी इस्त्री न केलेले कपडे वापरायचे, असा उपक्रम ‘सीएसआयआर’ या संस्थेने नुकताच सुरू केला आहे, त्यानिमित्ताने!

प्राची पाठक, पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या अभ्यासक -

वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (सीएसआयआर) या संस्थेने एक  नवीन उपक्रम सुरू केला आहे. ‘रिंकल अच्छे है’, असं या उपक्रमाचं नाव. म्हणजे कपड्यांच्या सुरकुत्या छान आहेत की! या संस्थेच्या भारतभर सदतीस प्रयोगशाळा आहेत. तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी दर सोमवारी इस्त्री न केलेले कपडे वापरायचे, असा हा उपक्रम.हे करण्यामागे नेमका हेतू काय? याचा पर्यावरण संवर्धनाशी काय संबंध?  भारतातील जवळपास सत्तर टक्क्यांहून अधिक ऊर्जा ही कोळशापासून निर्माण होते.  आपण कपड्यांची एक जोडी इस्त्री करतो, तेव्हा दोनशे ग्रॅम कार्बन डायऑक्साइड वायू निर्माण होतो. एक इस्त्री ८०० ते १००० वॉट ऊर्जेवर चालते. ही ऊर्जा एका साध्या दिव्यापेक्षा जवळपास वीस ते तीस टक्के अधिक असते. कुटुंबातील ४ ते ५ सदस्यांसाठी समजा तासभर इस्त्री वापरली, तर एक किलोहून अधिक कार्बन डायऑक्साइड वायू उत्सर्जित होतो, अशी आकडेवारी संस्थेने दिली आहे. आठवड्यातून एक दिवस बिनाइस्त्रीचे कपडे घालायची आणि एकूणच कपड्यांना इस्त्री करायची सवय/गरज कमी केल्यास या छोट्याशा कृतीतून देखील पर्यावरण संवर्धनात हातभार लागू शकेल, असं संस्थेचं म्हणणं आहे. यातून वीज बचत देखील होईलच. १९४२ मध्ये दिल्ली येथे स्थापन झालेल्या या संस्थेने भारताच्या वैज्ञानिक विकासात भरपूर योगदान दिलेलं आहे. निवडणुकीत आपल्या बोटावर जी शाई लावतात, तीदेखील याच संस्थेत विविध प्रयोगांती तयार झाली आहे. यावर्षी जून ते ऑगस्ट या काळात संस्थेच्या सर्व प्रयोगशाळांमध्ये किमान दहा टक्के वीज बचत करण्याचं ध्येय आहे. आठवड्यातून एक दिवस इस्त्री न केलेले कपडे घालणं, या वरवर छोट्याशा दिसणाऱ्या एका कृतीतून आणि सवय बदलातून शाश्वत विकासाची एकेक पायरी चढता येईल, असं संस्थेचं म्हणणं आहे. जगभरात जीवनशैलीतील लहान-मोठ्या बदलांतून शाश्वत विकास कसा साधला जाईल, याबद्दल वेळोवेळी नावीन्यपूर्ण विचार मांडले जात असतात. पर्यावरण संवर्धनात जंगलतोड, प्रदूषण, ढासळती जैवविविधता, पाणीटंचाई असे अनेक मुद्दे असले, तरी पृथ्वीवर असलेली मानवी लोकसंख्या आणि तिला जगण्यासाठी लागणारे विविध घटक, सुविधा यांचाही ताण पर्यावरणावर पडत असतोच. आपल्या कृतीतून एक छोटी, सहज करण्याजोगी गोष्ट एरवी लहानशी वाटली, तरी ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे कामास येऊ शकते. आपल्याच वापरत्या कपड्यांचं ऑडिट घरातच करून पाहा. सतत कपड्यांची खरेदी सुरू असते, तरीही ऐनवेळी घालायला बरे कपडे नाहीतच, अशीच भावना अनेकांच्या मनात असते. कपड्यांचा पसारा आटोक्यात ठेवायला एक मंत्र खूप उपयोगी ठरू शकतो. आपल्याकडच्या कपड्यांमधले ऐंशी टक्के कपडे आपण फारसे वापरतच नाही. नेहमी वापरतो, ते वीस टक्के कपडे नेमके कोणते आहेत, ते आपल्याला का आवडतात, काय सोय, स्टाइल त्या कपड्यांमुळे मिळते, त्याचा विचार करून तसेच कपडे घ्यावे. म्हणजे नुसतेच पडून राहणारे, क्वचित वापरले जाणारे कपडे हळूहळू कमी होऊ लागतात. आहे ते नीट वापरले जाऊ लागतात. कपडे घरात पडू द्यायचे नाहीत, हे एकदा ठरवलं की आपली गरज किती कपड्यांची आहे, ते शोधून काढावं. जो आकडा येईल, त्यापेक्षा कमीच; पण चांगल्या दर्जाचे कपडे आपल्या कपाटात ठेवावेत. एकदाच आपली गरज नीट ठरवावी आणि पडून असलेले सगळे कपडे नीट करून कुणाला द्यावे, विकावे, इतर गोष्टींसाठी वापरावेत. मोकळा झालेला वॉर्डरोब तसाच मोकळा ठेवायचा आहे, हे आधी स्वतःवर बिंबवावं.  जितकं आपलं कपड्यांचं कपाट सुटसुटीत असेल, तितकं मोकळंढाकळं जगता येतं. गरज नेमकी ठरवून आणि हौस न मारता देखील हे साध्य होऊ शकते. आजकाल रिंकल फ्री कपडे देखील मिळतात, परंतु त्याचे धागे प्लास्टिकपासून तयार झालेले आहेत की कसं, ते तपासून घ्यावं. कपडे धुतानाच ते नीट वाळत घातले, तर सुती कपडे देखील नीट घडी करून ठेवता येतात आणि इस्त्री टाळता येते. डोक्यावरच्या टोपीपासून ते पायातल्या मोज्यांपर्यंत जे काय ‘कापड’ म्हणून आपण वापरतो, ते सगळंच एकदा आवरा.  त्याबाबत जागरूक होऊन सवयी बदलून घ्या. पर्यावरण संवर्धनात आपलाही खारीचा वाटा!     prachi333@hotmail.com

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाelectricityवीज