शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

दिगंबर कामत काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतील?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 8:51 PM

कामत काँग्रेस पक्षाला नवे वळण कसे देतात याकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. 

-राजू नायक माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची गोव्याचे विरोधी पक्षनेते म्हणून झालेली निवड काँग्रेस पक्षासाठी निश्चितच लाभदायक ठरणार आहे. पुढच्या दोन वर्षात गोव्यात निवडणुका व्हायच्या आहेत. राजकीय निरीक्षक, सध्याची गोव्याची राजकीय परिस्थिती पाहता, त्या वर्षभरात होतील, असे सांगू लागले आहेत. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या जहाजातून १० आमदारांनी सत्ताधारी बाजूने उड्या टाकल्यानंतर या पक्षाच्या अस्तित्वाबद्दल तीव्र शंका व्यक्त केल्या जात आहेत. या परिस्थितीत कामत पक्षाला नवे वळण कसे देतात याकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या काँग्रेस पक्षात तसे मूळ काँग्रेसमन कोणी सापडणार नाहीत. स्वत: कामत भाजपातून तर प्रतापसिंग राणे, रवी नाईक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून आले. परंतु भाजपातून फुटताच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कामत यांना कधी माफ केले नाही. त्यांच्या विरोधात चौकशांचा ससेमिरा लावला. कामत यांना अटक करण्यासाठी जंग जंग पछाडले. वस्तुत: पर्रीकर यांनी केसेस दाखल केलेले, चौकशा चालवलेले, गुन्हे दाखल केलेले व अटकही झालेले अनेक काँग्रेसजन सध्या भाजपात आहेत आणि महत्त्वाची मंत्रीपदेही भूषवताहेत. परंतु हे घडतेय पर्रीकरांच्या पश्चात. राज्यात भाजपाने पर्रीकरांचा संपूर्ण वारसा टाकून देण्याचा प्रयत्न चालविल्याची टीका होते. परंतु तसे असले तरी नूतन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारला आश्वासक चेहरा दिला आहे. चालू विधानसभा अधिवेशनातही ते अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून वाखाणले गेले. या परिस्थितीत सरकारला विधायक विरोध करतानाच काँग्रेस पक्षाची गेलेली पत पुन्हा निर्माण करणे  व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावणे ही कामे कामत यांना अनुक्रमे करावी लागणार आहेत. कामत यांचे वैशिष्ट्य असे की ते कार्यकर्त्यांना, नेत्यांना बरोबर घेऊन जाऊ शकतात. ते नेमस्त आणि मनमिळावू आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण पाच वर्षे आश्वासक चेहरा दिला व या काळात काँग्रेस कार्यकर्ते खुश होते. गोव्यातील काँग्रेस पक्षाचे दुर्दैव असे की जे नेते निर्माण झाले त्यांनी आपल्यापुरते पाहिले व या पक्षाला संघटनात्मक बळ कधी लाभू दिले नाही. भाजपाचे तसे नाही. सरकार त्या पक्षाचे असतानाही, त्यांनी संघटनात्मक कामाकडे कधी दुर्लक्ष केले नाही. सध्या भाजपाच्या संघटनात्मक कामाची धुरा पक्षाचे संघटनमंत्री सतीश धोंड चालवतात. पर्रीकरांच्या काळात एका बाजूला सरकार चालविताना त्यांचा स्वत:चा संघटनेवरही वरचष्मा असे. पर्रीकरांच्या शेवटच्या काळात, भाजपाचे संघटनेकडे दुर्लक्ष झाले असे या पक्षाची कोअर समितीही मान्य करते. त्या दृष्टीने सतीश धोंड यांनी सध्या पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे काम जोरदारपणे हाती घेतले असून पक्षाच्या अडगळीत टाकलेल्या अनेक नेत्यांना पुन्हा संघटनात्मक कामास जुंपून घेतले जात आहे. हीच कार्यपद्धत कामत यांना सुरू करावी लागेल. ते भाजपातून आल्याने त्यांना संघटनात्मक कामाचाही अनुभव आहे. त्यांनी विधानसभेत इतर विरोधी पक्षांशी समन्वयाने कार्य करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु विविध मतदारसंघांतील संघटनात्मक बळ व कमजोरी हेरून नवे नेते तयार करणे व विधिमंडळ तसेच संघटना यातील समन्वय वाढविणे व हा पक्ष आक्रमक बनवणे, रस्त्यावर उतरून व विविध आंदोलनांमधील ताकद वाढवणे ही कामे त्यांना करावी लागणार आहेत. पक्ष सोडून गेलेल्या काही तडफदार व प्रामाणिक नेत्यांनाही त्यांना परत आणावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस पक्ष विधानसभेत केवळ पाच सदस्यांचा असून तो विलक्षण कमकुवत बनला आहे. बहुसंख्य ख्रिस्ती आमदार सत्तास्थाने मिळवण्यासाठी भाजपात गेले आहेत. त्यांच्या विरोधातील लोकांच्या असंतोषाला आकार देणेही भाग आहे. केवळ काँग्रेस पक्षाला ताकदवान बनविण्यासाठी हे द्वंद्व महत्त्वाचे नसून लोकशाहीच्या बळकटीसाठीही आवश्यक आहे. लोकांचा राग पाहता ते अशा लढवय्या काँग्रेसला निश्चितच पाठिंबा देतील. परंतु त्यांचे प्रश्न मांडणे आणि सरकारला नामोहरम करण्याची एकही संधी न दवडणे ही कामे कामत यांना करावी लागतील. लोकांचा राग पाहता येत्या वर्षभरात निवडणुका झाल्यास त्यांना सामोरे जाणे भाजपाला निश्चितपणे कठीण असणार आहे. (लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत) 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा