शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

नव्या डावात मोदी सवंगडी बदलणार? नेत्यांची पुढची पिढी लोकसभेत जाणार, मोदी धक्कातंत्र अवलंबणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 8:58 AM

आपल्या तिसऱ्या कार्यकाळात मोदी मोठ्या प्रमाणावर फेरबदल करतील, वेगवेगळ्या क्षेत्रात नवे चेहरे आणतील, असे सत्तावर्तुळात बोलले जाते आहे.

-हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभांतून ‘घराणेशाहीचे राजकारण ही सर्व अनिष्ट गोष्टींचे मूळ असल्याचे’ सांगत असतानाच त्यांच्या मनात नेमके काय शिजते आहे, हे मात्र कुणीच खात्रीने सांगू शकत नाही. सतराव्या लोकसभेत त्यांनी केलेल्या अखेरच्या भाषणातल्या घराणेशाहीच्या संदर्भाचा नेमका अर्थ काय घ्यायचा, यावर भाजपचे अनेक नेते डोकेफोड करत आहेत. अशा प्रकारची ‘घराणेशाहीची संस्कृती’ भाजपतही आहे, अशी शेरेबाजी काही विरोधी नेत्यांनी केली होती. घराणेशाहीबद्दल बोलताना मोदी अचानक तिकडे वळले. उत्तर प्रदेश विधानसभेत राजनाथ सिंह यांचा मुलगा आमदार आहे किंवा अमित शाह यांचा मुलगा क्रिकेट नियामक मंडळावर आहे, असे विरोधी नेत्यांनी म्हटले होते. ही तुलना चुकीची ठरेल असे सांगून मोदी यांनी त्यांचे म्हणणे उडवून लावले. ‘तुमच्याकडची घराणेशाही सत्तेची चक्रे फिरवत असते; जे भाजपमध्ये होत नाही’, असे मोदी म्हणाले. 

राजनाथ सिंह यांचे पुत्र अजयसिंह उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आणि आमदार आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल आणि संरक्षणमंत्र्यांना निवडणुकीनंतर काही तरी घटनात्मक जबाबदारी दिली जाईल, अशा बातम्या दिल्लीत चर्चेत होत्या. ‘आपले सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येत असून कुंपणावरची बहुसंख्य मतेही खिशात टाकली जातील’, असा समज निर्माण करण्यात मोदी यशस्वी झाले आहेत. या तिसऱ्या कार्यकाळात मोदी मोठ्या प्रमाणावर फेरबदल करतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नवे चेहरे आणतील, असे सत्तावर्तुळात बोलले जाते. दक्षिणेत भाजपला पाय रोवायचे असल्याने त्या प्रांतातून माणसे उचलली जातील. 

भाजपने २०१९ साली सुमारे चार टक्के मते मिळवली होती; यावेळी म्हणजे २०२४ साली १० टक्के लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मोदी यांनी एस मुरुगन यांचा अपवाद करून त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले. ओडिशातूनही अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी मिळाली; मात्र इतर सहा जणांना ती नाकारण्यात आली. नवे मंत्रिमंडळ नवे युग पाहील, असे संकेत यातून मिळत आहेत. अनेक जागा खाली असूनही २०२१ च्या जुलैनंतर मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार सहेतुकपणे केला नाही. अनेक मंत्री ७५ या वयोमर्यादेपेक्षा कितीतरी लहान आहेत. याचा अर्थ वय हा निकष यानंतर असणार नाही.

सत्यपाल मलिक यांचे पुस्तक?जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना सत्यपाल मलिक यानी मंजूर केलेल्या काही प्रकल्पांच्या संबंधात सीबीआयकडून दिल्लीत मलिक आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या घरी छापे टाकून चौकशी होत आहे. या छाप्यात काय हाती लागले याचा तपशील सीबीआयने अद्याप उघड केलेला नाही. मलिक यांनाही तो देण्यात आलेला नाही. भाजप नेतृत्वही याबाबतीत मौन राखून आहे; कारण अचानक सत्यपाल मलिक कोठून उगवले आणि २०१७ साली बिहारचे राज्यपाल म्हणून नेमले गेले हे त्यांनाही कळलेले नाही. मलिक यांना नंतर जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. 

आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात ते चार राज्यात  राज्यपाल होते; या काळाविषयी ते पुस्तक लिहिण्याचा विचार करत आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते. केंद्र राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर पुलवामामध्ये हल्ला झाला त्यावेळी मलिक यांनी केलेल्या विधानामुळे सत्तारूढ पक्षात त्यांच्याविषयी संताप व्यक्त झाला होता. विद्यमान राज्यपाल अशा प्रकारची विधाने कशी काय करू शकतात? लक्ष्मणरेषा कशी ओलांडतात, असा प्रश्न त्यावेळी केला गेला. त्यांना तत्काळ काढून टाकण्यात यायला हवे होते. परंतु तसे काहीही घडले नाही.

जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम करत असताना दिलेल्या दोन कंत्राटाविषयी सीबीआय आता चौकशी करत आहे. मलिक खरोखरच पुस्तक लिहीत आहे की, तसा विचार करत आहेत याबद्दल कोणालाच खात्रीलायकरीत्या सांगता येत नाही. मलिक यांच्या कहाणीतला शेवटचा शब्द लिहिला जाणे अजून बाकी आहे.

बासुरी स्वराज यांचा उदयबासुरी स्वराज कोण? २०२३ च्या मार्च महिन्यापर्यंत ही व्यक्ती कोणालाही ठाऊक नव्हती. दिल्ली भाजपच्या सहनिमंत्रक म्हणून नेमले जाईपर्यंत हे नाव फार परिचित नव्हते. सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांच्या त्या कन्या! बासुरी यांनी वार्विकशायर विद्यापीठातून पदवीपूर्व शिक्षण घेऊन इंग्रजी वाङ्‌मयात बी. ए. ऑनर्स ही पदवी मिळवली. नंतर त्या लंडनमधील बीपीपी लॉ स्कूलमध्ये दाखल झाल्या. पुढे २००७ साली बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये त्यांनी नाव नोंदवले. त्यांच्याकडे १७ वर्षांचा अनुभव असून, त्यांनी बरेच नाव कमावले आहे. आता चर्चा अशी आहे, की बासुरी यांना दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल. वृत्तवाहिन्यांवरही भाजपच्या प्रवक्त्या म्हणून त्यांना मोठी मागणी असते. भाजपच्या विरोधकांवरही त्यांनी प्रभाव टाकलेला दिसतो.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी