शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

वाऱ्यावरची वरात

By admin | Published: January 05, 2016 11:51 PM

पन्नास हजार लोकसंख्येचे एक शहर वर्षभर कोणत्याही प्रशासनाशिवाय आहे. येथे ग्रामपंचायत, नगरपालिका असे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कोणतेही प्रशासन नाही.

पन्नास हजार लोकसंख्येचे एक शहर वर्षभर कोणत्याही प्रशासनाशिवाय आहे. येथे ग्रामपंचायत, नगरपालिका असे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कोणतेही प्रशासन नाही. तरीही लोक राहतात यावर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही; पण मराठवाड्याची राजधानी औरंगाबादचे जुळे शहर म्हणून गेल्या पंधरा-वीस वर्षांत विकसित झालेल्या सातारा-देवळाई परिसराची ही शोकांतिका आहे. औरंगाबाद शहराच्या शेजारी म्हणजे अवघ्या शंभर फुटांवर हे शहर वसले आहे. कोणतेही स्थानिक प्रशासन नसणारे देशातील हे एकमेव शहर असावे.गेल्या काही वर्षांत हा सर्वात वेगाने वाढलेला परिसर. शहरालगत पण ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या भागात जागेचे भाव तुलनेने कमी आणि बांधकाम नियमांचा जाच कमी. या दोन गोष्टींमुळे येथे भरभराट झाली आणि भली मोठी गुंठेवारी अस्तित्वात आली. ही बेशिस्त वाढ होताना प्रशासनाने लक्ष दिले नाही. उलट काणाडोळा करीत अधिकारी आपली तुंबडी भरत राहिले. रस्ते, पाणी, मलनि:सारण याची कोणतीही व्यवस्था किंवा नियोजन नाही. अशा पायाभूत सोयी नसताना अर्धा लाख लोकसंख्येसमोर कोणते प्रश्न निर्माण झाले याचा विचारही प्रशासन करीत नाही. बाराही महिने भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.सातारा- देवळाईचाच नाही, तर राज्यभर मोठ्या शहरालगत उभ्या राहिलेल्या वसाहतींचा हा प्रश्न आहे. येथे कोणत्याही नागरी विकास नियमांची अंमलबजावणी झालेली नाही, असे म्हणण्यापेक्षा प्रत्येक नियम व कायद्यास मुरड घालून पळवाटा काढण्याचाच प्रयत्न प्रशासनाने केला. कारण या बेशिस्त विकासामागे मोठे अर्थकारण होते.सातारा- देवळाईचा प्रश्न गेल्या वर्षी उभा राहिला. तेथील ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपालिका स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. हरकती मागविल्या, प्रशासक नेमला, नेमकी त्यावेळी औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर होती. या मतदारांचा आपल्याला लाभ होईल हा विचार त्यावेळी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी केला आणि महानगरपालिकेने घाईघाईने सातारा-देवळाई परिसर पालिकेत जोडण्याचा ठरावही केला. यामागे मतांचे राजकारण होते. त्याचबरोबर विकासासाठी सरकारकडून मिळणाऱ्या २०० कोटींच्या निधीवरही डोळा होता.सरकारनेसुद्धा आडकाठी केली नाही. त्याचवेळी निवडणूक आयोगाने ११३ वॉर्डांची निवडणूक जाहीर केली. सातारा-देवळाईच्या दोन वॉर्डांचा यात समावेश नव्हता आणि झाला असता तरी ते दोन वॉर्ड राखीव झाले होते. त्यातून राजकीय लाभ फारसा नव्हता हे लक्षात येताच महापालिकेने घूमजाव केले; पण तोपर्यंत येथील दप्तर महापालिकेने ताब्यात घेतले. पाणीपुरवठ्यासाठी टँकर सुरू केले. महापालिकेची आर्थिक दिवाळखोरी आणि औरंगाबाद शहराची बकाल अवस्था तसेच स्वतंत्र नगरपालिकेचे राजकारण आणि राजकीय महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन सातारावासीयांनी महापालिकेला विरोध केला आणि सातारा देवळाई परिसराची स्थिती त्रिशंकू झाली.या विलिनीकरणास एक आर्थिक बाजू होती. २००७ मध्ये शहरात विकास हक्क हस्तांतर निधी नियम (टीडीआर) लागू झाला. सातारा परिसरातून जाणारा प्रमुख रस्ता बीड बायपास वरील मालमत्तांमध्ये याचा फायदा घेत शहरात चटईक्षेत्र वापरता येईल, अशी बिल्डर लॉबीची अटकळ होती; पण नगरपालिका की महापालिका असे भिजत घोंगडे पडल्याने या कालहरणामध्ये त्यांचाही येथील मालमत्तांमधील रस संपला आणि हा परिसर सर्वांनीच वाऱ्यावर सोडला. आता नगरपालिकेच्या निर्मितीसाठी ४,२०० तर महापालिकेसाठी २७ जणांनी आक्षेप नोंदविले आहेत. त्याची सुनावणी पुढील आठवड्यात होईल आणि या परिसराचे ग्रहण सुटेल; पण राजकारण आणि अर्थकारणाच्या साठमारीत पन्नास हजार लोकांची वरात वाऱ्यावर काढली याचा जाब कोण विचारणार?- सुधीर महाजन