शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

शहाण्या माणसाचे पेय

By admin | Published: October 14, 2016 12:39 AM

पाणी हे शहाण्या माणसाचे पेय आहे, असे थोर विचारवंत आणि ललित लेखक हेन्री डेव्हिड थोरो यांनी म्हटले आहे. माणसाच्या जीवनात पाण्याचे स्थान अनन्यसाधारण

- प्रल्हाद जाधवपाणी हे शहाण्या माणसाचे पेय आहे, असे थोर विचारवंत आणि ललित लेखक हेन्री डेव्हिड थोरो यांनी म्हटले आहे. माणसाच्या जीवनात पाण्याचे स्थान अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे. पंचमहाभुतांत पाण्याचा समावेश आहे. पृथ्वीचा पंचाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. माणसाच्या शरीरातही नव्वद टक्के पाणी असते. अन्नावाचून माणूस तीन आठवडे जगू शकतो, पण पाण्यावाचून एक दिवसही नाही.ज्या गर्भाशयात त्याला नऊ महिने वास करावा लागतो, तेसुद्धा जीवनरसयुक्त पाण्याने तुडुंब भरलेले असते. हैड्रोजनचे दोन आणि आॅक्सिजनचा एक कण मिळून बनलेल्या पाण्यात जगण्यासाठी अनिवार्य असा आॅक्सिजन आहे असे विज्ञान सांगते.बायबल असो, कुराण असो वा ऋग्वेद; सृष्टी निर्मितीच्या कहाणीतील पहिल्या पाच वाक्यात पाण्याचे महात्म्य वर्णिलेले आढळते. पाऊस पडला की धरणी सुजलाम सुफलाम होते, नद्या समुद्राला मिळतात, पाण्याची वाफ थंड हवेच्या स्पर्शाने पाणी होऊन पुन्हा खाली येते आणि चराचराला संजीवनी देते. नद्यांच्या काठावरच माणसाच्या विविध संस्कृती उदयाला आल्या आणि विकसित झाल्या. हजारो वर्षांपासून निसर्गाचे चक्र अव्याहतपणे सुरू आहे ते पाण्यामुळेच आणि म्हणूनच माणूस त्याला जीवन असे म्हणतो.अशा या तीर्थस्वरूप पाण्यात अल्कोहोल मिसळून ते दूषित करून पिणे यात कोणता शहाणपणा आहे हे लक्षात येत नाही. राष्ट्रांची अर्थव्यवस्था, कलावंताची प्रतिभा आणि श्रमिकांचा श्रमपरिहार दारूवर अवलंबून आहे, असे आजवर कुठेही सिद्ध झालेले नाही. फायदा सोडाच पण दारूमुळे होणाऱ्या नुकसानाची शेकडो उदाहरणे दाखवून देता येतील. रोम आणि ग्रीसचा विनाश दारूमुळे झाला तर इंग्लंड अमेरिकाही त्याच मार्गावर आहे, असेही थोरोने सांगून ठेवले आहे.दारूचे समर्थन करणारे अनेक शहाणे पुढे येतील पण त्यातला एखादा तरी आपल्या बायको आणि मुलांना सोबत घेऊन उघडपणे दारू पिण्याची हिम्मत दाखवू शकेल काय? क्षमा करा, पण हे पाणीपुराण वाचून सकाळीच ज्यांचे हातपाय थरथरायला लागले असतील त्यांना मी निरोगी आणि सुंदर दिवसासाठी शुभेच्छा देत आहे. आणि हो, कोल्ड्रिंकमुळे मधुमेह आणि फ्रीजमधील पाण्यामुळे सांधेदुखी जवळ येते हे लक्षात घेऊन साऱ्यांनीच प्लेन वॉटरवर विश्वास ठेवण्याचा शहाणपणा दाखवणे सुरू करावे असेही सुचवत आहे.