शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
2
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
3
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
4
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
6
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
7
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
8
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
9
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
10
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
11
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
12
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
13
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
14
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
15
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
16
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
17
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
18
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
19
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
20
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'

नाते आणि व्यवस्था यांच्या केंद्रस्थानी असल्यामुळे स्त्रीला मोकळेपणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 1:59 AM

आजच्या स्त्री ची आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती उत्तम झाली आहे. आजची स्त्री शिक्षित असल्या कारणाने तिला आर्थिक व वैचारिक स्वातंत्र्यही आहे. आता ते स्वातंत्र्य आपण कसे घेतो आणि त्याचा कसा वापर करतो, हे सर्वस्वी ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे.

- स्नेहलता देशमुख । माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठआजच्या स्त्री ची आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती उत्तम झाली आहे. आजची स्त्री शिक्षित असल्या कारणाने तिला आर्थिक व वैचारिक स्वातंत्र्यही आहे. आता ते स्वातंत्र्य आपण कसे घेतो आणि त्याचा कसा वापर करतो, हे सर्वस्वी ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. अर्थकारणामुळे समाजकारण बदलत गेले. औद्योगिक क्रांतीमुळे अवघ्या जगात सामाजिक उलथापालथ झाली. आज अनेक जुन्या सामाजिक व्यवस्थांना धक्का बसला आहे. जातीव्यवस्था, वर्णभेदाला तडे गेले आहेत. लिंगभेदाच्या कल्पनांनाही जबर हादरा बसला आहे. हे सर्व बदल महिलांच्या दृष्टीने वरदान ठरले आहेत. तरीही प्रत्येक क्षेत्रांत आज स्त्रीला मोकळेपणाची गरज आहेच. ती प्रत्येक नाते आणि व्यवस्था यांच्या केंद्रस्थानी असल्यामुळे तिला मोकळेपणाची आवश्यकता आहे.एकत्र कुटुंब पद्धती आज अस्तित्त्वात नाही. मात्र, जेथे ती आहे, तेथे संवादाच्या अभावामुळे वाद घडून आलेले दिसतात किंवा एकमेकांबद्दल गैरसमज तरी झालेले दिसतात. वेळाच्या अभावामुळे कुटुंबातील व्यक्तींचा एकमेकांसोबतचा संवाद अपुरा पडतो, शिवाय ज्या मालिका किंवा समोर असणारी प्रसार माध्यमे यांमधून समोर येते, ते नातेसंबंधासाठी फार पौष्टिक असते, असे नाही. मुलांची देखभाल कोणी करायची, हासुद्धा आजच्या काळातला महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणाच्या किती आणि कोणत्या जबाबदाऱ्या आहेत? त्या कशा निभावल्या गेल्या पाहिजेत, यामध्ये सुसंवाद घडायला हवा.प्रत्येक पिढीमध्ये अंतर असतेच. शारीरिक असतेच, पण मानसिकही असतेच. मात्र, आजची स्त्री शिक्षित आहे, तिला वैचारिक स्वातंत्र्य आहे. मात्र, दिवसाच्या २४ तासांचे नियोजन कसे आणि काय करावे, हा तिच्यापुढे मोठा प्रश्न असतो. हातात असलेली वेळ किंवा परिस्थिती कशी हाताळायची आणि तिच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे, हे जिच्या तिच्यावर अवलंबून असते. हेच समोरच्या खुर्चीमध्ये असणाºयांवरही तितकेच अवलंबून आहे. एक स्त्री जेव्हा दुसरीला समजून घेईल, तिचे कौतुक करेल, तेव्हा नक्कीच परिस्थिती बदलू शकते.मी टू कॅम्पेन आज चालू आहे. हे जे काही सुरू आहे, ते आजचे नाही, यापूर्वीही हे होत होते. मात्र, याला जबाबदार पुरुष आणि स्त्री दोघेही आहेत. आपण ठरवायला हवे की, आपली गरज भावनिक असेल, तर ती एका मर्यादेपर्यंतच असावी, ती शारीरिक होईल, इथपर्यंत जाऊच नये. माध्यमांनी यामध्ये सकारात्मकता दाखविण्याची गरज आहे. माध्यमांमध्ये वाढणारी स्पर्धा जगातील या साºयाला खतपाणी घालत आहे. या सर्वांवर एकाच उपाय आहे की, प्रत्येक गोष्टीतला, नात्यातला संवाद. त्याने अनेक गोष्टी सहज सोप्या पद्धतीने हाताळल्या जाऊ शकतात.आजही अनेक ठिकाणी कुटुंबीयांसाठी स्त्रियांना कामाची वेळ कमी करावी लागते किंवा अ‍ॅडजस्टमेन्ट करावी लागते. अशा वेळी पुरुषांनी तिच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करायला हवेत. एक खूप छान वाक्य आहे हिंदीत, त्याप्रमाणे सगळ्यांनीच एकमेकांना सांभाळून घेतले, तर नक्कीच स्त्रियांची परिस्थिती भविष्यात आणखी बदलू शकते हे निश्चित.रिश्ते निभाने के लिए पैसो की जरूरत नहींदो खूबसूरत लोग चाहिएएक जो निभ सके और दुसरा जो समझा सके

टॅग्स :Womenमहिला