शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शब्दझुळूक

By admin | Published: September 19, 2016 4:29 AM

आपण सण उत्सव साजरे करतो. जयंत्या मयंत्या साजऱ्या करतो.

आपण सण उत्सव साजरे करतो. जयंत्या मयंत्या साजऱ्या करतो. ह्यात मन किती, तन किती आणि धन तर आहेच, ह्याचा विचार करायला हवा. माणसांचा द्रोह हवा चांगल्या विचारांसाठी. पण द्रोहालाही सांगायला हवं! विवेक स्वीकार. विद्रोहाचा खरा अर्थ विवेकाने केलेला द्रोह हाच आहे. आपण फक्त आग आग करीत राहतो. उरते काय, प्रचंड धगीनंतर फक्त राख. सर्वच महामानवांनी ‘खळांची व्यंकटी सांडो’ म्हटलं. धर्मरक्षणासाठी केलेला द्रोह वैचारिक स्थित्यंतरात हवा, पण तो रक्त सांडण्यात जातो. दु:ख, वेदना, द्रोह, नकार ह्या मानवी जाणिवा काव्य होतात. हरीण पळते आहे जीव मुठीत धरून मागे वाघ लागला म्हणून. एका ठिकाणी अडकते. हात पाय गुंतून पडतात. त्याला वाटते आता आपली सुटका नाही. आपण वाचू शकत नाही. ते अगतिक डोळ्यात भीतीयुक्त प्राण घेऊन उभे आणि मागून वाघ येतो आक्रमक पावलांची झडप घालण्याच्या तयारीत. अशा वेळी हरिणाच्या डोळ्यात जे काही असतं ना त्यालाच गजल म्हणतात. विविध शायर, कवींनी प्रत्येक काव्यप्रकाराचे वर्णन एकेका दृश्यभावनेशी निगडित केलंय. म्हणजे कोणतीही कला वा शब्द हा जगण्याशीच निगडित आहे. आपण म्हणत राहतो ‘कफन को जेब नही होती’ म्हणजेच जाताना देहाएवढीच जागा, तीही आपली नाही, शवावर लोक चढवतील ते कपडे, वाहतील ती फुले, नाही तर अखंड नग्न. अपघातात छिन्नविच्छिन्न झालात तर शरीराचे तुकडे गोळा करून जमा करणार देह! आणि सामूहिक दहन करणार! म्हणून काय काय जमा करीत राहायचे आयुष्यभर? आपला अखंड निर्मळ श्वासच हवा! तो पुरेसा आहे! फक्त त्याची सोबत महत्त्वाची. तो म्हणाला बाय की आपलं खरं नाय. बघता बघता श्वासांसारखी सोबत करणारी माणसं फट्टदिशी विझतात, निघून जातात आणि आपण उर्वरित काळात हळहळत राहतो. मग त्या व्यक्तीच्या स्मृती, वस्तू, घर, कपडे सांभाळत राहायचे. कवटाळायचे. त्यापेक्षा त्याचा शब्द सांभाळा. ह्या अर्थाने कवी लेखक कलावंत भाग्यवानच म्हणायला हवेत. एखादी कलाकृती एखादी ओळ आपल्याला देऊन जाणारे कवी, विचारवंत हे खरे सोबती असतात. मग केशवसुत असोत, कुसुमाग्रज, बोरकर, ढसाळ, अरुण कोलटकर असोत की बालकवी, पाडगावकर ते अगदी काल परवाच जिवाला चटका लावून गेलेला नलेश पाटील, चिल्लर चांदण्या मोजण्यासाठी स्वर्गात सोडून गेलेला असो, शेवटी हे सगळे आपल्यासोबत आहेत हे महत्त्वाचे. ह्यांच्या अक्षरांनी, चित्रांनी, गाण्यांनी, निसर्गातील अखंड संवेदनांनी प्रत्येक हृदयाचा गाभारा भरलेला असला तर जीवन तर सुसह्यच होतं पण ये मरणा म्हणण्याचं अमोघ धाडस प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. ह्या जगण्याच्या क्षणांची झुळूक मन सतेज करीत राहणार आहे आणि ही सतेज मनं एकत्र आलीत की माणुसकीच्या गंधाने भरणार आहे गगनाचा गाभारा! ही शब्दझुळूक जपू या!-किशोर पाठक