शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

बेगानी शादी में दुनिया क्यों दिवानी?

By विजय दर्डा | Published: July 29, 2024 7:12 AM

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सगळ्या दुनियेचे लक्ष का लागलेले असते? भारताच्या दृष्टीने या निवडणुकीचे काय महत्त्व आहे?

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

‘बेगानी शादी में अब्दुला दिवाना’ हे चित्रपटातले गाणे तुम्ही ऐकले असेल. चित्रपट होता ‘जिस देश में गंगा बहती हैं’.  आता या गाण्याची आठवण का व्हावी? - खरेतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीची चर्चा जगभर चालू झाल्यापासून या गाण्याच्या चालीवर एक ओळ मला वारंवार गुणगुणाविशी वाटते. ‘बेगानी शादी में दुनिया क्यों दिवानी?’

जगातल्या कुठल्याही देशात निवडणूक होत असली, तरी इतर देशांचे लक्ष त्याकडे असते. परस्पर संबंध अधिक तणावाचे किंवा फार घनिष्ठ असतील, तर कोणाची सत्ता येणे आपल्या पथ्यावर पडेल, याचा अंदाज प्रत्येक देश बांधत असतो.  अमेरिकेतल्या निवडणुकीकडे मात्र अवघ्या  जगाचे लक्ष असते, कारण अमेरिकेतल्या अंतर्गत घडामोडींचा परिणाम प्रत्येक देशावर होत असतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार, यावर जगातील राजकारण कसे बदलेल याचे अंदाज बांधले जात असतात. अफगाणिस्तानात-तालिबानसोबत अमेरिकेने सुरू केलेली लढाई ट्रम्प यांच्या काळातही लढली जात होती, परंतु बायडेन सत्तेवर येताच अफगाणिस्तानला त्याच्या नशिबावर सोडून देऊन त्यांनी अमेरिकन फौजेला अचानक माघारी बोलावले, अशी आणखीही पुष्कळ उदाहरणे आहेत.

सध्या जगभर चर्चा सुरू आहे की,  यावेळी रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प निवडून येतील की, डेमोक्रेटिक उमेदवार कमला हॅरिस?  बायडेन यांच्या माघारीनंतर कमला हॅरिस यांना अधिकृत उमेदवारी मिळण्याची औपचारिकता तेवढी बाकी आहे. जर त्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या, तर शिकल्या सवरलेल्या आणि सर्वात विकसित म्हटल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष असतील.

या दोघांपैकी कोणाचा विजय भारताच्या पथ्यावर पडेल, हे सांगता येईल. आपण भारतीय नात्यागोत्यांच्या बाबतीत अतिशय भावूक असतो, म्हणून तर ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले, तेव्हा आपण खूश झालो होतो. आता बायडेन यांच्या जागी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी कमला हॅरिस यांचे नाव येताच  चेन्नईपासून ३०० किलोमीटर अंतरावरील थुलासेंद्रपूरम गावात जल्लोष झाला. कमला यांची आई शामला याच गावातून निघून अमेरिकेत पोहोचल्या होत्या. पण, म्हणून कमला हॅरिस यांच्या मनात भारताविषयी काही खास प्रेम आहे काय? मला तसे काही वाटत नाही. त्यांची आई भारतीय होती आणि वडील जमैकन होते, परंतु आपल्या मूळ देशाविषयी कमला यांना विशेष आस्था दिसत नाही. किंबहुना भारताविषयी त्यांनी वेळोवेळी विरोधाचाच सूर लावलेला आहे. २०१९ साली जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवले गेले तेव्हा, ‘आम्ही काश्मीरच्या जनतेला हे सांगू इच्छितो की, तुम्ही एकटे नाहीत. आमचे परिस्थितीकडे लक्ष आहे’, असे त्या म्हणाल्या होत्या. मैत्रीचा भाव राखणारी कोणतीही व्यक्ती, असे कधीच म्हणू शकणार नाही. 

२०२१ सालच्या अमेरिका दौऱ्या त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले, परंतु त्याच्या बदल्यात कमला यांनी ‘भारतात लोकशाही धोक्यात असल्या’ची शेरेबाजी केली. २०२३ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर  असताना, पंतप्रधान मोदी यांनी कमला यांची पुष्कळ स्तुती केली, परंतु उपराष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर कमला यांनी भारताकडे कधी वळून पाहिले नाही. भारत आणि अमेरिकेतील नातेसंबंध आणखी चांगले करण्याच्या दृष्टीने काही विशेष करण्यात त्यांनी अजिबात रुची दाखवली नाही, हेच वास्तव आहे.

समजा, डोनाल्ड ट्रम्प निवडून आले, तर भारताशी असलेल्या अमेरिकेच्या नात्याचे काय होईल, याचा विचार करू. सामान्यत: असे मानले जाते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे आपापसातील संबंध अतिशय चांगले आहेत. फेब्रुवारी २०२० मध्ये ट्रम्प भारतात आले असताना, गुजरातमध्ये त्यांच्यासाठी शानदार आयोजन केले गेले. त्याआधी अमेरिकेत झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाची आपल्याला आठवण असेलच. अलीकडे ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यावर टीका करणाऱ्यांमध्ये नरेंद्र मोदी पुढे होते. दुसरे म्हणजे चीनच्या बाबतीत ट्रम्प जी भूमिका बाळगतात, त्यात भारत मोठी भूमिका बजावू शकतो, हे त्यांना ठाऊक आहे. जगात भारत ही एक वाढती ताकद आहे, म्हणून कोणत्याही परिस्थितीत ते भारताला महत्त्व देतील हे स्पष्ट आहे. 

परंतु, ट्रम्प हे उघड-उघड भारताच्या फायद्याचे आहेत काय, याविषयी मात्र मला शंका आहे. अमेरिकेच्या हितरक्षणाचा मुद्दा  येईल, तेव्हा कमला असो वा ट्रम्प; ते स्वाभाविकपणे अमेरिकेच्या बाजूनेच विचार करतील. ट्रम्प हे तर ‘अमेरिका प्रथम’ या धोरणाचे खंदे पुरस्कर्ते आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी ट्रम्प यांनी हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलीवर जास्त कर लावण्याच्या बाबतीत भारताला लक्ष्य केले होते. त्यांचा स्वर फारसा तिखट नव्हता, एवढेच काय ते!

ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्षपदासाठी जेडी वान्स यांना मैदानात उतरवले आहे. त्यांची पत्नी उषा मूळची भारतीय आहे. थोडक्यात रिपब्लिकन असोत किंवा डेमोक्रॅटिक; दोन्ही  उमेदवारांच्या बाजूने भारताशी नाते जोडलेले आहे, परंतु आणखी एक बाजू अशीही आहे की, अमेरिकन काँग्रेसच्या ५३५ सदस्यांमध्ये भारतीय मूळ असलेले केवळ पाच आहेत. अर्थात म्हणून जास्त आनंदाने नाचण्याची गरज नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर ७८ वर्षांचे ट्रम्प येवोत की, ५९ वर्षांच्या कमला, स्वाभाविकपणे दोघेही भारताच्या नव्हे, तर अमेरिकेच्या हिताचा विचार करतील. त्यामुळे दुसऱ्याच्या लग्नात खूश होऊन अतिरेकी आनंदाने नाचण्याची आपल्याला गरज नाही.  आपण अमेरिकेला आपल्याकडे कसे वळवावे, याचा विचार केला पाहिजे. तो करण्यासाठी आपल्याकडे एस. जयशंकर यांच्यासारखा प्रखर विदेशमंत्री आहे की !

 

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पKamala Harrisकमला हॅरिस