शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
4
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
5
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
6
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
7
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
8
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
9
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
10
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
11
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
12
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
13
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
14
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
15
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
16
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
17
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
19
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
20
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू

भयकारी ट्रम्प विजयी झाले तर जगच बदलून जाईल

By admin | Published: September 27, 2016 5:21 AM

समाज माध्यमात नुकतीच एक ध्वनिचित्रफित बघून मी स्तंभित झालो. तिच्यात ‘अमेरिकेतील शिक्षणाचे व सांस्कृतिकतेचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या मॅसॅच्युसेट्स शहरातून आलिशान

- हरिष गुप्तासमाज माध्यमात नुकतीच एक ध्वनिचित्रफित बघून मी स्तंभित झालो. तिच्यात ‘अमेरिकेतील शिक्षणाचे व सांस्कृतिकतेचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या मॅसॅच्युसेट्स शहरातून आलिशान गाड्यांचा ताफा असलेली एक रॅली निघाली आहे. एका वाहनावर रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे छायाचित्र लावले आहे आणि लोक घोषणा देत आहेत, आम्ही सर्व निर्दयी लोकाना जाळून टाकू’, असे दृष्य त्या चित्रफितीमध्ये होते. मला आधी वाटले ती बनावट वा फेरफार केलेली असावी. कारण रिपब्लिकन पक्ष हे सातत्याने सांगत आलेला नव्हे का की, तोे वंशवादी नाही व त्याला फक्त अमेरिकेला सर्वश्रेष्ठ बनवायचे आहे!.पण आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचार मोहिमेत ट्रम्प यांनी अनपेक्षितपणे डेमोक्रॅट उमेदवार व अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्यावर सरशी मिळवली असल्याने तेथील राजकारणाचे गणित अंदाजापलीकडे बदलून गेले आहे असे मला वाटते. क्लिंटन यांच्या समर्थकांकडून होणारी द्वेषपूर्ण वक्तव्ये आणि कट्टरतेचे प्रदर्शन यांची डेमोक्रॅट पक्षाशी असलेली सांगड तोडणे अशक्य नसले तरी कठीण आहे. ट्रम्प यांनी तर ‘सब कुछ चलता है’ असेच दाखवून दिले आहे. मग त्यात बराक ओबामा यांच्या जन्मदाखल्याचा विषय असो, त्यांनी त्यांचे मूळ आफ्रिकी असणे लपवणे असो, क्लिंटन यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असो, त्यांच्या संस्थेला दहशतवाद्यांशी संबंधित लोकांनी दिलेल्या देणग्या असोत की फेडरल रिझर्व्हच्या जेनेट येलेन यांनी ओबामा प्रशासनासोबत संगनमत करून बाजार पडू नये म्हणून व्याजदर कमी करणे असो. ट्रम्प या साऱ्याचे भांडवल करीत असतात. आणि हो, ट्रम्प एकदा का व्हाईट हाऊसमध्ये गेले की मग एकाही मुसलमानाला अमेरिकेत येऊ दिले जाणार नाही.ट्रम्प यांच्या बाबत अडचण ही आहे की ते सतत आपली विधाने बदलत असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्याच आधीच्या वक्तव्यात अडकवणे अवघड जाते. बराक ओबामा यांच्या राष्ट्रीयत्वावर ट्रम्प २०११ पासून सतत शंका घेत आले आहेत. ओबामांचा जन्म हवाई किंवा त्यांच्या वडिलांच्या देशात म्हणजे केनियात झाला, अशी ट्रम्प यांच्या मनातील शंका आहे. पण गेल्या आठवड्यात ओबामांनी आपले अमेरिकी राष्ट्रीयत्व सिद्ध करण्यासाठी त्यांचा जन्म दाखला प्रसिद्ध करताच ट्रम्प यांनी दुसराच वाद निर्माण केला. ओबामांच्या राष्ट्रीयत्वाचा वाद आपण नव्हे तर २००७ साली डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवारीसाठी ओबामा-हिलरी आमनेसामने होते तेव्हां हिलरी यांनीच निर्माण केला होता, असे ते आता म्हणत आहेत. फेडरल रिझर्र्व्हच्या जेनेट येलेन यांच्या संदर्भातही ट्रम्प उलटसुलट विधाने करीत आहेत. येलेन यांच्या पतधोरणाचे ते आधी प्रशंसक होते पण आता ते येलेन यांना ओबामा सरकारच्या हातातील बाहुले म्हणत आहेत. आपण श्वेत वर्चस्ववादी आहोत असे जरी ट्रम्प उघडपणे म्हणत नसले तरी (लेखाच्या प्रारंभी वर्णिलेल्या) त्यांच्या रॅलीज पाहिल्या तर त्यांच्या या दाव्याची सत्यता पटत नाही. ट्रम्प स्वत:ला निस्सीम राष्ट्रवादी म्हणवून घेतात आणि त्याचवेळी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या राष्ट्रवादाची खुली प्रशंसाही करतात. ट्रम्प हे अब्जाधीश उद्योगपती आहेत व त्यांचे टीकाकार त्यांना पर्यायी उजवे म्हणून संबोधतात. त्याचे कारण ट्रम्प यांची निकृष्ट अभिरुची व असंवेदनशीलता. उदारमतवादी लोकांना जे हीन लेखतात त्यांना पर्यायी उजव्या विचारसरणीचे म्हणून संबोधले जाते. पण क्लिंटन यांच्या आता हे लक्षात आले आहे की वॉशिंग्टनच्या सत्तावर्तुळाला धोका निर्माण झाला आहे कारण ट्रम्प यांच्या उन्मादी समर्थकांचा तिथे उदय होऊ लागला आहे. हे सर्व समर्थक श्वेतवर्णीय पुरुष व महत्वाचे म्हणजे अल्पशिक्षित आहेत. आधुनिक राष्ट्र कल्पनेपासून ते खूप दूर आहेत. ट्रम्प यांचा सध्याच्या रिपब्लकन पक्ष हा लोकाना ज्ञात असलेला रिपब्लिकन पक्ष नाही. त्यांचा पक्ष म्हणजे उन्मादी वर्तन करणाऱ्यांचा आणि शिवराळ भाषा वापरणाऱ्यांचा समूह झाला आहे. तो आता राजकीय पक्षही राहिलेला नाही. शिवराळ भाषा करणाऱ्या समूहांचे ट्रम्प हे राष्ट्रीय प्रवक्ते बनले असल्याचे क्लिंटन यांचे मत झाले आहे. आता आतापर्यंत क्लिंटन ट्रम्प यांच्या इतक्या पुढे गेल्या होत्या की दोहोतील अंतर कमी करणे ट्रम्प यांना अशक्य असल्याचे भासत होते. पण आता निवडणुकीला केवळ सात आठवडे बाकी असतांना हे अंतर वेगाने कमी होताना दिसते आहे. मागील आठवड्यात दोन्ही पक्षांची समान ताकद असलेल्या दोन राज्यात, म्हणजे ओहिओ आणि फ्लोरिडा येथील शर्यत अवघड असतानाही ट्रम्प आता पुढे जाताना दिसत आहेत. ही स्थिती अमेरिकेतील अभिजन वर्गाची चिंता वाढवणारी आहे. शीत युद्धाच्या काळानंतर अमेरिकेत आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या साऱ्यांनी क्लिंटन यांना पाठिंबा दिला असला तरी त्या ओबामांच्या प्रतिमेसमोर खुज्याच पडत आहेत. २००८ च्या निवडणुकीत ओबामा यांनी सर्व मतदाराना जॉर्ज बुश यांच्या सैनिकी धोरणाच्या विरोधात प्रभावित केले होते. पण क्लिंटन यांनी ट्रम्प यांना व्यक्तिगत पातळीवर लक्ष्य केले असून त्यांनी ट्रम्प समर्थकांवरही टीका केली आहे. ओबामांप्रमाणे श्वेत, कृष्ण व इतर वर्णीय मतदारांना प्रभावी करण्यातही हिलरी अयशस्वी ठरल्या आहेत. त्यांना नुकताच न्यूमोनिया झाला होता व त्यामुळे त्यांच्या शारिरीक सक्षमतेबाबात शंका घेण्याची आयतीच संधी ट्रम्प यांना मिळाली होती. नोव्हेंबरमधील निवडणुकीच्या निकालाचे भारतावर नक्कीच परिणाम होणार आहेत. तेथील भारतीय वंशाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेला देणग्या दिल्या आहेत. त्यातले जे हिंदुत्ववादी समजले जातात त्यांना ट्रम्प यांचा विजय हवा आहे, कारण ट्रम्प इस्लामविरोधी आहेत. पण सगळ्यात मोठी चिंता पंतप्रधान मोदींना आहे. कारण ट्रम्प ओबामांसारखे अपरिचिताला पहिल्या नावाने हाक मारून प्रोत्साहन देणारे नाहीत व इस्लामविरोध सोडला तर खूपच वेगळेही आहेत. ट्रम्प नेहमी विदेशी नागरिकांकडे व त्यांच्या धर्माकडे पूर्वग्रहाने बघत असतात. ही बाब अत्यंत भयावह आहे. त्यामुळे अमेरिकेला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या जगाची २०१७ मधील अवस्था पार बदलून जाण्याची शक्यता आहे.

(लेखक ‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर आहेत )