शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

पॅरीस हल्ल्यानंतरच्या चिंतावलेल्या जगात

By admin | Published: November 24, 2015 11:38 PM

इसीसच्या अतिरेक्यांनी पॅरिसमध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्याला जेमतेम बारा-पंधरा दिवस होत आहेत. त्यापाठोपाठ आफ्रिकेतल्या मालीत, ब्रुसेल्समध्ये दहशतवाद्यांनी

प्रा.दिलीप फडके, (ज्येष्ठ विश्लेषक)इसीसच्या अतिरेक्यांनी पॅरिसमध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्याला जेमतेम बारा-पंधरा दिवस होत आहेत. त्यापाठोपाठ आफ्रिकेतल्या मालीत, ब्रुसेल्समध्ये दहशतवाद्यांनी आपल्या हल्ल्यांनी निरपराध सामान्य नागरिकांना वेठीला धरले. आॅस्ट्रेलियापासून युरोपपर्यंत साऱ्या जगात दहशतवाद हा आज सर्वात मोठा आणि जटील प्रश्न बनला आहे. इसीस, बोको हराम, अल कायदा, अल शबाब यासारखे दहशतवादी गट आज अनेक ठिकाणी सक्रीय आहेत. पॅरिस वा मालीसारखा हल्ला बरोबर सात वर्षांपूर्वी मुंबईवर झाला होता. त्यावेळी केवळ दुरून सल्ला देणाऱ्या युरोपातल्या देशांना जेव्हां पॅरिसमध्ये तसाच प्रकार घडला, त्यावेळी दहशतवादाचा खरा चेहरा पाहायला मिळाला आणि त्याच्या विरोधात सर्वंकष युध्द पुकारण्याची गरज भासली. म्हणूनच फ्रान्सचे राष्ट्रपती आलांदे यांनी आता युध्द सुरु झाले आहे, अशा शब्दात स्थितीचे वर्णन केले. दहशतवादाच्या विरोधातली लढाई सोपी नाही व चारदोन ठिकाणी विमानातून बॉम्बहल्ले करून ती जिंकता येणार नाही. दहशतवादी कारवायांसाठी आज अतिशय प्रगत मार्ग आणि तंत्रज्ञान वापरले जात असल्याने त्याच्या विरोधात काम करताना तितक्याच आधुनिक मार्गांचा वापर करणे गरजेचे झाले आहे. ‘ल मॉन्द’ या फ्रेंच वृत्तपत्राने आपल्या संपादकीयात, आज युरोपात बेल्जियम हा जिहादी अतिरेक्यांसाठी पूर्ण मोकळीक असणारा देश झाला असल्याचे नमूद करून त्यांच्या गरजेच्या अनेक गोष्टी तिथे सहजी उपलब्ध होत आहेत व युरोपातल्या इतर देशांमध्ये घुसण्यासाठी एक लॉन्चिंग पॅड म्हणून बेल्जियम उपयोगी ठरत असल्याचे म्हटले आहे. अशा स्थितीत बेल्जियमला अधिक सशक्त करून तिथे अधिक चांगली आणि कार्यक्षम व्यवस्था निर्माण करण्याच्या गरजेकडे लक्ष वेधले आहे. बेल्जियमच्या ‘नॅक’ या नियतकालिकात घेंत विद्यापीठातल्या प्रा.हरमन मात्थिज यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात युरोपियन देशांनी अंतर्गत सुरक्षाव्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी काय केले पाहिजे, तसेच त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करणे कसे आवश्यक आहे याचा विस्तृत आढावा घेतला आहे. ‘द इकॉनॉमिस्ट’ने पॅरिसवरच्या हल्ल्यास आपल्या मुखपृष्ठावर स्थान देत या विषयाचा विस्तृत आढावा घेणारे लेख प्रकाशित केले आहेत. ‘टेरर इन माली’ या शीर्षकाच्या आढाव्यात अलीकडच्या हल्ल्यांची दोन वैशिष्ट्ये सांगितली आहेत. या हल्ल्यांमध्ये बॉम्बचा वापर न करता हल्लेखोरांनी आधुनिक प्रकारच्या बंदुका वापरल्या आणि आपण हल्ल्यांमधून जिवंत वाचणार नाही हे हल्लेखोरांना माहिती होते. नव्हे; ते त्यासाठी पूर्णत: तयार होते. बंदुका वापरणे तुलनेने खूप सोपे असते आणि जेव्हां हल्लेखोर आत्मघातास तयार असतो तेव्हां त्याच्याशी चर्चा किंवा वाटाघाटी करायची फारशी संधीच नसते. पॅरीस वा माली व त्यापूर्वीच्या सिडनी किंवा इतर ठिकाणच्या हल्ल्यांमध्ये हल्लेखोरांनी काही लोकाना ओलीस ठेवले होते, ते मुख्यत: आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जावे आणि प्रतिहल्ला करायच्या पोलीस वा लष्कराची क्षमता मर्यादित व्हावी यासाठीच. वाटाघाटी करून काही मागण्या पदरात पाडून घेऊन बंधकांची मुक्तता वगैरे करण्याची त्यांची योजना नव्हती. बंदुकांची तस्करी होणार नाही आणि हल्लेखोर गटांच्या ताब्यात आधुनिक शस्त्रे पडणार नाहीत यासाठी खूप काही करण्याची गरज सांगत या दहशतवादी कारवायांचा सामना करण्यासाठी अधिक चांगले प्रशिक्षण असलेले आणि त्याचे विशेष कौशल्य असणाऱ्या सैनिकांचे दल तयार करण्यासाठी संपन्न देशांनी खूप काम करणे गरजेचे असल्याचेही म्हटले आहे. याच अंकात प्रकाशित एका अन्य लेखात इसीसने पाडलेले रशियन विमान, त्यानंतर लेबेनॉन मग पॅरीस, माली इथले हल्ले आणि क्रुसेडर्सना अमेरिकेत आणि बाहेर मारण्याची मिळालेली धमकी यांचा संदर्भ देत दहशतवादी शक्तींचा मुकाबला करण्यासाठी काय करावे लागेल याचा उहापोह केला आहे. या युद्धातल्या शत्रूला नीट जाणून घेणे आवश्यक असल्याचे सांगून हा संघर्ष दीर्घकालीन असल्याचेही म्हटले आहे. आपली माणसे आणि आपली मूल्ये या दोघांचे आपल्याला रक्षण करायचे आहे. त्यासाठी एका बाजूने युध्द जरी आवश्यक असले तरी केवळ त्यानेच उद्दिष्ट साध्य होणासारखे नाही. त्यासाठी दुसऱ्या बाजूला सिरीया आणि इराकमध्ये शांतता आणि समन्वयाची स्थिती निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी चर्चेचे दरवाजे बंद होता कामा नयेत असेही इकॉनॉमिस्टन म्हटले आहे. अलीकडच्या दहशतवादी घटनांमधला आधुनिक तंत्रज्ञानाचा सफाईदार वापर महत्वाचा ठरला आहे. उत्तर अमेरिकेतल्या व्हरमाँटमधल्या ‘व्हॅली न्यूज’मध्ये मॅथ्यू स्कोफील्ड यांनी पॅरिसवरच्या हल्ल्यात झालेल्या तंत्रज्ञानाच्या वापराच्या चांगल्या आणि वाईट बाजूंचा विचार केला आहे. दहशतवाद्यांनी या हल्ल्यात केलेला आॅनलाईन चॅटींग, गेमींग, सोशल मीडिया आणि जीपीएसचा केलेला वापर त्यांची योजना अंमलात आणण्यासाठी महत्वाचा ठरला होता. दहशतवादाचे एक ठराविक स्वरूप असत नाही. ही गोष्ट काळानुसार बदलत जाते आहे आणि त्यात सर्व नव्या तंत्रांचा वापर सफाईने केला जातो आहे. जी तंत्रे त्यांच्या विरोधात लढताना उपयोगी ठरणारी आहेत ती त्यांना देखील उपलब्ध होत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधून या स्थितीत तंत्रांचा वापर करताना किती खबरदारी घेण्याची गरज आहे त्याची सविस्तर चर्चा केली आहे. या संदर्भातच अ‍ॅॅनॉनिमस या हॅकर्सच्या जागतिक पातळीवरच्या समूहाने इसीसच्या विरोधात पुकारलेल्या लढाईचा विषय समोर येतो आहे. जिहादी दहशतवाद्यांना आधुनिक सायबर तंत्राचा वापर करता येऊ नये यासाठी हा समूह काम करतो आहे. इसीसने या समूहावर आगपाखड केली आहे. पण आपण इसीसशी संबंधित हजारो ट्विटर खाती बंद केली आहेत असे सांगत अ‍ॅनॉनिमस देखील आक्र मक झाला आहे. इथून पुढच्या काळात दहशतवादाच्या विरोधात सुरु झाले हे सर्वंकष युध्द जमिनीबरोबरच सायबर विश्वातही लढले जाणार हे नक्की. पण त्याबद्दल स्वतंत्रपणे पुढे कधीतरी. पॅरिसवरच्या हल्ल्यानंतर प्रामुख्याने युरोप आणि पश्चिमेकडच्या प्रगत देशांमध्ये घडत असणाऱ्या घटनांचा आढावा घेताना हे सहज लक्षात येते की अमेरिकेतल्या राष्ट्रपतीपदाचे इच्छुक डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे काही उठवळ अपवाद वगळता जवळपास सर्व प्रसारमाध्यमे आणि राजकीय नेते कोणतीही धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रतिक्रिया किंवा कृती न करता अत्यंत संयत आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने परिस्थितीला सामोरे गेलेले आहेत. आपण यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे हे नक्की.