शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

योगयुक्त आणि भक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:07 AM

संत ज्ञानेश्वर माऊली हे केवळ तत्त्वचिंतक नव्हते तर तत्त्वानुभवी होते. त्यांची ग्रंथनिर्मिती म्हणजे त्यांच्या आत्मानुभूतीवर आधारलेल्या स्वानुभवी चिंतनाचा कृपाळू अविष्कार होय.

- डॉ. रामचंद्र देखणेसंत ज्ञानेश्वर माऊली हे केवळ तत्त्वचिंतक नव्हते तर तत्त्वानुभवी होते. त्यांची ग्रंथनिर्मिती म्हणजे त्यांच्या आत्मानुभूतीवर आधारलेल्या स्वानुभवी चिंतनाचा कृपाळू अविष्कार होय. भारतीय आचार्यांनी द्वैत, विशिष्टाद्वैत, केवलाद्वैत, पूर्वाद्वैत इत्यादी भिन्न भिन्न विचारसरणी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात प्रचलित केल्या. जीव, जगत आणि परमात्मा यांची स्वरूपे कथन केली. सर्वच तत्त्ववेत्त्यांची दृष्टी मोक्ष या चतुर्थ पुरुषार्थावर आरूढ होऊन थांबते. परंतु, ज्ञानदेवांची पारमार्थिक अनुभूमी मोक्षासी न थांबता त्याच्याही पलीकडे जाऊन ज्ञानोत्तर भक्तीत स्थिर झाली आहे.‘चहू पुरुषार्थाचे शिरी। भक्ती जस्ौी।।’ असे प्रतिपादन करीत ज्ञानदेव भक्तीलाच पंचम पुरुषार्थ मानतात. ज्ञानदेवांनी आपल्या तत्त्वचिंतनातून अनाकलनीय ज्ञानाला भक्तीचा ओलावा आणि कर्माचे हातपाय दिले. तर शुद्धाचरणातून कर्माला ज्ञानाचे डोळे दिले.कर्म व ज्ञान यांच्या अहंकारातून निवृत्त होण्यासाठी भक्तीचे मोठेपण सांगून ज्ञान-कर्म आणि भक्तीचा समन्वय साधला. अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला की, भक्त आणि योगी यापैकी कुणी खरोखर योग जाणला आहे? माऊली त्यावर भाष्य करताना म्हणतात,‘‘तयां आणि जी भक्तां।येरायेरा माजीं अनंता।कवणें योगु तत्त्वतां।जाणितला सांगा।’’ त्यावर भगवंत स्पष्टपणे सांगतात, सूर्य अस्ताचलाच्या समीप गेल्यावरही सूर्यबिंबामागून जशी किरणे जातात, गंगा नदी समुद्रास मिळाल्यावरही जसा तिच्या मागील पाण्याचा अनिवार लोट येतच राहतो; त्या गंगेसारखा ज्यांच्या प्रेमभावाचा जोर कायम राहतो आणि जे सर्व इंद्रियासहित माझ्या स्वरुपी दृढ अंत:करण ठेवून माझी उपासना करता ते,‘‘यापरी जे भक्त। आपणचे मज देत।तेचि मी योगयुक्त।परम मानी।’’ याप्रमाणे जे भक्त आपला आत्मभाव देतात तेच खºया अर्थाने योगयुक्त झाले आहेत, असे समज.भक्ती ही केवळ करायची नसून, जगायची आहे. अंत:करणात भगवत्विषयक प्रेम उत्पन्न होऊन त्याची पूजा नामस्मरणादी करीत राहणे एवढेच भक्तीचे मर्यादित स्वरूप नाही.परमार्थ ही विवक्षित कालात, विवक्षित स्थळी, विवक्षित प्रकारची क्रिया नव्हे; तर ज्या भाग्यवंताच्या अंत:करणात भक्ती उत्पन्न झाली त्याच्या जीवनात क्रांती होणे असे आहे.