शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

आपला मोरू झालाय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 4:03 AM

परवा मोरू भेटला. जरा घाईतच होता. हल्ली तो खूप बिझी असतो. कामधंदा काय करतो, हे नक्की सांगता येणार नाही. पण फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टा, वुई चॅट यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर तो कायम अ‍ॅक्टिव दिसतो.

परवा मोरू भेटला. जरा घाईतच होता. हल्ली तो खूप बिझी असतो. कामधंदा काय करतो, हे नक्की सांगता येणार नाही. पण फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टा, वुई चॅट यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर तो कायम अ‍ॅक्टिव दिसतो. नाणारपासून डोकलामपर्यंत आणि कठुआपासून नगरपर्यंतच्या असंख्य घटना-घडामोडींवर तो अपडेट टाकत असतो. पाच वर्षापूर्वी तो इंजिनिअर झाला, तेव्हा खूप अपसेट होता. रिझर्र्व्हेशनमुळे ओपनवाल्यांना नोकरी मिळत नाही, म्हणून त्यानं केवढा त्रागा केलेला! सरकारच्या नावानं तर शिव्यांची लाखोली व्हायचा...कॉलेजने दोन रुपये फीवाढ केली म्हणून त्याने आंदोलनही छेडले होते. अण्णा हजारे यांच्या चळवळीला त्याचा मॉरल सपोर्ट होता. अण्णांमध्ये त्याला गांधीजी दिसत होते...दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची भाषा करायचा...पाकिस्तानला धडा शिकविला पाहिजे, काश्मीरमधील ३७० वं कलम हटवलं पाहिजे आणि देशात समान नागरी कायदा झाला पाहिजे, या त्याच्या तीन प्रमुख मागण्या असायच्या. आरक्षणाला तर त्याचा ठाम विरोध. दिल्लीत निर्भयाकांड झाले तेव्हा तो अक्षरश: पेटून उठला होता...मेनबत्ती मोर्चात अग्रभागी होता. इंधनदरवाढ, भाववाढीच्या विरोधात झालेल्या आंदोलनातही तो पुढे असायचा... सरकार, देश, सामाजिक व्यवस्था, पोलीस यंत्रणा, सीबीआय, उद्योगपती, भ्रष्टाचार याबद्दल त्याच्या मनात विलक्षण चीड होती. आपली शिक्षण व्यवस्था बेकारांचे तांडे निर्माण करणारी आहे, हे त्याचं ठाम मत. दरम्यान, मोरूच्या हाती मोबाईल आला अन् तो पार बदलून गेला. कधीकाळी पं. नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांच्याविषयी आदर बाळगून असलेला मोरू अचानक त्यांचा कडवा विरोधक बनला. नेहरू, गांधींविषयी व्हॉट्सअपवर आलेली माहिती खरी मानून तो ती फॉरवर्ड करू लागला... मिस् कॉल देऊन तो एव्हाना एका राजकीय पक्षाचा सदस्यही झाला होता. काही दिवसात तो ‘इंग इंडिया’ नावाच्या ग्रुपला जॉर्इंन झाला. बघता-बघता मोरूचे नेटवर्किंग चांगलेच वाढले. आता तो टीम लिडर बनला. दुसºया पक्षाच्या नेत्यांविषयी बदनामीकारक मेसेज फॉरवर्ड करायचे, सभास्थळी घोषणा द्यायच्या अन् बुथ सांभाळायचा. राजकीय परिवर्तनाशिवाय प्रगती नाही, या ठाम धारणेमुळे तो झपाटून कामाला लागला होता. अखेर मोरूच्या स्वप्नपूर्तीचा तो दिवस उजाडला...देशात सत्तांतर झालं! मोरू बेभान होऊन नाचला...जनधन योजना, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप अन् स्टॅण्डअप इंडिया या घोषणांनी तर तो अक्षरश: भारावून गेला. पण मध्येच नोटाबंदी झाली आणि अनेकांच्या रोजगारावर कुºहाड कोसळली. पण मोरू ठाम राहिला. देशहितासाठी असे कठोर निर्णय घ्यावेच लागतात, अशी फेसबुक पोस्ट टाकून मोकळा झाला! गेल्या चार वर्षात मोरूला इंटरव्ह्यूचा एकही कॉल आलेला नाही. आता त्याची गरजही उरलेली नाही. तो पूर्णवेळ ‘डिजिटल व्हॉलेंटियर’ बनला आहे. सरकारची जोरदार पाठराखण करणे, हा त्याचा पेशा आहे. पण अण्णांचे उपोषण, विद्यार्थी आंदोलनं, बेरोजगारांचे मोर्चे आणि कठुआसारख्या घटनांमुळे आपला देश परत मागे जातोय की काय? या शंकेनं त्याची झोप उडाली आहे. २०१९ पर्यंत तरी त्याला उसंत नाही !!- नंदकिशोर पाटील

(nandu.patil@lokmat.com)