शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

हवामान बदलाच्या नांदीला मिळतोय युवा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 1:56 AM

आपल्या देशात सध्या निवडणुकांचे पडघम वाजताहेत आणि एकूणच शैक्षणिक क्षेत्रात परीक्षा सुरू आहेत. किमानपक्षी तसं वातावरण तरी आहे. मात्र याचवेळी जगामधील बऱ्याच शालेय विद्यार्थ्यांचं मात्र एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन सुरू आहे.

-  शैलेश माळोदे (विज्ञान लेखक)आपल्या देशात सध्या निवडणुकांचे पडघम वाजताहेत आणि एकूणच शैक्षणिक क्षेत्रात परीक्षा सुरू आहेत. किमानपक्षी तसं वातावरण तरी आहे. मात्र याचवेळी जगामधील बऱ्याच शालेय विद्यार्थ्यांचं मात्र एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन सुरू आहे. १५ मार्च २०१९ च्या शुक्रवारपासून बहुतांश विकसित आणि बऱ्याच विकसनशील देशांतल्या विद्यार्थ्यांनी जगातल्या नेत्यांनी ‘हवामान बदलाच्या’ संकटावर ठोस कृती करावी म्हणून शाळेतून बाहेर पडून आपापल्या देशांतील संसदेपुढे धरणं धरून आंदोलन सुरू केलंय. सरकारांनी केवळ चर्चेची गुºहाळं चालवून आणि कुरघोडीचं राजकारण न करता ठोस निर्णय घेऊन या सर्व लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यवाही करावी म्हणून दर शुक्रवारी हे आंदोलन स्वयंस्फूर्तीने विद्यार्थ्यांनी सुरू केलंय.जानेवारी २०१९ पासून व्हनेसा नकाते नावाच्या एका २२ वर्षीय तरुणीनं बºयाचदा एकटीने, काही वेळा मित्र आणि भावंडांच्या मदतीनं युगांडाची राजधानी कंपालामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दर शुक्रवारी आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्याकरिता ती कारच्या बॅटरीज विकण्याच्या कामावरदेखील शुक्रवारी उशिरा जात असे. कधी ती एखाद्या मॉलसमोर उभी राहून तर कधी संसदेजवळ ती धरणं धरत असे. तिचं उद्दिष्ट एकच ते म्हणजे ‘हवामान बदलाकडे’ लक्ष वेधून तिच्या सरकारला कृती करण्याचं आवाहन करणं.१५ मार्चपासून मात्र नकाते एकटी नसून जगभरातील १७०० शहरांतील (१०० देशांमधील) हजारो तरुण-तरुणी प्रौढांना हवामान बदलास तोंड देण्यासाठी ठोस काही करण्याची मागणी करताहेत. नेपाळपासून ते राबुटूसारख्या छोट्या देशांपर्यंतचे विद्यार्थी नीती निर्धारक आणि बड्या बहुराष्टÑीय कंपन्यांच्या सीईओंना जागृत करण्यासाठी जोरदारपणे प्रयत्न करताहेत. भारतात सध्या निवडणुका आहेतच तेव्हा याबाबत जागरूकता निर्माण करण्याची एक संधी असून राजकीय पक्षांपुढे आपल्या विचारांना ठेवता येणं शक्य आहे. मात्र त्याचवेळी शाळांमध्ये परीक्षा आणि नंतरच्या सुट्ट्या असल्यामुळे हवामान बदलाचा मोठा धोका असलेल्या भारतासारख्या देशात याविषयी काहीशी सुस्त परिस्थिती आहे.तरुण आळशी असतात अशी धारणा जगातील या आंदोलनामुळे चुकीची असल्याचं दिसून येतंय. त्याचबरोबर सरकारांनी पुढील पिढ्यांवरील वाईट प्रभावांना दूर करण्यासाठी प्राधान्यक्रम देणं आता गरजेचं ठरतंय. सामाजिक माध्यमांमुळे अधिकाधिक तरुण याबाबत जागृत होत आहेत. त्यांनी आपल्या शाळा-कॉलेजामधून बाहेर पडून असं आंदोलन करण्यास काही राजकारण्यांचा (ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासहित) विरोध असला तरी जगभरातील शास्त्रज्ञांनी मात्र आंदोलनास पाठिंबा दिलाय. हवामान आंदोलनाची कल्पना खूपच भारी आणि नावीन्यपूर्ण आहे, यात वाद नाही. अवघ्या काही महिन्यांमध्ये या ‘ग्रासरुट्स’वरील आंदोलनाने एका सार्वत्रिक आंदोलनाचं रूप धारण करण्यास सुरुवात केलीय. नकातेसारख्या अनेक आंदोलकांना ग्रेटा थुनबर्ग या स्विडीश किशोरी (टीनएजर) पासून प्रेरणा लाभलीय. तिने आॅगस्ट २०१८ पासून नियमितपणे वर्गातून बाहेर पडून स्विडीश संसदेसमोर स्टॉकहोमला स्कूल स्ट्राइक फॉर क्लायमेट या अर्थाचा नामफलक घेऊन बसण्यास सुरुवात केली होती.थुनबर्गचं उदाहरण लक्षात घेऊन बेल्जियम ते आॅस्ट्रेलियामध्ये हजारांनी गेल्या काही महिन्यांत अशी आंदोलनं केली आहेत. मात्र १५ मार्चच्या घटनेनंतर तरुण आंदोलकांनी त्यांच्या देशात हॅशटॅग tridays for future आणि yuth strike 4 climate  याद्वारे सामाजिक माध्यमांवर धूम उडवून दिलीय. थुनबर्ग या तरुणांच्या आंदोलनाची फिगरहेड बनलीय. मोठ्यांच्या हवामान बदलाविषयीच्या बेफिकिरीमुळे त्याच्या विरोधात प्रतीक म्हणून तिला जगभर प्रसिद्धी लाभलीय. कॅटोवाइस (पीलंड) मधील संयुक्त राष्टÑांच्या हवामान परिषदेत केलेल्या भाषणात ती म्हणते, ‘‘तुम्ही म्हणता की तुम्ही तुमच्या मुलांवर इतर कशापेक्षाही अधिक प्रेम करता आणि तरीही त्यांच्या डोळ्यादेखत तुम्ही त्यांचं भविष्य चोरून घेत आहात.’’सोपा पर्याय शोधणं हे राजकारण्यांचं नेहमीचं धोरण असतं. त्यामुळे भारतात सध्या निवडणुका होऊ घातल्यामुळे भविष्याचे वारे कुणीकडे वाहताहेत हे लक्षात घेऊन उपभोगात मश्गूल नागरिकांना या तरुणांच्या देशाच्या भविष्याकडे डोळे उघडून बघणं भागच आहे. अन्यथा सामाजिक असंतोष आणि युवाशक्ती हे एक विध्वसंक समीकरण ठरू शकतं.

टॅग्स :weatherहवामान