- प्रवीण ऋषीआचार्य श्री आनंद ऋषीजी श्रमण संस्कृतीचे अमृत पुरुष होते. त्यांचे जीवन लोककल्याण, लोकजागरण व आत्मसाधनेचे त्रिवेणी संगम होते. म्हणून त्यांच्या दर्शनात भक्तांना तीर्थयात्रेची अनुभूती होत होती. ते मानवीय मूल्यांचे उद्गाता होते. त्यांचे प्रवचन ऐकणाऱ्यांचा बोध जागृत व्हायचा. ते स्वप्न दाखवायचेही व स्वप्नांचे सर्जनही करायचे. त्यांचा जन्म वि. सं. १९५७ श्रावण शुक्ल १ प्रमाणे २६ जुलै, १९००च्या शुभ दिनी महाराष्ट्रात अहमदनगरच्या सिराळ चिचोंडी या छोट्या गावात झाला. त्यांचे वडील श्री. देवीचंदजी व माता हुलसा बाई हे खूप धार्मिक प्रवृत्तीचे होते. तेरा वर्षांच्या छोट्या वयात नेमीचंदने गुरू रत्नऋषीजी महाराजांच्या चरणी विक्रम संवत १९७० मार्गशीर्ष शुक्ल ९, रविवारी मिरी गावात भगवती दीक्षा ग्रहण केली.
काही व्यक्तींना परिस्थिती उंचीवर नेते, तर काही परिस्थितीलाच उंचीवर नेतात. युग निर्मित नेता व युग निर्माता नेता या दोन श्रेणींचे नेता असतात. प्रथम श्रेणीचे युग आवश्यकतापूरक असतात. जसे जवाहरलाल नेहरू, डॉ. मनमोहन सिंग आदी व दुसºया श्रेणीत मध्ययुग निर्माण करणारे नेता असतात. आपले लक्ष्य, स्वप्न सत्य करणारे असतात. जसे महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, ए.पी.जे. अब्दुल कलाम व आचार्य आनंद ऋषीजी असेच एक युग निर्माता होते. जैन साधू-संतांची जीवन जगण्याची परंपरागत पद्धत आहे ती म्हणजे आत्मकेंद्रित साधना आणि लोकजीवनात उदासीन जीवनशैली.
आचार्य श्री आनंद ऋषीजी अध्यात्मनिष्ठा व साधना करत होते तरीसुद्धा सामान्य जनतेत उदासीन राहिले नाहीत. लोकांना प्रबोधन केलेच व जनकल्याणाचा मार्गही दाखवला. जो परंपरागत नव्हता. परंपरेनुसार त्यांना संप्रदाय मिळाला; परंतु त्यांनी धर्मसंघाचे संघटन तयार केले. परंपरागत संकीर्ण व्यवस्थेतून त्यांनी साधू, साध्वी व सामान्य लोकांनासुद्धा सांप्रदायिक मनोवृत्ती व व्यवस्थेतून मुक्त करून विराट आणि उदार विचार व आचार दिले. श्री.व.स्था. जैन श्रमण संघाचे संघटन तयार केले व ३० वर्षांपर्यंत त्याचे कुशलतापूर्वक धुरा सांभाळली. त्यांच्या शिक्षणावेळी कोणतीही व्यवस्था नव्हती तरीही गुरू रत्नऋषीजींच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी उच्चतम शिक्षण पूर्ण केले.
अनेक भाषांचे, लिपींचे त्यांना ज्ञान होते. त्यांचे शिक्षण खूपच विषम परिस्थितीत झाले, पण त्या परिस्थितीचा दुसरा कोणालाही सामना करावा लागू नये म्हणून वयाच्या ३६व्या वर्षी त्यांनी प्राथमिकपासून उच्चस्तरीय जैन धर्म दर्शन, आगम आणि भाषा यांची शिक्षण संप्रदायातील केंद्रीय शिक्षण संस्था निर्माण केली. त्याचे नाव आहे तिलोक रत्न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्ड. त्यांच्या तरुण अवस्थेत स्वाधीनता संग्राम चालू होता. तो महत्त्वपूर्ण उपक्रम होता. त्याच्यात राष्ट्रीय शिक्षण संस्थांचे निर्माण तेवढेच महत्त्वपूर्ण उपक्रम मानले जायचे; पण जैन साधूंकडून असे उपक्रम करणं सांप्रदायिक सामाजिक व्यवस्थेत मान्य नव्हतं. तरीसुद्धा गुरुवर्य श्री रत्नऋषीजी यांनी १९२३ मध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्था निर्मित केली आणि त्याचा पाठ्यक्रम तयार केला आनंद ऋषी यांनी. अध्यात्म साधना व मानवसेवेच्या कामात त्यांनी समन्वय केला. सामाजिक उपक्रमांचे आयोजन करताना अध्यात्मसाधनेत सिद्धी प्राप्त केली. अध्यात्म व समाजसाधना त्यांच्यासाठी परस्परविरोधी नसून पूरक होती. निरंतर श्रम हे त्यांनी जीवनाचं अभिन्न अंग बनवलं होतं.
रोज नवे उपक्रम व नवीन अभ्यास, संशोधन ही त्यांची जीवनप्रवृत्तीच बनली होती. जीवनयात्रेचा सर्वांत महत्त्वाचा दिवस २८ मार्च १९९२. तेव्हा त्यांचे वय होतं ९२ वर्ष व त्या दिवशी त्यांनी अध्ययन आणि अध्यापन संपन्न केलं. अध्यात्म साधनेची पवित्रता व त्यातली खोली इतकी अधिक होती की, त्यांना अनेक प्रकारची सिद्धी लाभली; परंतु त्यांनी त्याचे व्यापारीकरण केले नाही. प्रतिष्ठा प्राप्तीचाही हेवा केला नाही. त्या सिद्धी व चमत्कार ते गुप्तरीत्या लोकांचे दु:ख दूर करण्यासाठी व त्यांच्या समस्या निवारणासाठी वापरत. तसे तर ते परंपरा व वेशभूषेप्रमाणे स्थानकवासी जैन होते; परंतु विशाल स्थानकवासी धर्मसंघाचे ते धर्माचार्य बनले. तरीही हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अशा परंपरेच्या धार्मिक ग्रंथांवर त्यांची विद्वत्ता होती. ती ज्ञानात्मक व क्रियात्मक होती. त्यामुळे इतर धर्माचे लोकसुद्धा त्यांचे अनुयायी म्हणवून घेण्यात गर्व अनुभवीत.
आपल्या धर्मपरंपरांच्या भक्तांना प्रेरणा देत ते नेहमी बोलत की, ‘सच्चा मुस्लिम, अच्छा शीख, ईसाई और प्रामाणिक हिंदू व सज्जन जैन बनना.’ त्यांची धारणा अशी होती की, आपल्या धर्मपरंपरेचा निष्ठापूर्वक योग्य प्रकारे पालन जो करतो तोच मानव बनू शकतो. हेच कारण आहे की, त्यांची ह्या पृथ्वीवरची यात्रा पूर्ण होऊन २८ वर्षे झाली; पण तरीही त्यांचा जन्ममहोत्सव सर्वधर्म परंपरेचे श्रद्धाळू संयम, जप व मानव सेवेद्वारा आपली भक्ती त्यांना समर्पित करतात. पूजापाठ, क्रियाकांडऐवजी जनसेवा जनकल्याणाला परमात्म्याची आज्ञा मानून स्वीकार केले व त्याच मार्गावर त्यांचे अनुयायी सहज गतिशील आहेत.