शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

झुकेरबर्गची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 03:38 IST

ऊठसूठ फेसबुकवर काहीबाही टाकून सतत सोशली कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाखो फेसबुक युजर्सचा डेटा लीक केल्याबद्दल मार्क झुकेरबर्ग या फेसबुक संस्थापकास अमेरिकन सिनेटमध्ये नुकतेच पाचारण करण्यात आले होते.

- नंदकिशोर पाटीलऊठसूठ फेसबुकवर काहीबाही टाकून सतत सोशली कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाखो फेसबुक युजर्सचा डेटा लीक केल्याबद्दल मार्क झुकेरबर्ग या फेसबुक संस्थापकास अमेरिकन सिनेटमध्ये नुकतेच पाचारण करण्यात आले होते. सिनेट मेंबर्स्नी एकापाठोपाठ एक अशा कठीण प्रश्नांची सरबत्ती करून झुकेरबर्गला चांगलाच घाम फोडला. ही बातमी भारतात धडकताच आपल्याकडच्या काही खासदारांना कल्पना सुचली की, आपणही मार्कला फैलावर घेतले पाहिजे. त्यानुसार एक सर्वपक्षीय संसदीय समिती स्थापन करून तिच्यासमोर झुकेरबर्गला पाचारण करण्यात आले. समितीतील बहुतेक सदस्यांना इंग्रजी येत नसल्याने त्यांनी तोडक्या-मोडक्या इंग्रजी आणि हिंदीतून प्रश्न विचारले आणि मार्कने द्विभाषकाच्या साह्याने त्याला उत्तरे दिली. शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी काही रोखठोक प्रश्न विचारून झुकेरबर्गला घेरण्याचा प्रयत्न केला. पण...राऊत: क्या आपको पता है, फेसबुक के कारण हमारे महाराष्टÑ में हजारो किसान हर साल आत्महत्या कर रहे है?झुकेरबर्ग: बहोत दु:खद खबर है. मगर इसको फेसबुक जिम्मेदार है? आय डोण्ट बिलिव्ह..राऊत: क्यों बिलिव्ह नही करते? सरकार की आंकडेवारी है की पिछले चार साल में आठ हजार किसानों ने सुसाईड किया!झुकेरबर्ग: व्हेरी स्ट्रेंज...एक्सप्लेन प्लीज...राऊत: ऐसा है की, २०१४ के चुनाव में हर भारतीय नागरिक के खाते में १५ लाख रुपया और कृषीउत्पाद के दाम दोगुणा होंगे ऐसे मेसेजेस फेसबुकपर आये थे. लोगोंने बँक खाते खुलवाए. मगर आजतक कुछ नही मिला. इसलीए किसान सुसाईड कर रहे है!झुकेरबर्ग: मगर हम नें तो कभी ऐसा आश्वासन नही दिया! जिन्होंने दिया हो,आप उनको क्यों नही पुछते?राऊत: विचारले ना! पण ते तर म्हणतात, असले मेसेजेस् फेक अकाऊंटस्वरून आले असतील! ए फेकाफेकी क्यूं?झुकेरबर्ग: डोण्ट वरी सर...वी विल कन्फर्म अ‍ॅण्ड डिलिट ईट! नेक्स्ट प्लीज...लालूप्रसाद: (तुंरुगातून फेसबुक लाईव्ह!)ए ससुरा फेसबुकने तो संघवादी है...दलित, पिछडे जाती के लोगों में जहर फैला रहा है... और हमको तो जेल भिजवा दिया ससुरे ने...झुकेरबर्ग: सरजी, आपको फेसबुक ने नही कोर्ट ने जेल भेजा है...लालूप्रसाद: ए झूठ है...हमारे खिलाफ बडा षडयंत्र हुआ है...हमने चारा खाया, चारा खाया...ऐसा झुटा प्रचार फेसबुकने किया और वो पढकर जजसाब ने हमको सजा सुनाई! बंद कर दो तुम्हारा ए फेकबुक!!झुकेरबर्ग: आय एम व्हेरी सॉरी लालुजी.बट ये ‘चारा’ क्या होता है?लालूप्रसाद: वही जो हम ने नही खाया!!झुकेरबर्ग: नेक्स्ट प्लीज...मायावती: फेसबुक के वजह से हमारे हाथी सायकल पर चढे और युपी में कमल खिले...झुकेरबर्ग: एलिफन्ट्स आॅल्सो आॅन फेसबुक...व्वॉव! दॅट्स ग्रेट..!! नेक्स्ट प्लीज!शरद पवार: फेसबुकमुळे ट्रम्प अमेरिकेचे राष्टÑाध्यक्ष झाले, मोदी पंतप्रधान झाले.माझी इच्छा पुरी कराल, तर तुम्हाला क्रिकेट बोर्डावर घेतो. बोला आहे मंजूर?झुकेरबर्ग: इसका जवाब तो सोनियाजी, राहुलजी और मोदीजी ही दे सकते है!(तिरकस)

टॅग्स :Mark Zuckerbergमार्क झुकेरबर्ग