वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका विश्वविद्यालयाने भारतीय वंशांच्या मुलीला जगातील सर्वांत प्रतिभाशाली विद्यार्थी म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेतील अत्यंत अवघड अशा स्कॉलरशीप ॲसेसमेंट टेस्ट (सॅट) आणि अमेरिकन कॉलेज टेस्टिंग (ॲक्ट) परीक्षेत यशस्वीरित्या कामगिरी करणाऱ्या नताशा पेरी हिला जगातील सर्वांत बुद्धीमान विद्यार्थ्यांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
अनेक महाविद्यालयांमध्ये स्कॉलरशीप ॲसेसमेंट टेस्ट (सॅट) आणि अमेरिकन कॉलेज टेस्टिंग (ॲक्ट) या परीक्षांच्या आधारेच प्रवेश देतात. ११ वर्षीय विद्यार्थी नताशा पेरी ही न्यू जर्सीच्या थेल्मा एल सँडमीअर एलीमेंट्री शाळेची विद्यार्थी आहे. जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड युथ (सीटीवाय) या बुद्धीमान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी ही परीक्षा घेतली होती.
या परीक्षेत न्यूजर्सी येथील शाळेत शिकणाऱ्या नताशा पेरी हिने अत्यंत चांगली कामगिरी केली. या 'सीटीवाय'ला ८४ देशांमधील १९ हजार विद्यार्थी बसले होते. या परीक्षेमध्ये जगभरातील विद्यार्थ्यांची अत्यंत अवघड परीक्षा घेतली जाते. नताशा हिने ९० पसेंटाइलपेक्षा अधिक गुण मिळविले.
'सीटीवाय'चे कार्यकारी संचालक वर्जीनिया रोच यांनी परीक्षेचा निकाल जाहीर करताना सांगितले की, 'या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. या संपूर्ण वर्षात काहीही चांगले नव्हते, परंतु या विद्यार्थ्यांच्या प्रतिभेने आणि शिकण्याने ते नेत्रदीपक बनले. येत्या काळात आणि हायस्कूल, कॉलेज आणि त्यापलीकडे शिक्षणासह जीवनात या मुलांना विद्वान आणि नागरिक म्हणून वाढण्यास मदत करण्यात आम्हाला आनंद होईल'.