शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
2
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
3
Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?
4
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
5
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?
6
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?
7
रामजी की निकली सवारी, ठेका धरत मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरीची जल्लोषात मिरवणूक सुरू 
8
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
9
माझ्या कार्यक्रमात काँग्रेसने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडणार; संजय गायकवाडांची धमकी
10
मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत
11
साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्...; असं आहे 74 वर्षांच्या मोदींचं डेली रुटीन
12
तिप्पट होऊ शकतो पैसा, Bajaj Housing Finance च्या शेअरला पहिलं 'बाय' रेटिंग; किती आहे टार्गेट प्राईज?
13
पुण्यात वैभवशाली मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात; मानाचा पहिला कसबा गणपती समाधान चौकातून मार्गस्थ 
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी १२ तास तळ ठोकून होता; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
बॉलिवूड अभिनेत्यांवर कंगना राणौतने केले धक्कादायक आरोप, म्हणाली- "मेसेज करून घरी बोलवतात..."
16
"जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो..."; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय?
17
मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार; सरकारची डोकेदुखी वाढणार?
18
काय राव! धोनी सोडा, पण युवीनं किंग कोहली अन् हिटमॅन रोहितलाही नाही दिली 'किंमत'
19
एक अशी महिला, ज्यांच्या समोर ३,३६,००० कोटींच्या कंपनीलाही झुकावं लागलं; नियम बदलून रचला इतिहास
20
Stock Market Opening: US फेडच्या बैठकीपूर्वी शेअर बाजारात बुलिश ट्रेंड, 'ही' लेव्हल पार केली तर येऊ शकते मोठी तेजी

बारावीच्या पुनर्मूल्यांकन निकालाला विलंब! मंडळाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 7:45 AM

उच्च शिक्षणासाठी भवितव्य टांगणीला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेच्या निकालानंतर पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप निकाल न मिळाल्याने त्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश पूर्वपरीक्षाचा म्हणजेच एमएचटी सीईटी, जेईई, नीट यांचा निकाल जाहीर होऊन, १५ जूनपासून सीईटी सेलकडून ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे बारावीच्या निकालाबद्दल पुनर्मूल्यांकनाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीवर लागले आहे.

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. मात्र या अभ्यासक्रमांसाठी पूर्वपरीक्षा गुणांसह बारावीला किमान ७५ टक्के गुण आवश्यक आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ५ ते १० गुण कमी मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी बारावीच्या काही विषयांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत. मात्र त्यांच्या अर्जाबद्दल मंडळाकडून अद्याप कोणतीही प्राथमिक प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली नाही. या अशा कारभारामुळे त्यांचा बारावी परीक्षेचा निकाल विलंबाने लागल्यास हुशार विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणालाच मुकावे लागते की काय, अशी भीती वाटत आहे.

शिक्षणमंत्र्यांना निवेदन

  • राज्य मंडळाच्या या भोंगळ कारभाराबाबत मुंबई विद्यापीठातील युवासेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवत त्वरित हा निकाल जाहीर केला जावा, अशी मागणी केली आहे.
  • पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास युवासेना तीव्र आंदोलन छेडण्याचा असा इशाराही त्यांनी दिला आहे.
टॅग्स :collegeमहाविद्यालय