नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या(CBSE) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, काही विषयांच्या परीक्षेच्या तारखा बदलण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे, सीबीएसईने त्यांच्या वेबसाईट cbsc.gov.in यावर दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक दिले आहे. सीबीएसई बोर्डाचं नवीन वेळापत्रक दिलं आहे, तुम्ही खालील लिंकवर जाऊन ते डाऊनलोड करू शकता.(CBSE Revised Time Table of 10th & 12th Exam)
नव्या वेळापत्रकानुसार, बारावीची फिजिक्स परीक्षा ८ जूनरोजी होणार आहे, याआधी ती १३ मे रोजी होणार होती, तर मॅथ्सचा पेपर ३१ मेला घेण्यात येईल, जो आधीच्या वेळापत्रकानुसार १ जून रोजी होणार होता. त्याशिवाय बारावीचा ज्योग्राफीचा पेपर आता ३ जून रोजी घेण्यात येणार आहे, आधी तो २ जून रोजी होता.
पहिले १३ आणि १४ मे रोजी काही विषयांच्या परीक्षा होणार होत्या, परंतु आता या दान्ही तारखांना कोणत्याही विषयाची परीक्षा नसणार आहे, आता सीबीएसई १२ वीची परीक्षा ११ जून २०२१ रोजी संपणार आहे, यापूर्वी शेवटचा पेपर १४ जून २०२१ रोजी होणार होता.
१२ वीचं नवीन टाईमटेबल पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
सीबीएसईच्या १० वीचा सायन्सचा पेपर २१ मे रोजी होणार आहे, तर या तारखेला १० वी मॅथ्सचा पेपर होणार होता. आता मॅथ्सचा पेपर २ जून रोजी घेतील, त्याशिवाय १० वीचा फ्रेंच, जर्मन, अरबी, संस्कृत, मलायलम, पंजाबी, रशियन आणि उर्दू विषयाची परीक्षांच्या तारखाही बदलण्यात आल्या आहेत. १० वी बोर्डाच्या परीक्षा सुरू आणि संपण्याच्या तारखा बदलल्या नाहीत. दहावीचा पहिला पेपर ४ मे २०२१ रोजी होणार असून शेवटचा पेपर ११ जून २०२१ रोजी होणार आहे.