CBSE class 12 board exam result 2021: सीबीएई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर केले जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक निकालांच्या प्रतीक्षेत होते. परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना आपले निकाल निरनिराळ्या प्लॅटफॉर्म्सवर पाहता येणार आहेत. निकाल पाहताना कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एका प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात अनेकांना सांभाळणं कठीण आहे. दरम्यान, दरवर्षी जवळपास १५ लाख विद्यार्थी १२ वीच्या परीक्षा देत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी परीक्षांचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे बोर्डानं निकाल अंतिम करण्यासाठी मूल्यांकन योजनेचा वापर केला आहे. यावर्षी तब्बल १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.