CBSE नं १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांची डेटशीट जारी केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांचं वेळापत्रक cbse.gov.in या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. डेटशीटवरून कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे याची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सीबीएसईच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ४ मे पासून सुरू होणार असून त्या १० जूनपर्यंत सुरू राहतील. तसंच विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा १ मार्च पासून घेण्यात येणार आहेत. तसंच परीक्षांचे निकालही १५ जुलैपर्यंत लावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही डेटशीट जारी केली. तसंच विद्यार्थी परीक्षांच्या तयारीला लागले असतील याचा आपल्याला पूर्ण विश्वास आहे, असंही ते म्हणाले. "आम्ही यापूर्वीच ४ मे पासून परीक्षा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. विद्यार्थ्यांना तयारीसाठीही बराच कालावधी मिळालला आहे. मला अशा आहे की तुम्ही वेळेचा य़ोग्य उपयोग करत असाल," असंही शिक्षणमंत्री म्हणाले.
CBSE Exam Datesheet 2021:वेळापत्रक जाहीर, ४ मेपासून १०वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 6:03 PM
१ मार्चपासून होणार प्रॅक्टिकल परीक्षांना सुरूवात
ठळक मुद्दे१ मार्चपासून होणार प्रॅक्टिकल परीक्षांना सुरूवात१५ जुलैपर्यंत निकाल लागणार