सीबीएसईने (CBSE ) 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या टर्मची परीक्षा जाहीर केली आहे. ही परीक्षा नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये घेतली जाणार आहे.
१२ वीची परीक्षा ही 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ती 22 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. परीक्षेचे टाईमटेबल जारी करण्यात आले आहे. प्रत्येक पेपर हा 90 मार्कांचा असणार असून तो वाचण्यासाठीचा वेळ हा 15 मिनिटांऐवजी 20 मिनिटे करण्यात आला आहे. तसेच हिवाळा असल्याने सकाळी 10.30 ऐवजी पेपर 11.30 वाजता सुरु होणार आहे.
तर दहावीची परीक्षा 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून शेवटचा पेपर हा 11 डिसेंबरला होणार आहे. परीक्षेचे टाईमटेबल जारी करण्यात आले आहे. इथेही 12 वी परीक्षेप्रमाणेच बदल करण्यात आले आहेत.