केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 10वी आणि 12वीच्या द्वितीय टर्मच्या परीक्षा 26 एप्रिलपासून घेतल्या जाणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. राज्याच्या बोर्डाप्रमाणे या परीक्षा देखील ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.
कोरोनामुळे CBSE ने 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा टर्म 1 आणि 2 मध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. CBSE इयत्ता 10 ची टर्म-1 बोर्ड परीक्षा 17 नोव्हेंबरला महत्वाच्या विषयांसाठी आणि 30 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान सोप्या विषयांसाठी घेण्यात आली. त्याच वेळी, 12वी वर्गाच्या सोप्या विषयांच्या परीक्षा 16 नोव्हेंबर आणि प्रमुख विषयांच्या परीक्षा 01 ते 22 डिसेंबर 2021 या कालावधीत घेण्यात आल्या.
CBSE ने अद्याप 10वी 12वी टर्म 1 बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. ते लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. टर्म 1 बोर्ड परीक्षेत बसलेले विद्यार्थी त्यांच्या परीक्षा रोल नंबरच्या मदतीने त्यांचे निकाल तपासू शकतात. बोर्डाच्या cbseresults.nic.in आणि results.gov.in या अधिकृत वेबसाइटवर मार्कशीटच्या स्वरूपात निकाल जाहीर केले जातील.