शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

शाळा शुल्क कपातीच्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 9:46 AM

राज्य सरकारला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश. खासगी विनाअनुदानित शाळा, खासगी विनाअनुदानित अल्पसंख्याक शाळा  आणि पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट इत्यादी शाळा या असोसिएशनच्या सदस्य आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षात १५ टक्के शुल्क कपात करावी, अशी अधिसूचना राज्य सरकारने १२ ऑगस्ट रोजी काढली. या अधिसूचनेला असोसिएशन ऑफ इंडियन स्कूलने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. तसेच या असोसिएशनच्या सदस्य शाळांवर २० सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

खासगी विनाअनुदानित शाळा, खासगी विनाअनुदानित अल्पसंख्याक शाळा  आणि पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट इत्यादी शाळा या असोसिएशनच्या सदस्य आहेत. राज्यातील शैक्षणिक संस्थांनी किती शाळा शुल्क आकारावे, याची तरतूद महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क अधिनियम) कायदा, २०११ आहे. त्यामुळे शुल्क कपातीबाबत राज्य सरकार स्वतंत्र अधिसूचना काढू शकत नाही. हे कायद्याविरोधात आहे, असे याचिकेत म्हटले आहे. 

मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान सरकारला वार्षिक शाळा शुल्कात १५ टक्के कपातीचे निर्देश दिले. शाळेतील सुविधांचा वापर विद्यार्थी करीत नसल्याने फी कपात करावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. हेच निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रालाही दिले आहेत, असे राज्य शालेय विभागाने अधिसूचनेत म्हटले आहे.

२० सप्टेंबरपर्यंत शाळांवर कारवाई न करण्याचे निर्देशnन्यायालयाने राज्य सरकारला या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले. पुढील सुनावणी २० सप्टेंबर रोजी ठेवत न्यायालयाने तोपर्यंत शाळांवर कारवाई न करण्याचे निर्देश सरकारला दिले.

टॅग्स :Schoolशाळा