काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) उद्या आयसीएसईच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. बोर्डाने याची माहिती दिली आहे.
आयसीएसई (ICSE) चा इयत्ता दहावीचा निकाल उद्या १७ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर केला जाणार आहे. अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी त्यांचा रोल नंबर टाकून हा निकाल पाहू शकणार आहेत. तसेच मार्कशीट डाऊनलोडही करू शकणार आहेत.
बोर्ड सटिव गेरी अराथून यांच्यानुसार फायनल मार्कांसाठी सेमिस्टर १ आणि सेमिस्टर २ ला समान महत्व देण्यात आले आहे.
कुठे पहाल निकाल... (How to check ICSE 10th result 2022?)उद्या या लिंकवर क्लिक करा...
ICSE (वर्ग 10) च्या दुसऱ्या सत्राच्या बोर्ड परीक्षा CISCE द्वारे 25 एप्रिल ते 20 मे 2022 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर पहिल्या सत्राचा निकाल शाळांना पाठवण्यात आला आहे. बोर्ड, निकालानंतर, दहावीच्या टॉपर्सची यादी देखील प्रसिद्ध करेल.