दिल्ली बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनसोबत (DBSE) इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्डासोबत (International Education Board) एक सामंजस्य करार केला आहे. केजरीवाल सरकारच्या या करारानंतर दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये परदेशातील तज्ज्ञ मंडळी प्रशिक्षण देणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ''दिल्लीकरांसाठी आपल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बातमी आहे. आता आपल्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळणार आहे'', असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
"आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक शिक्षण बोर्ड आहे की त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देण्याचं काम केलं जातं. आंतरराष्ट्रीय बोर्डाकडून शिक्षण मिळावं असं विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. संपूर्ण जगात साडेपाच हजार शाळांसोबत असे आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे करार करण्यात आले आहेत. यात १५९ शाळांसोबत काम केलं जात आहे. यात अमेरिका, जपान, दक्षिण कोरिआ इत्यादी देशांसोबत करार केले आहेत", असं केजरीवाल म्हणाले.
दिल्ली शिक्षण मंडळ आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळामध्ये एक सामंजस्य करार झाला आहे. याचाच अर्थ असा की, दिल्लीतील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण दिलं जाणार आहे. ही खूप मोठी बाब आहे. यात डीबीएसआयमधून एफिलेटेड होणाऱ्या खासगी शाळांचाही समावेश आहे, असंही केजरीवालांनी सांगितलं.