लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात शाळा, मंदिरे, नाट्यगृहे, सिनेमागृहे सर्व सुरू झाले आहे. मात्र, अद्यापही कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. लॉकडाऊनपासून राज्यातील खासगी शिकविण्या बंद आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांपुढे विविध अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच धर्तीवर खासगी शिकवणी वर्गांनाही परवानगी दिली जावी, अशी मागणी खासगी कोचिंग क्लासेस संघटनांकडून होत आहे.
कोचिंग क्लासेस व्यवसाय ही शाळा, महाविद्यालयांना समांतर अशी शिक्षण व्यवस्था आहे. मात्र, सरकारला त्याचा विसर पडला आहे. सरकारने ज्याप्रमाणे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्याची परवानगी दिली तशीच क्लास सुरू करण्याचीही द्यावी, तसा अध्यादेश काढावा किंवा शाळांच्या शासन निर्णयात क्लासचाही उल्लेख करावा, अशी मागणी कोचिंग क्लास संघटना करीत आहेत.
राज्याच्या अनेक भागात गेल्या चार महिन्यांपासून शाळा, महाविद्यालय जरी बंद असले तरी कोचिंग क्लासेस हे सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सुरू आहेत. कोचिंग क्लासेस संचालकांनाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी असून, विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर पडू नये याचीही चिंता आहे.
‘क्लासेसला का डावलले जाते?’nऑनलाइन काळात शाळा बंद असताना खासगी शिकविण्यांमुळे विद्यार्थ्यांना आधार मिळाला मग आता शाळा सुरू करताना क्लासेसला का डावलले जात असल्याची प्रतिक्रिया कोचिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख सल्लागार सचिन कर्णावत यांनी दिली. nसरकारकडून या खासगी कोचिंग क्लासेस व्यवस्थेला नेहमीच डावलले जात असल्याने अद्याप क्लास सुरू करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे ज्या अटी शर्ती, नियम शाळांना लागू केले आहेत ते लागू करून खासगी क्लासला परवानगी द्यावी, अशी मागणी क्लास संस्थाचालक यांनी केली. nवर्गांचे निर्जंतुकीकरण, मास्क, शिक्षकांचे लसीकरण, ५० टक्के उपस्थिती या सर्व नियमांचे पालन खासगी क्लासमध्येही केले जाईल. त्यामुळे सरकारने आता खासगी क्लास सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कर्णावत यांनी केली आहे.यार