University Grants Commission (UGC): विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) मास्टर ऑफ फिलॉसॉफी (Mphil) अभ्यासक्रमाबाबत एक इशारा जारी केला आहे. एमफिल अभ्यासक्रम रद्द केल्यामुळे कुणीही या अभ्यासक्रमातसाठी कुठल्याही विद्यापीठात प्रवेश घेऊ नये, असे युजीसीने सांगितले आहे. याबाबत युजीसीने एक निवेदनही जारी केले आहे.
यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी सांगितले की, एमफिल पदवीची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठांनी देऊ केलेल्या कोणत्याही एमफिल प्रोग्राममध्ये प्रवेश न घेण्याबाबत सावध करण्यात आले आहे. यासोबतच, UGC ने 2024-25 सत्रात प्रवेश थांबवण्यासाठी विद्यापीठांना तातडीने पावले उचलण्यास सांगितले आहे.
यूजीसीने यापूर्वीच एमफिल पदवी बेकायदेशीर घोषित केली होती आणि सर्व शैक्षणिक संस्था/ विद्यापीठांना एमफिल कार्यक्रम देऊ नये, असे निर्देश दिले होते. UGC ने म्हटले आहे की, UGC च्या निदर्शनास आले आहे की, काही विद्यापीठे एमफिल प्रोग्रामसाठी नवीन अर्ज मागवत आहेत. यामुळेच हे निवेदन जारी करुन इशारा देण्यात आला आहे.