महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा (सत्र परीक्षा) ऑनलाईन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा बहुपर्यायी स्वरूपात घेतल्या जाणार असून १८ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याचे एमएसबीटीईने जाहीर केले आहे.लेखी परीक्षेपूर्वी घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनेच ३ ते १५ जानेवारी दरम्यान घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. एमएसबीटीईकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अभियांत्रिकी व फार्मसीच्या लेखी परीक्षांपूर्वी या अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांना या परीक्षात ४० पैकी ३५ प्रश्न सोडविणे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांना घरून परीक्षा देता येणे शक्य नसल्यास जवळच्या पॉलिटेक्निक संस्थेमध्ये विनंती केल्यास सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश संस्थांनाही देण्यात आले आहेत.या शिवाय प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन पद्धतीने तर तोंडी परीक्षा या संस्थास्तरावर घेण्यात याव्यात व यासाठी विविध मोबाइल ॲपचा वापर करावा अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा टेलिफोनिक पद्धतीचा वापर करूनही घेऊ शकणार आहेत, असे मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी स्पष्ट केले आहे.हिवाळी परीक्षेचे वेळापत्रकपहिले आणि तिसरे स्तर वगळून नियमित विद्यार्थी
- प्रात्यक्षिक परीक्षा - ३ ते १५ जानेवारी
- ऑनलाईन लेखी परीक्षा - १८ जानेवारी ते ९ फेब्रुवारी
- पहिले आणि तिसरे सत्र नवीन प्रवेशित विद्यार्थी
- प्रात्यक्षिक परीक्षा - १० ते १५ जानेवारी
- ऑनलाईन लेखी परीक्षा - १८ जानेवारी ते ९ फेब्रुवारी