शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Education: पहिली ते सातवीचे वर्ग भरणार, पहिली घंटा १७ ऑगस्टपासून; ८ वी ते १० वीच्या वर्गांना अल्प प्रतिसाद

By अतुल कुलकर्णी | Published: August 07, 2021 7:11 AM

Education News: कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथील झालेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपासून पहिली ते ७ वीच्या शाळांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

- अतुल कुलकर्णी मुंबई : कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथील झालेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपासून पहिली ते ७ वीच्या शाळांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ८ वी ते १० वीच्या शाळा या आधीच म्हणजे १५ जुलैपासून सुरू झाल्या आहेत.इयत्ता ८ वी ते १० वीच्या ३६,८३५ पैकी १२,७२५ शाळा सुरू झाल्या आहेत. त्यात ८६,३३,८०५ विद्यार्थ्यांपैकी ८,९८,८९४ विद्यार्थी शाळेत येत आहेत. एकूण शाळांच्या ३४.५५ टक्के शाळा सुरू झाल्या मात्र, त्यात फक्त १०.४१ टक्के विद्यार्थ्यांनीच थेट वर्गात येणे पसंत केले आहे. लातूर, अमरावती, नागपूर या तीन विभागात सर्वाधिक विद्यार्थी शाळेत आले आहेत. पंचवीस जिल्ह्यांत अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचा विचार करूनच शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याविषयी शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. 

शाळांना ‘एसओपी’ पुढील आठवड्यात पहिली ते सातवीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था कशी असेल, त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? जेवणाचे डबे, मध्यंतराची सुट्टी, खेळाचे वर्ग या सगळ्यांचे नियोजन कसे असावे? याविषयीची ‘एसओपी’ तयार करण्याचे काम सुरू असून ती येत्या आठवड्यात सर्व शाळांना पाठवली जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले. 

फीबाबत पुढील कॅबिनेटमध्ये चर्चाशाळांची फी कमी करण्याविषयी  चर्चा सुरू होती. त्याचे पुढे काय झाले असे विचारले असता त्या म्हणाल्या, याबद्दल येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल. शाळा सुरू झाल्यानंतर काय ठरवायचे, यावरही बैठकीत चर्चा होईल.  

राज्यात आरटीईचे ६० टक्के प्रवेश पूर्ण- यंदा शाळा, महाविद्यालये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्यातरी बंद आहेत. अशा परिस्थितीत आरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशांना मिळणारा प्रतिसादही थंडावला आहे. - अनेक विद्यार्थ्यांची निवड पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी होऊनही अद्याप त्यांचे प्रवेश झालेले नाहीत. - शिक्षण संचालनालयाकडून वारंवार मुदतवाढ देऊनही पहिल्या फेरीच्या अंतिम मुदतीत राज्यात एकूण रिक्त जागांच्या जवळपास ६० टक्के प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत.- आरटीईअंतर्गत ९,४३२ शाळांमध्ये ९६,६८४ जागा यंदा उपलब्ध आहेत. मार्चमध्ये जाहीर केलेल्या सोडतीमध्ये ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले. - पण पालकांकडून कमी प्रतिसाद मिळाला आणि आवश्यक तेवढे प्रवेश होऊ शकले नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थी